नाना पटोले यांचा आरोप, जिथे भाजपाची सत्ता आहे त्या राज्यांची अधोगती राज्यातील गुजरातधार्जिणे व केंद्र सरकारच्या महाराष्ट्रद्रोही भूमिकेमुळेच महाराष्ट्राची अधोगती

भारतीय जनता पक्षाचे सरकार केंद्रात व राज्यात आल्यापासून मागील १० वर्षात महाराष्ट्राची पिछेहाट होत असल्याचा विरोधी पक्षांचा आरोप नव्हता तर वस्तुस्थिती आहे यावर केंद्रातील भाजपा सरकारनेच शिक्कामोर्तब केले आहे. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेनेच हा अहवाल दिला असून राज्यातील शिंदे भाजपाचे गुजरात धार्जिणे सरकार व केंद्र सरकारच्या महाराष्ट्रद्रोही भूमिके मुळेच महाराष्ट्राची अधोगती झाल्याचा घणाघाती हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला.

यासंदर्भात प्रतिक्रिया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, सकल राज्य उत्पन्न आणि दरडोई उत्पन्नात गुजरातची विशेष प्रगती झाली असून गुजरातचा वाटा ८ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. दरडोई उत्पन्नात गुजरातने महाराष्ट्राला मागे टाकले आहे. तेलंगणा, गुजरात, हरियाणा, तामिलनाडू, पंजाब ही राज्ये महाराष्ट्राच्या पुढे गेली आहेत. २०१० मध्ये १५ टक्के वाटा असलेल्या महाराष्ट्राची पिछेहाट होऊन हा वाटा १३ टक्क्यांपर्यंत घटला आहे. गुजरात राज्य स्वबळावर आपली प्रगती करत नसून महाराष्ट्राच्या वाट्याची गुंतवणूक हिरावून विकास साधत आहे. दक्षिणेत भाजपची सत्ता नाही, तिथल्या राज्यांनी प्रगतीची नवी वाट धरल्याचे दिसून येते. यावरून भारतीय जनता पक्षाची सत्ता महाराष्ट्राला घातक ठरली आहे हे स्पष्ट होते. महाराष्ट्राच्या प्रगतीला खिळ घालणाऱ्या शिवद्रोही, महाराष्ट्रद्रोही भाजपा युती सरकारला आता सत्तेतून खाली खेचल्याशिवाय महाराष्ट्राची स्वाभिमानी जनता स्वस्थ बसणार नाही अशी घोषणाही यावेळी केली.

पुढे बोलताना नाना पटोले म्हणाले की, २०१४ पासून भाजपाचे केंद्रात व राज्यात सरकार आल्यापासून सातत्याने महाराष्ट्रावर अन्याय केला जात आहे. महाराष्ट्रात येणारी गुंतवणूक गुजरातसह दुसऱ्या राज्यात जाणीवपूर्वक वळवली जात आहे. महाराष्ट्राला केंद्राकडून कमी निधी दिला जातो, महाराष्ट्राची प्रगती गुजरातच्या डोळ्यात सतत खुपत आली आहे. महाराष्ट्राची पिछेहाट होत असतानाही एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करून महाराष्ट्र आघाडीवरच असल्याचा खोटा व फसवा दावा करत आहेत. केंद्रातील भाजपा सरकारनेच महाराष्ट्राची अधोगती झाल्याचे अधोरेखीत केले आहे, त्यावर तरी फडणविसांनी विश्वास ठेवायला हवा. विरोधकांना अहवालच वाचता येत नाही अशा थापा फडणविसांनी मारु नयेत, फुले शाहू आंबेडकरांनी बहुजनांना ही शिक्षित केले आहे. पुरोगामी महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे त्यांना सर्व समजते. महाराष्ट्राच्या अधोगतीला जबाबदार असलेल्या भाजपा, देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदेंच्या सरकारला आता घरी बसवले तरच महाराष्ट्राची प्रगती होईल अन्यथा महाराष्ट्राला हे डबल इंजिनवाले कंगाल करतील, अशी भीतीही यावेळी व्यक्त केली.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, नगरपालिका निवडणुकांमध्ये लोकशाहीचे वस्त्रहरण सालेकसामध्ये मतदान संपल्यावर १७ ईव्हीएमचे सील तोडून पुन्हा मतदान पण गुन्हा दाखल नाही

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये बोगस मतदान, दडपशाही व सर्व नियम धाब्यावर बसवून मतदान झाले. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *