महेश तपासे यांचे प्रत्युत्तर, नकली राष्ट्रवादी व नकली शिवसेना ही भाजपासोबत

आमच्या राष्ट्रवादीला नकली राष्ट्रवादी संबोधणारे अमित शाह कोण अशी संतप्त प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली.

महेश तपासे पुढे बोलताना म्हणाले की, आमच्यातल्या काही नकली नेत्यांना भारतीय जनता पार्टीने या आधीच स्वतःच्या सरकारमध्ये समाविष्ट करून घेतले आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आरोप करण्याचे कुठलेही कारण नसल्यामुळे अमित शहा यांनी शरद पवारांचे कर्तुत्व काय असा अतिशय हास्यस्पद प्रश्न निवडणूक सभेदरम्यान विचारला अशी टीकाही केंद्रीय गृहमंत्र्यांवर केली.

पुढे बोलताना महेश तपासे म्हणाले की, महाराष्ट्रात आल्यावर शरद पवारांवर टीका केली नाही तर मथळे तयार होत नाही आणि म्हणूनच जुमला पार्टीच्या नेत्यांना शरद पवारांवर काहीतरी बोलावं लागतं, परंतु महाराष्ट्राच्या बारा कोटी जनतेला शरद पवारांचे राज्यासाठी काय योगदान आहे याची पूर्ण कल्पना आहे असा टोलाही यावेळी लगावला.

About Editor

Check Also

राज्यातील तरूणांना मिळणार जगभरातील रोजगार संधी, नव्या संस्थेची स्थापना विविध देशातील रोजगारासंबंधी समन्वयासाठी MAHIMA संस्थेची स्थापना

जगभरातील विविध  देशातील रोजगारासंबंधी समन्वय आणि अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र व्यापक आंतरराष्ट्रीय गतिशीलता आणि क्षमता संस्था (Maharashtra …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *