राजकारण

भाजपाच्या संबित पात्राला काँग्रेस शिकविणार कायदेशीर धडा काँग्रेस नेते नसीम खान यांचा इशारा

मुंबईः प्रतिनिधी भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी सोशल मीडियावर खोटा व्हिडिओ शेअर करुन आपली तसेच काँग्रेस पक्षाची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी त्यांना कायदेशीर धडा शिकवणार असल्याचा इशारा काँग्रेस नेते नसीम खान यांनी देत त्यांच्या विरोधात मुंबई पोलीस आयुक्त, साकीनामा पोलीस स्टेशन, निवडणूक आयोगाकडेही यासंदर्भात तक्रार दाखल केल्याचे त्यांनी सांगितले. …

Read More »

वीज ग्राहकांना कमी दरात वीज देण्यासाठी जनसुनावण्या घेणार ऊर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत यांचे आश्वासन

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील जनतेला कमीत कमी दरात वीज उपलब्ध व्हावी या अनुषंगाने वीजदरा संदर्भात एमईआरसीकडे प्रस्ताव आला आहे. या वीज दरासाठी जनसुनावण्या घेण्यात येतील असे आश्वासन राज्याचे ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी देत महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेला देखील आपले म्हणणे मांडता येणार असून त्यानंतर एमईआरसीने घेतलेला निर्णय शासनाकडे येईल आणि …

Read More »

महिला व बालकांच्या सुरक्षिततेत हयगय करणाऱ्यांची गय नाही गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याचे मुख्यमंत्री ठाकरेंचे आदेश

मुंबई: प्रतिनिधी महिला व बालकांची सुरक्षितता हा शासनाच्या सर्वोच्च प्राधान्याचा विषय असून यात हयगय करणाऱ्यांना माफी नाही असे स्पष्ट करून मुख्यमंत्री म्हणाले की, पोलीस यंत्रणेतील कोणतीही व्यक्ती, मग ती अधिकारी असेल किंवा कर्मचारी जे या कामात टाळाटाळ करतील किंवा विलंब लावतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच संबधित गुन्हेगारांवर …

Read More »

देशाबाहेर काढणारा कायदा नसल्याचे म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आता जाहीर समर्थन करावे भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांचे आवाहन

मुंबईः प्रतिनिधी नागरिकत्व सुधारणा कायदा अर्थात सीएएबदद्ल गैरसमज आहेत. हा कोणालाही देशाबाहेर काढण्याचा कायदा नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतेच म्हणाले. त्यामुळे त्यांनी आता सीएएच्या समर्थनाची उघड आणि स्पष्ट भूमिका जाहीर करावी, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी केले. मुख्यमंत्री ठाकरे यांची बुधवारच्या मुलाखतीतील …

Read More »

भाजपाच देशद्रोही अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची टीका

मुंबईः प्रतिनिधी दिल्ली विधानसभा निवडणुकीत जनता भाजपा हीच देशद्रोही आहे हे मतदान करुन सिद्ध करेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केला. दिल्ली विधानसभा निवडणुकीत मोदींनी जनतेला देशद्रोहींच्या विरोधात मतदान करण्याचे आवाहन केले आहे. मोदींच्या या आवाहनावर बोलताना नवाब मलिक यांनी मोदींवर निशाणा …

Read More »

हेगडेंच्या त्या वक्तव्यप्रकरणी भाजपा नेत्यांनीच माफी मागावी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची मागणी

मुंबईः प्रतिनिधी भाजपचे खासदार अनंतकुमार हेगडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल केलेले वक्तव्य अत्यंत आक्षेपार्ह आहे. भाजपा व संघ परिवाराकडून महात्मा गांधींबद्दल वारंवार अशी अपमानजनक वक्तवे केली जात असताना त्यांना भाजपचे शिर्षस्थ नेतृत्व पाठीशीच घालत असल्याचे दिसते. हेगडेंचे आजचे वक्तव्यही संतापजनक आणि निषेधार्ह आहे. या वक्तव्यप्रकरणी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनीच माफी …

Read More »

राजकिय नेत्यांचे फोन टॅपिंग प्रकरण ६ आठवड्यात तपासणार गृहमंत्री अनिल देशमुख यांची ग्वाही

मुंबईः प्रतिनिधी राजकिय फायद्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांचे फोन टॅप करण्याचे काम तत्कालीन सरकारने केले. यासंदर्भातच्या तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी तक्रारी केल्यानंतरच चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार ६ आठवड्यात याची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. मंत्रालयातील विधिमंडळ व मंत्रालय वार्ताहर संघात आयोजित …

Read More »

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे धनंजय मुंडेंना आदेश अनुसूचित जातीच्‍या विद्यार्थ्यांसाठी रोजगार आणि करिअर प्रशिक्षण आयोजित करा

मुंबईः प्रतिनिधी सामाजिक न्याय खात्यामार्फत अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्धी आणि प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्याच्यादृष्टीने व्यापक स्वरूपात प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्याचे आदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना दिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीस …

Read More »

बिदरच्या धर्तीवर मुंबईतील शाळा चालकांवरही देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांची मागणी

मुंबईः प्रतिनिधी बिदरमधील विद्यार्थ्यांनी सुधारित नागरिकता कायद्याविरोधात (सीएए) नाटक सादर केल्यावरुन त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला जात असेल तर त्याच धर्तीवर मुंबईतील शाळकरी मुलांना सीएएच्या समर्थनासाठी वेठीस धरणारे शाळा व्यवस्थापन, आयोजक यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. भाजपशासित राज्यात सीएएविरोधात …

Read More »

मुंबईत सफाई कर्मचाऱ्यांसाठी १६ हजार घरे देणार सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी मुंबई शहरात सफाई कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी 16 हजार घरे मुंबईत उपलब्ध करुन देणार असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत मंत्रालयात आयोजित बैठकीत मुंडे बोलत होते. राज्यातील सफाई कामगारांच्या अनेक समस्या आहेत. त्या सोडविण्यासाठी त्वरित कार्यवाही सुरु आहे. …

Read More »