अजित पवार म्हणाले, पंतप्रधान महोदयांनी गांभीर्याने दखल घेण्याची वेळ आलीय

राज्याचे प्रेरणास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी केली. यापूर्वीही राज्यपाल कोश्यारी यांनी शिवाजी महाराज यांच्या गुरूविषयी असेच वक्तव्य करून राज्यात गहजब माजविला होता. त्यानंत कधी सावित्रीबाई फुले-ज्योतिबा फुले आदींबाबतही असेच वक्तव्य केले होते. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी ट्विट करत म्हणाले,  पंतप्रधानांनी महोदयांनी गांभीर्याने दखल घेण्याची वेळ आलीय. असे सांगत राज्यपालांना सदबुध्दी लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना करत खोचक टोला लगावला.

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही राज्यपालांच्या विधानाचा निषेध करत त्यांनी राज्यपाल पदावर राहावं का? याबाबत गांभीर्याने पुनर्विचार करण्याची वेळ आली असल्याची प्रतिक्रिया दिली.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना तीन वर्षांहून अधिक काळ राज्यपालपदी राहल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज समजत नसतील, महाराष्ट्र व महाराष्ट्राची लोकभावना कळत नसेल, तर त्यांनी राज्यपाल पदावर राहावं का? याबाबत गांभीर्याने पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे. राज्यपालांच्या अनावश्यक, अनाकलनीय, निंदनीय वक्तव्यांची पंतप्रधान मोदी यांनी गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.

तसेच राज्यपालांना सद्‌बुद्धी लाभो, असा खोचक टोलाही लगावला.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जगातील सर्वकालिन, सर्वश्रेष्ठ आदर्श राजे आहेत. राजसत्तेचा उपयोग विलासासाठी नव्हे, तर लोककल्याणासाठी कसा करता येतो, याचा आदर्श त्यांनी निर्माण केला आहे. छत्रपती शिवरायांना आदर्श मानून महाराष्ट्र आजवर घडला, यापुढेही घडत राहील, असेही अजित पवार आपल्या ट्विटद्वारे म्हणाले.

About Editor

Check Also

एसटी बसस्थानक स्वच्छतेसाठी दर १५ दिवसांनी विशेष मोहीम प्रवाशांच्या सुरक्षित, आरोग्यदायी प्रवासासाठी एसटी महामंडळाचा पुढाकार

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व एसटी बसस्थानकांवर, बसस्थानक परिसरात तसेच प्रशासकीय इमारतींमध्ये दर १५ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *