“हे ऐकायला कोणी तयार नसतात” असे सांगत राज ठाकरे यांनी मिनिटात सभा संपवली भिंवडीत सभेत प्रकृतीचे कारण देत सभा दोन मिनिटात संपवली

राज्यातील विधानसभा निवडणूकीचा प्रचार शिगेला पोहोचत शेवटच्या टप्प्यात पोहोचला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मुंबईतील भाजपाची प्रचारसभा शेवटची असल्याचे सांगत निवडणूकीच्या प्रचारसभांतून बाहेर पडले. मात्र शेवटच्या टप्प्यातील प्रचारासाठी इतर पक्षाच्या स्टार प्रचारकांनी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी आजही प्रचार अद्याप कायम सुरु ठेवला असून राहुल गांधी, मल्लिकार्जून खर्गे आदी नेत्यांकडून महाराष्ट्रात प्रचार सुरुच ठेवला आहे. त्यातच मागील काही दिवसांपासून मनसेच्या प्रचारासाठी ठाणे आणि मुंबईसह राज्यातील काही भागात राज ठाकरे यांनी जाहिरसभा घेतल्या. या सगळ्या पार्श्वभूमीवर आज भिवंडीतील प्रचारसभेसाठी आलेल्या मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी माझी प्रकृती जरा नाजूक झाल्याचे सांगत आणि हे ऐकायला कोणी तयार नसतं असे सांगत अवघ्या काही मिनिटात प्रचारसभा संपवली आणि तेथून ते कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात निघून गेले.

विधानसभा निवडणूकीसाठी आणि भिवंडीतील मनसे उमेदवाराच्या प्रचारासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे हे आले होते. तेथील जनतेला संबोधित करताना राज ठाकरे यांचा आवाज बारीक झाला होता. तरीही राज ठाकरे यांनी बोलताना सांगितले की, मी सगळीकडे बोलून आलोय, काय बोलायचं ते सांगितले. पण हे ऐकायला कोणी तयार नसतात. माझी प्रकृती थोडीशी नाजूक आहे. बरं वाटत नाहीय. पण मी तुमचं दर्शन घ्यायला आलो. प्रत्यक्षात भेटलो. पण २० तारखेला गाफील राहु नका असे आवाहन करत आपले मित्र परिवार, नातेवाईक या सर्वांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मतदान करायचं असे आवाहन करायला विसरू नका असेही यावेळी सांगितले.

दरम्यान, आज मनसेने जाहिरनामा प्रसिद्ध करत त्यातील पहिल्या भागातमुलभूत गरजा, दर्जेदार जीवनमान, पुरेसं अन्न, पिण्याचं पाणी, कायदा-सुव्यवस्था, महिला सुरक्षा, क्रिडा, बाल संगोपन, प्राथमिक शिक्षण आणि रोजगार याचा उल्लेख आहे.

दुसऱ्या भागातः-दळणवळण, वीज, पाणी पाण्याचं नियोजन, महाराष्ट्रभर शहरांचे जाळे, धनकचरा व्यवस्थापन, मलनिसःरण, मोकळ्या जागा, पर्यावरण जैवविधता याचा समावेश आहे.

तर तिसऱ्या भागात राज्याचं औद्योगिक धोरण, व्यापार धोरण, प्रशासन आणि उद्योग नियंत्रण, कृषी पर्यटन आणि व्यावसायिक शिक्षण आदी गोष्टींचा समावेश आहे.

तर चवथ्या भागात मराठी अस्मिता, मराठी भाषेचा प्रचार, दैनंदिन वापरात मराठी, व्यवहारात मराठी, डिजीटल जगतात मराठी जागतिक व्यासपीठावर मराठी, गड किल्ले संवर्धन, पारंपारीक खेळ आदी विषयांचा समावेश करण्यात आला आहे.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, अशोक खरात महाराष्ट्राचा ‘आसाराम बापू’, खरातला कोणाचा राजकीय आशिर्वाद? राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष भोंदूबाबाच्या पाद्यपुजा करतात हेच पुरोगामी महाराष्ट्राचे दुर्दैव, रुपाली चाकणकरांची हकालपट्टी करा

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातला पोलिसांनी बेड्या ठोकल्या ते बरेच झाले पण हा भोंदूबाबा महाराष्ट्राचा आसाराम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *