केंद्रीय निवडणूक आयोगाचे राज्यातील निवडणूक अधिकाऱ्यांना निर्देश विधानसभा निवडणुकीची आढावा बैठक: आयोगाच्या महत्वपूर्ण निर्देशांची अंमलबजावणी

महाराष्ट्रातील सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकांसाठी आढावा बैठक आज वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मुंबई येथे पार पडली. या बैठकीत सर्व जिल्हा निवडणूक अधिकारी (DEOs), पोलीस अधीक्षक (SPs), महानगरपालिका आयुक्त (MCs), पोलीस आयुक्त (Police Commissioners), आणि निवडणूक निर्णय अधिकारी (ROs) यांनी सहभाग घेतला.

या बैठकीत निवडणूक आयोगाने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभागी होत निवडणुकीसंदर्भातील महत्वाचे निर्देश

उर्वरित १५ दिवसांमध्ये मुक्त, निष्पक्ष आणि शांततापूर्ण निवडणुकांसाठी जिल्हा निवडणूक अधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक,पोलिस आयुक्त आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांनी अधिक जवाबदारीने कार्य करावे

मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना आज स्पष्टपणे निर्देश दिले की, तक्रार निवारणासाठी, सर्वांसाठी समानपणे उपलब्ध राहावे. आपल्या नेमून दिलेल्या कामाच्या बाबतीत कोणतीही तडजोड करू नये.याशिवाय अधिकाऱ्यांना सूचित केले की, सर्व पक्ष आणि उमेदवारांसाठी समान संधी प्रदान करावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल.

निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वे आणि सूचनांनुसार निवडणूक प्रक्रियेच्या सर्व टप्प्यांमध्ये उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींना सहभागी करून घेण्याचे निश्चित करावे.

*मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी महिलांविरोधातील अपमानास्पद/अवमानकारक वक्तव्यांचा निषेध; उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचे निर्देश

मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांनी निवडणूक प्रचारादरम्यान महिला नेत्यांविरोधात करण्यात आलेल्या अपमानास्पद वक्तव्यांचा तीव्र निषेध केला.यावेळी त्यांनी महिलांच्या सन्मान आणि प्रतिष्ठेविरुद्ध वापरण्यात येणाऱ्या अवमानकारक भाषेवर चिंता व्यक्त केली.

राजकीय पक्ष आणि उमेदवारांना अशा कोणत्याही कृती, सहभाग किंवा वक्तव्यांपासून दूर राहावे, जे महिलांच्या सन्मान आणि प्रतिष्ठेविरुद्ध मानले जाऊ शकतात. तसेच, इतर पक्षांच्या नेते किंवा कार्यकर्त्यांच्या खाजगी जीवनाशी संबंधित कोणताही मुद्दा, जो त्यांच्या सार्वजनिक कार्याशी संबंधित नाही, त्यावर टीका करू नये.प्रतिस्पर्ध्यांचा अपमान करण्यासाठी खालच्या पातळीवरील वैयक्तिक हल्ले टाळावेत. असे मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांनी सांगितले.

मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांनी सर्व अधिकाऱ्यांना निर्देश दिले की, उमेदवार किंवा राजकीय नेत्यांकडून महिलांच्या सन्मान आणि प्रतिष्ठेविरुद्ध केलेले अपमानास्पद वक्तव्ये आणि आचारसंहितेचे उल्लंघन करणारी कृती आढळल्यास त्यावर वेळेवर आणि कठोर कारवाई करावी.

तसेच, यावेळी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली की, सर्व उमेदवार आणि पक्षनेते आपली भाषा आणि वर्तन उंचावतील व महिलांच्या सन्मानाशी सुसंगत वर्तणूक करतील, मग ते भाषणांमध्ये असो किंवा सार्वजनिक संवादांमध्ये.

शहरी भागांतील मतदार सहभाग वाढवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांचा जिल्हा निवडणूक अधिकारी आणि महानगरपालिका आयुक्तांना निर्देश

ज्यावेळी बस्तर ( ६८%) आणि गडचिरोली (७८%) सारख्या नक्षल प्रभावित भागांतील मतदार मतदान करू शकतात, तर कुलाबा आणि कल्याणमधील मतदार का नाही? २०१९ मध्ये कुलाबामध्ये फक्त ४०% मतदान नोंदवले गेले याबाबत मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांनी चिंता व्यक्त केली.

जम्मू आणि काश्मीरमधील संवेदनशील भागांमध्ये जसे डोडा, रेआसी, पूंछ, आणि राजौरी या विधानसभा क्षेत्रांमध्ये अलीकडील निवडणुकांमध्ये ७०% पेक्षा अधिक मतदान झाले आहे. किस्तवार जिल्ह्यातील गॉरो येथे १००% मतदानाची नोंद झाली आहे. मग पुणे, ठाणे आणि मुंबईतील शहरी मतदारसंघांमध्ये मतदान का वाढवता येत नाही याबाबत विचार होणे आवश्यक आहे.

संपूर्ण देशातील संवेदनशील भागांपैकी मणिपूरमध्ये लोकसभा निवडणुकांमध्ये ७८% मतदान झाले, तर मुंबई दक्षिण भागात जिथे उच्चभ्रू मतदारसंघात निम्मे मतदार मतदानाला गैरहजर होते.

नुकत्याच झालेल्या हरियाणा निवडणुकांमध्ये, गुरगाव आणि फरीदाबादमधील उच्चभ्रू गगनचुंबी सोसायट्यांमध्ये मतदान वाढविण्यासाठी त्यांच्या सोसायटी इमारतींमध्ये स्थापित केली गेली होती. तरी सुद्धा तेथे २०% इतकाच अल्प प्रतिसाद दिसून आला.

मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांनी सर्व अधिकाऱ्यांना विशेषतः शहरी भागांतील मतदारांपर्यंत पोहोचून विविध माध्यमांद्वारे त्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे निर्देश दिले.

मतदानाचा अनुभव सुलभ आणि आनंददायी करा

सर्व जिल्हा निवडणूक अधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सर्व मतदान केंद्रांवर आवश्यक किमान सुविधा पुरवाव्यात. मतदारांना सुलभ मतदान करता यावे यासाठी जास्त मतदार केंद्रावर रांगेत बसण्यासाठी बेंच, खुर्ची याची व्यवस्था करण्यात यावी.

मतदारांना प्रभावित करण्यासाठी कोणतीही प्रलोभन देणाऱ्या रोकड आणि मौल्यवान वस्तूंच्या वाहतुकीसाठी शासकीय वाहनांवर कडक लक्ष ठेवा.

मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी रोख रक्कम, दारू, औषधे किंवा अन्य मोफत वस्तूंचे प्रलोभन देण्याबाबतचे प्रयत्न होत असल्यास त्यावर लक्ष ठेवावे.रोकड किंवा मौल्यवान वस्तूंच्या वाहतुकीसाठी शासकीय वाहनांचा, जसे की रुग्णवाहिका किंवा व्हॅन याचा वापर होणार नाही याची खात्री करावी.
प्रचार बंदीच्या काळात, विशेषत: रात्रीच्या गस्तीसह कडक निरीक्षण राखावे.

About Editor

Check Also

अमरावतीच्या अंबादेवी संस्थानास चिखलदरा येथील एमटीडीसीची तीन एकर जमीन राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

अमरावती जिल्ह्यातील मौजे चिखलदरा येथील श्री अंबादेवी संस्थान, अमरावती यांना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची ३ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *