नरसय्या आ़डम पंतप्रधानांच्या उपस्थितीतच म्हणाले, १ लाख लोकांना रोजगार…

सोलापूरातील शहरातील विडी कामगारांना हक्काची घरे मिळावित या उद्देशाने मागील अनेक वर्षे लढा पुकारलेल्या, कम्युनिस्ट पक्षाकडून दोन वेळा आमदार म्हणून राहिलेले माजी आमदार नरसय्या आडम यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रोजगार निर्मितीसाठी दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देत मिलीटरी कापड निर्मितीची काम दिल्यास येथील एक लाख लोकांना रोजगार उपलब्ध होईल अशी मागणी कुंभारी येथील विडी कामगारांना घर वाटपाच्या कार्यक्रमात प्रास्तावित करताना केले.

या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना नरसय्या आडम म्हणाले की, विडी कामगारांना हक्काचे घर मिळावे त्यांच्या मुलांना चांगले शिक्षण आणि आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावेत या उद्देशाने हे गृहसंकुल राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या योजनेतून उभारण्यात आले. या कामगारांसाठी बांधण्यात आलेल्या घरांना पाणी पुरवठाच करण्यात येत होत नव्हता. तसेच मुख्य शहरापासून हे गृहनिर्माण संकूल थोडेसे दूरच्या अंतरावर असल्याने येथील कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांना आरोग्य सुविधा आणि शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध पुरेशा होत नव्हत्या. मात्र आता त्यासाठी या गृहसंकुलात याची सुविधा उपलब्ध सोलापूर महापालिका आणि राज्य सरकारच्या मदतीने उपलब्ध करून देण्यात येत असल्याचेही सांगितले.

नरसय्या आडम पुढे बोलताना म्हणाले की, सोलापूर शहरातील वस्त्रोद्योग अर्थात पोशाख निर्मितीच्या कामात आणि विडी वळण्याच्या कामात पद्मशाली समाज मोठ्या प्रमाणावर आहे. तसेच या दोन उद्योगामुळे हैद्राबाद-आंध्र प्रदेशातील समाज मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या निमित्ताने येथे येऊन स्थिरावतो. मात्र या दोन्ही उद्योगांची वाढ झाली नसल्याने येथे येथून स्थिरावणाऱ्या लोकांना रोजगार मिळू शकत नाही. त्यामुळे मिलिटरीसाठी लागणाऱ्या गणवेशाची अर्थात पोशाख निर्मितीचे काम उपलब्ध करून दिल्यास येथील १ लाख तरूणांना रोजगार उपलब्ध होईल असेही स्पष्ट केले.

याशिवाय नरसय्या आडम यांनी स्पष्ट केले की, शहरात ६७ लाख निवृत्तीचे जीवन जगत आहेत. मात्र त्यांना फक्त एक हजार रूपयांपर्यंतची पेन्शन मिळते. त्या एक हजार रूपयात त्यांनी आपले जीवन कसे काढावे असे आवाहन करत संघटीत क्षेत्रातील कामगारांप्रमाणे, असंघटीत आणि विडी उद्योगातील कामगारांना किमान १० हजार रूपयांची पेन्शन मिळावी अशी मागणीही यावेळी पंतप्रधानांच्या उपस्थितीत केली.

यावेळी बोलताना नरसय्या आडम यांनी सोलापूर ही क्रांतीकारकांची भूमी आहे अशी आठवणही करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करून दिली.

About Editor

Check Also

मुंबईत पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या ४५ हजार घरांच्या हाऊसिंग टाऊनशिपला मंजूरी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबई पोलीसांसाठी शासकीय निवासस्थाने गृहनिर्माण प्रकल्पाला मंजूरी

मुंबई शहर व उपनगरातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी सुमारे ४० ते ४५ हजार शासकीय निवासस्थाने उपलब्ध …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *