राज्यातील विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू करण्यात आल्यानंतर मनसेकडून यापूर्वीच जाहिर केल्याप्रमाणे राज्यातील विधानसभा निवडणूकीत २८८ जागा लढविणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आज उमेदवारांची पहिली यादी आज जाहिर करण्यात आली. या यादीत दोन उमेदवारांची नावे जाहिर करण्यात आली.
शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना उबाठा गट, राष्ट्रीय स्वंयसेवक संघ आणि बीडमधील पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्यानंतर राज ठाकरे यांनीही कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात बोलताना महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूका मनसे लढविणार असून या निवडणूकीत कोणाशीही युती-आघाडी करणार नसल्याचे सांगत एकला चलो रे प्रमाणे मनसे स्वतंत्र निवडणूका लढविणार असल्याचे जाहिर केले.
तसेच मनसेकडून महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीच्या २८८ जागा लढविणार असल्याची घोषणाही त्यावेळी राज ठाकरे यांनी जाहिर केली होती. त्यानुसार मनसे प्रमुख राज ठाकरे हे त्यांच्या पक्षाच्यावतीने कोणाकोणाला उमेदवारी देणार आणि कोणकोणत्या मतदारसंघात उमेदवार उभे करणार याबाबत उत्सुकता होती. त्यानुसार आज विधानसभा निवडणूकीसाठी राज ठाकरे यांनी मनसेच्या दोन उमेदवारांची नावे जाहिर केली.
आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या नवनिर्माणातील राजसाहेबांचे शिलेदार !!
श्री. अविनाश जाधव @avinash_mns
महाराष्ट्र नवनिर्माण सेना अधिकृत उमेदवार ठाणे शहर विधानसभा.#MNSAdhikrut #विधानसभा_२०२४ pic.twitter.com/vEYIgvwTKi— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) October 21, 2024
राज ठाकरे यांनी कल्याण ग्रामीणचे विद्यमान आमदार राजू पाटील यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहिर केली असून टोलच्या प्रश्नावर मंध्यतरी आंदोलन करणारे आणि राज्य सरकारच्या विरोधात उपोषणाचे आंदोलन करणाऱे अविनाश जाधव यांना ठाणे शहरामधून उमेदवारी जाहिर केली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या नवनिर्माणातील राजसाहेबांचे शिलेदार !!
श्री. प्रमोद (राजू) पाटील @rajupatilmanase
महाराष्ट्र नवनिर्माण सेना अधिकृत उमेदवार कल्याण ग्रामीण विधानसभा.#MNSAdhikrut #विधानसभा_२०२४ pic.twitter.com/OnBtbLlBEe— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) October 21, 2024
राज ठाकरे यांनी आपल्या दोन उमेदवारांच्या माध्यमातून ठाणे शहरातील भाजपाचे विद्यमान आमदार संजय केळकर यांच्या विरोधात उमेदवार दिला आहे. तर कल्याण ग्रामीणमधून राजू पाटील यांची उमेदवारी कायम ठेवली आहे.
दरम्यान काल रात्री उशीरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपा नेते देवेंद्र फडणवीस आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यात एक बैठक झाली. या बैठकीत मनसेप्रमुख राज ठाकरे हे काही जागांवर महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा देणार असल्याचे जाहिर केले. त्यामुळे राज ठाकरे हे २८८ जागांवर उमेदवार देणार नसून काही निवडक ठिकाणी उमेदवार देणार असल्याचे स्पष्ट झाले.
Marathi e-Batmya