Breaking News

मनसेने पुन्हा घेतली निवडणूकीच्या रिंगणातून माघार अभिजित पानसे पुन्हा अर्ज काढून घेणार

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनविण्यासाठी राज्यात अजित पवार गट, एकनाथ शिंदे गट आणि भाजपाला पाठिंबा जाहिर करत पक्षाच्यावतीने उमेदवारही उभे केले नाहीत. २०१९ साली झालेल्या लोकसभा निवडणूकीतही राज ठाकरे यांनी उमेदवार न देता काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा जाहिर केला होता. आता लोकसभा निवडणूका झाल्यानंतर मनसेने पदवीधर मतदारसंघातून भाजपाच्या निरंजन डावखरे यांनी उमेदवारी अर्ज भरलेला असताना त्यांच्या विरोधात मनसेकडून अभिजीत पानसे यांनी उमेदवारी अर्ज भरला मात्र देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेताच अभिजीत पानसे निवडणूकीच्या रिंगणातून माघात घेतल्याची माहिती पक्षाच्यावतीने एक्स या मायक्रो ब्लॉगिंग साईटवर देण्यात आली.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या सततच्या बदल्या भूमिकेमुळे मागील काही वर्षात मनसे उमेदवारांचा दारून पराभव होत आहे. त्यातच मध्यंतरीच्या काळात मुंबई महानगरपालिकेत मनसेचे निवडूण आलेले सातही नगरसेवकांनी शिवसेना उबाठा गटात प्रवेश केला. तर २०१९ आणि २०२४ च्या लोकसभा निवडणूकीत मनसेकडून कधी राज्यातील आघाडीला तर कधी भाजपाला पाठिंबा दिला. त्यामुळे मनसेबाबत राज्यातील विशेषतः मुंबईतील कार्यकर्त्यांमध्ये पक्षाच्या विश्वासाहार्यतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

https://x.com/mnsadhikrut/status/1798974068236197999

त्यातच विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघातून निवडून जायच्या जागेवरून मनसेकडून पहिल्यांदाच भाजपाला दिलेल्या पहिल्या पाठिंब्याच्या बदल्यात अभिजित पानसे यांना मनसेने उमेदवारी जाहिर केली. विशेष म्हणजे या जागेसाठी भाजपाने यापूर्वीच ठाण्याचे आमदार निरंजन डावखरे यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली. मात्र या जागेसाठी आणि मनसेने आपला उमेदवार मागे घ्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि निरंजन डावखरे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत काय चर्चा झाली याची माहिती कळू शकली नाही. त्याचबरोबर मनसेकडूनही याबाबत अधिकृत सांगण्यात आली नाही. मात्र या निवडणूकीतून अभिजित पानसे यांनी माघार घेतल्याची अधिकृत घोषणा मनसेच्या अधिकृत एक्स वरील ट्विटर हॅण्डलवरून जाहिर करण्यात आली.

Check Also

पैठण, गंगापूर येथे जिल्हा अतिरिक्त न्यायालय हिंगोली स्वतंत्र न्यायिक जिल्हा परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांचे न्यायिक काम परभणीतून

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण व गंगापूर येथे जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालय तसेच हिंगोली स्वतंत्र न्यायिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *