Breaking News

माझ्यासाठी मरण्यापेक्षा आपल्या उद्देशासाठी जगा, पंकजा मुंडे यांचे आवाहन अंधाऱ्या रात्रीनंतर सुंदर प्रकाश असतो, तुम्ही माझ्या जीवनातील प्रकाश आहात..

तुम्हाला शपथ आहे, मुंडे साहेबांची..माझ्यासाठी मरण्यापेक्षा आपल्या उद्देशासाठी जगा..आई बापाला दुःख देऊ नका, त्यांच्या जीवाला घोर लावू नका असं आवाहन भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी तरूणांना केलं आहे. अंधाऱ्या रात्रीनंतर सुंदर प्रकाश असतो, तुम्ही माझ्या जीवनातील प्रकाश आहात..शांत व सकारात्मक रहा अशा शब्दांत संयम राखण्याचे आवाहन केले.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांना निसटता पराभव स्वीकारावा लागला. पराभव जिव्हारी लागल्याने त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या लाखो लोकांचे अंतःकरण जड झाले आहे. काही ठिकाणी तर तरुणांनी स्वतःचे जीवन संपवले तर अनेक गावात चुली पेटल्या नाहीत. या साऱ्या घटना कानावर आल्यानंतर पंकजा मुंडे प्रचंड व्यथित झाल्या आहेत. येस्तार (अहमदपूर) येथील सचिन कोंडीराम मुंडे या आत्महत्या केलेल्या तरूणाच्या नातेवाईकांशी काल रात्री त्यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधून त्यांचे सांत्वन केले व धीर दिला.

यासंदर्भात एक ट्विट करून त्यांनी तरूणाईला कळकळीचे आवाहन केले आहे. त्या म्हणाल्या, स्वतः च्या जीवाला धक्का तोच लावेल ज्याला माझ्यावर प्रेम किंवा श्रद्धा नाही …मी लढत आहे संयम ठेवत आहे तुम्हीही सकारात्मकता दाखवा आणि संयमाने रहा..कोणी माझ्यासाठी जीव देणे कळतेय का किती कठीण आहे माझ्यासाठी??मला प्रचंड अपराधी आणि दुःखी वाटत आहे … मी स्वीकारला आणि पचवला आहे पराभव तुम्हीही पचवा!! ..अंधाऱ्या रात्री नंतर सुंदर प्रकाश असतो तुम्ही माझ्या जीवनातील प्रकाश आहात.. शांत व सकारात्मक रहा, प्लिज, प्लिज.. माझ्यासाठी मरण्यापेक्षा आपल्या उद्देशासाठी जगा… आई बापाला दुःख देऊ नका.. त्यांच्या जीवाला घोर लावू नका.. तुम्हाला शप्पथ आहे..मुंडे साहेबांची…१५ जूनपासून मी आभार दौरा करत आहे.. तोपर्यंत सर्व जण प्रतिक्षा करा असं आवाहन पंकजा मुंडे यांनी केलं.

Check Also

पैठण, गंगापूर येथे जिल्हा अतिरिक्त न्यायालय हिंगोली स्वतंत्र न्यायिक जिल्हा परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांचे न्यायिक काम परभणीतून

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण व गंगापूर येथे जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालय तसेच हिंगोली स्वतंत्र न्यायिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *