निवडणुकीत राज्याची तिजोरी रिकामी करणाऱ्या सरकारने आता महसूल वाढीसाठी १९७२ पासून बंदी असलेले मद्य परवाने देण्याचे लाडक्या बहिणींचे संसार उध्वस्त करणाऱ्या दारु दुकाने परवाने देण्याच्या धोरणा विरोधात महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर जोरदार आंदोलन केले.
महायुती सरकारने मद्य परवाने देऊन जनजीवन विस्कळीत करणारे धोरण आखले आहे. सत्ताधारी पक्षांनी आपले हितसंबंध जोपासण्यासाठी राज्यातील लाडक्या बहिणींचे संसार उध्वस्त करत असल्याची गंभीर टीका राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.
बाटलीवाल्या सरकारचा धिक्कार असो..दारूवाल्या सरकारचा धिक्कार असो..दारूला प्रोत्साहन देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो..दारूचा व्यवसाय करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, अशा जोरदार घोषणाबाजी यावेळी महाविकास आघाडीच्या आमदारांनी दिल्या..
Marathi e-Batmya