अमित शाह यांचा आरोप, शरद पवार भ्रष्टाचाराचे महामेरू, तर उद्धव ठाकरे औरंगजेबचे … भाजपाच्या पुणे अधिवेशनात अमित शाह यांचा आरोप

विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या कार्यकर्त्यांचे अधिवेशन पुण्यात पार पडले. या अधिवेशनाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना अमित शाह यांनी महाविकास आघाडी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर यथेच्छ टीका केली.

पुढे बोलताना अमित शाह म्हणाले की, संपूर्ण देशात भ्रष्टाचाराचा मेहामेरू कोणी असेल तर ते म्हणजे शरद पवार हे असून सरकारी संस्थांच्या माध्यमातून भ्रष्टाचाराच्या करण्यात त्यांचा हातखंडा आहे. त्यामुळे संपूर्ण देशभरात त्यांची ओळख भ्रष्टाचारी म्हणून असल्याचा आरोप केला.

त्यानंतर बोलताना अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करताना म्हणाला की, महाराष्ट्रात औरंगजेबचे फॅन क्लब चालविणारे काहीजण आहेत. या औरंगजेब फॅन क्लबचे प्रमुख उद्धव ठाकरे हे असून नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत त्यांच्या फॅन क्लबनेच उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मतदान केल्याची खोचक टीका केली.

अमित शाह पुढे बोलताना म्हणाले की, लोकसभा निवडणूकीच्या दरम्यान महाविकास आघाडी आणि इंडी आघाडीच्या नेत्यांनी भाजपा आणि मोदी यांच्या विरोधात फेक नॅरेटीव्हच्या माध्यमातून भाजपाचे सरकार राज्यघटना बदलणार, दलित, आदिवासी समुदायाला मिळणारे आरक्षण बंद करणार असल्या खोट्या गोष्टींचा प्रचार केला. त्यामुळे आम्हीही या फेक नॅरेटीव्हला उत्तर देण्याचा प्रयत्न करण्याच्या फंदात पडलो नाही असल्याचे स्पष्ट केले.

मराठा आणि ओबीसी आरक्षणाबाबत बोलताना अमित शाह म्हणाले की, राज्यात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे सरकार असताना मराठा समाजाला आरक्षण दिले नाही. मात्र भाजपाचे सरकार आल्यानंतर मात्र मराठा समाजाला आरक्षण मिळाले. पुन्हा शरद पवार यांचे सरकार आले तर मिळालेले आरक्षण जाते अशी उपहासात्मक टीकाही यावेळी केली.

लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने झालेल्या प्रचारा दरम्यान आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्या वेळी पंतप्रधान पदाची शपथ द्यायची असा पण केला. त्यानुसार एकट्या भाजपाला आपण २४० जागा मिळवून दिल्या आणि रालोआतील घटक पक्षांच्या पाठिंब्यांच्या आधारे २८० हून अधिक जागा मिळवित तिसऱ्यांदा केंद्रात सलग तिसऱ्यांदा मोदीचे नेतृत्व मान्य केले. एखाद्याने विजय मिळविला तर त्याच्यात अहंकार निर्माण होतो. मात्र राहुल गांधी यांच्या पक्षाला आणि त्यांच्या इंडी आघाडीला २४० ही जागा मिळविता आल्या नाहीत. ना त्यांना केंद्रात सत्ता स्थापन करण्याची संधी मिळाली. तरीही राहुल गांधी यांच्यात अहंकार असल्याचा आरोपही यावेळी केला.

शेवटी बोलताना अमित शाह म्हणाले की, ज्या प्रमाणे केंद्रात मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपाचे सरकार स्थापन केले. त्याचधर्तीवर महाराष्ट्रातही महायुतीची स्थापन पुन्हा एकदा आणायचे असल्याने येथे आलेल्या भाजपा कार्यकर्त्ये पदाधिकारी यांनी इथून गेल्यानंतर आपल्या मतदारांपर्यंत बुथ लेव्हल पर्यंतच्या कार्यकर्त्यांपर्यत पुन्हा महायुतीचे सरकार राज्यात आणायचे असल्याचा निर्धार करायचा असल्याचेही यावेळी सांगितले.

यावेळी अमित शाह यांनी मागील १० वर्षात केंद्रात राम मंदीर, ३७० कलम आणि भारतीय नागरिकत्व कायदा आदी गोष्टी केल्याचे सांगितले.

About Editor

Check Also

शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचा निर्णय, शासकीय निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ सरकारी कर्मचारी-अधिकाऱ्यांना मोठ्य़ा आकाराची घरे मिळणार

राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या शासकीय निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात सुधारणा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *