नाल्याच्या प्रश्नावरून…सत्ताधाऱ्यांमध्येच जुंपली, दादा कोंडके सारखे…. भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेना एसंशिचे मंत्री संजय राठोड यांच्या उत्तरावरून नापसंती

पावसाळी अधिवेशनाच्या राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर संख्येने कमी असले तरी विरोधकांकडून राज्यातील जनतेच्या प्रश्नांवरून रण उठविले जाईल अशी अटकळ बांधण्यात येत होती. मात्र संख्याबळाच्या संख्येत लहान असलेल्या विरोधकांमध्ये अनेक प्रश्नांवरून एकमत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे एकाबाजूला विरोधकांकडून दररोज विधिमंडळाच्या पायऱ्यावर आंदोलनाच्या माध्यमातून जनतेच्या प्रश्नावरून सरकारचे लक्ष वेधण्याचे प्रयत्न करत आहे. परंतु विधानसभेत मात्र सत्ताधाऱ्यांमध्ये आमदारांच्या प्रश्नांची योग्य उत्तरे दिली जात नसल्याच्या मुद्यावरून एकमेकांविरोधात नाराजी व्यक्त करत असल्याचे दिसून येत आहे.

या पार्श्वभूमीवर पावसाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस. काल काँग्रेस नेते नाना पटोले यांनी भाजपाचे आमदार तथा माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांबद्दल केलेल्या वक्तव्याचा मुद्दा उपस्थित करत या प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी माफी मागावी अशी मागणी करत ती लावून ही धरली. त्यामुळे सरकारने नाना पटोले यांना निलंबित केले. त्यावर विरोधकांनीही विधिमंडळाच्या कामकाजावर बहिष्कार टाकला.

पावसाळी अधिवेशाच्या आजच्या तिसऱ्या दिवशी मात्र विधानसभेत भाजपाचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवर आणि शिवसेना एसंशीचे मंत्री संजय राठोड यांच्यातच झुंपल्याचे दृश्य आज पाह्यला मिळाले. तसेच सुधीर मुनगंटीवार यांनी संजय राठोड यांच्या उत्तरावर असमाधानी असल्याचे सांगितले. त्यामुळे अखेर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही संजय राठोड यांना अपेक्षित उत्तर देण्याची सूचना केली.

सुधीर मुनगंटीवार यांच्या मतदारसंघातील नाला रुंदीकरणाच्या मुद्यावरून मंत्री संजय राठोड यांना सवाल केला. त्यावर संजय राठोड यांनी दिलेल्या उत्तरावर सुधीर मुनगंटीवर यांनी दादा कोंडके यांच्यासारखे उत्तर देवू नका अशा शब्दात सुणावले. तसेच यात सजेशन फॉर अक्शन काय असा सवाल केला.

त्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही मंत्र्यांनी अपेक्षित उत्तर द्यावे अशी सूचना केली.

वास्तविक सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांच्या मतदारसंघातील नाल्याचा संरक्षण भिंत नियमानुसार बांधली नाही. त्यामुळे त्याचा फटका नाल्या लगत राहणाऱ्या नागरिकांना बसतो. पाण्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण झाला, तर त्या अभियंत्यावर कारवाई करणार का असा सवाल कर जिथे नाले असतील त्यांच्या दुरुस्तीबद्दल सरकारचं नियोजन काय असाही सवाल केला.

त्यावर मंत्री संजय राठोड म्हणाले की, आम्ही नाल्याचं सर्वेक्षण करू, त्याची रूंदी तपासू ती वाढवावी लागले का ते पाहू. भूमी अभिलेख विभागाकरवी, जिल्हाधिकाऱ्यांच्या देखरेखी खाली चौकशी करू, उर्वरित नाल्याचं काम करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव पाठवू असेही यावेळी सांगितले.

त्यावर सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, नाल्याची जितकी नैसर्गिक रूंदी आहे. तितकीच राहिली पाहिजे याची शासन खबरदारी घेणार आहे का असा सवाल केला. त्यावर बोलताना मंत्री संजय राठोड म्हणाले की, सजेशन फॉर अक्शन असे उत्तर दिले.

संजय राठोड यांच्या उत्तरावर सुधीर मुनगंटीवार यांचे समाधान न झाल्याने पुढे बोलताना म्हणाले की, मंत्री राठोड हे आमचे मित्र आहेत. नाल्याची रूंदी नैसर्गिक राहिल का एवढाच माझा प्रश्न होता. त्यावर त्यांनी सजेशन फॉर अक्शन असल्याचे सांगितले. मात्र अक्शन एवढचं उत्तर अपेक्षित होतं. हे अक्शन, ओन्ली अक्शन, नो रिएक्शन असं उत्तर असलं पाहिजे होते. तसेच नाल्याची नैसर्गिक रूंदी कायम राहिले असे उत्तर येणे अपेक्षित होते. ती हमी न देता, सजेशन फॉर अक्शन हे काय उत्तर आहे? हे तर द्विअर्थी उत्तर झालं हे दादा कोंडकेच उत्तर झालं, हे द्विअर्थी आहे का असा सवाल करत हमी द्या असेही स्पष्ट शब्दात सुनावले.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या संकल्पनेतील गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार योजनेची फलश्रुती गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार २.० मुळे राज्यात जलसाठा क्षमता वाढ

राज्यातील जलसुरक्षा बळकट करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *