मुंबई : प्रतिनिधी शेतकऱ्यांनी टोकाची भूमिका घ्यावी, असा सल्ला देणाऱ्या शरद पवारांचीच नियत खोटी आहे. दहा वर्षे देशाचे कृषीमंत्री असताना शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यापेक्षा क्रिकेटवर डोळा ठेऊन आयपीएलमध्ये गुंतलेले शरद पवार सत्ता गेल्यावर वैफल्यातून शेतकऱ्यांना भडकावण्याचा घृणास्पद प्रकार करत असल्याची खरमरीत टीका राज्य कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी केली. शेतकऱ्यांच्या संपाबद्दल …
Read More »मंत्रालयातील मुख्यमंत्री कार्यालय बनले भाजप प्रदेशचे कार्यालय मुख्यमंत्र्यांकडून पक्षिय कारणासाठी सरकारी यंत्रणेचा गैरवापर
मुंबई : प्रतिनिधी राज्यात गतिमान सरकार-पारदर्शक कारभाराचा नारा देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले. मात्र सत्तेत आल्यानंतर पक्षांतर्गंत राजकिय कामकाजाची माहिती देण्यासाठी भाजपची स्वतंत्र यंत्रणा असताना त्यांच्या राजकिय कामाकाजाची माहिती त्यांच्याच दस्तुरखुद्द मुख्यमंत्री कार्यालयाकडून पुरविण्यात येत असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडूनच सरकारी यंत्रणेचा गैरवापर करण्यात येत असल्याची धक्कादायक बाब नुकतीच उघडकीस …
Read More »विधीमंडळाचे अधिवेशन ४ जुलै पासून नागपूरला राज्यपाल सी.विद्यासागर राव यांच्याकडून तीन महिन्यानंतर आदेश
मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या विधीमंडळाचे अधिवेशन ४ जुलै २०१८ पासून नागपूर येथे सुरु होणार आहे. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद १७४, खंड (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारात विधान भवन, नागपूर येथे ही बैठक बोलविली आहे. विधान सभेचे कामकाज बुधवार दि. ४ जुलै २०१८ रोजी सकाळी ११.०० …
Read More »भंडारा-गोंदियाच्या विजयानंतर मोदींच्या हुकुमशाहीविरोधावर शिक्कामोर्तब राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचे प्रतिपादन
मुंबई : प्रतिनिधी भंडारा-गोंदियाचा निकाल म्हणजे मोदींच्या हुकुमशाहीविरोधावर शिक्कामोर्तब झाले असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेमध्ये देतानाच पालघरमध्ये मतविभाजनाचा फायदा भाजपला झाला नाहीतर तीही जागा भाजपला जिंकता आली नसती अशी टिकाही नवाब मलिक यांनी यावेळी केली. बहुजन विकास आघाडीला काँग्रेस पक्षाने पाठिंबा दयावा अशी …
Read More »शिवसेनेबरोबर युतीसाठी भाजपा सदैव तयार मुख्यमंत्री फडणवीस यांचे वक्तव्य
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील आगामी निवडणुकांमध्ये युती करण्याबाबत चर्चा करण्यासाठी भारतीय जनता पार्टी नेहमीच तयार आहे. पण शिवसेनेलाच युती करायची नसेल तर पालघरमध्ये लढलो, भविष्यात इतरत्र लढू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी स्पष्ट केले. या पोटनिवडणुकीत ईव्हीएम मशीनमध्ये झालेल्या बिघाडामुळे तसेच भंडारा-गोंदियामधील दुष्काळामुळे भाजपाचे मोठे नुकसान झाले असल्याचा दावाही …
Read More »निवडणूक आयोगावरच केस केली पाहिजे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांची मागणी
मुंबई : प्रतिनिधी पालघर मध्ये झालेल्या लोकसभा पोटनिवडणूकीत रात्रीत ८५ हजार मते कशी वाढतात? ऐनवेळी इलेक्ट्रॉनिक मशिन्स कशी बंद पडायला लागतात ? असा सवाल करत निवडणूकीच्या प्रचाराच्या काळात पैसे वाटणारे कार्यकर्त्ये भाजपच्या नेत्यांचे नाव घेतात. मात्र त्यावर निवडणूक आयोगाकडून कोणतीच कारवाई केली जात नाही. त्यामुळे या सर्व राजकिय पक्षांनी निवडणूक …
Read More »पालघरमध्ये भाजपने जागा राखली मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रतिष्ठा राखली
मुंबई : प्रतिनिधी मुंबई : प्रतिनिधी राज्यातील पालघर आणि भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूकीचे निकाल जाहीर झाले. या निवडणूकीत लोकसभेतील संख्याबळात घट झाली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी प्रतिष्ठेची असलेली पालघरची जागा भाजपला राखण्यात यश आले. भाजपचे खासदार चिंतामण वणगा यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर भाजपकडून काँग्रेसमधून आयात केलेले राजेंद्र गावित यांना …
Read More »सहकारी मंत्र्याचे निधन होवूनही मुख्यमंत्र्यांकडून उद्घाटने करत भावनाशून्यतेचे प्रदर्शन तंबाखू विरोधी प्रदर्शनाला भेट देत इलेक्ट्रीक वाहनांचे उद्गाटन केले
मुंबई : प्रतिनिधी राज्याचे कृषी मंत्री पांडूरंग उर्फ भाऊसाहेब फुंडकर यांच्या निधनाला काही तासांचा अवधी लोटत नाहीत तोच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या राज्यात दुखवटा जाहीर करण्याऐवजी मंत्रालयाच्या दालनात उद्घाटने आणि प्रदर्शनांना भेटी देत आपल्या भावना शुन्यतेचे जाहीर प्रदर्शन केले. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळातील सहकारी मंत्र्याचे निधन होवूनही मुख्यमंत्र्यांनी दाखविलेल्या …
Read More »ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाण असणारा नेता गेला कृषी मंत्री पांडूरंग उर्फ भाऊसाहेब फुंडकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकऱ्यांचा आवाज आणि राज्याचे कृषीमंत्री पांडूरंग फुंडकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने आज पहाटे ४.३५ वाजता सोमय्या रूग्णालयात निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार असून उद्या सकाळी ११ वाजता त्यांच्यावर त्यांच्या खांमगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. …
Read More »राष्ट्रवादीच्या मोहीते-पाटील साम्राज्याला मोठा धक्का सोलापूर जिल्हा बँकेचे संचालक मंडळ बरखास्त
मुंबई : प्रतिनिधी गेली अनेक वर्षे सोलापूर जिल्हा बँकेवर सत्ता असलेले राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या गटाचे संचालक मंडळच बरखास्त करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील मोहिते-पाटील गटाला मोठ्या प्रमाणावर धक्का बसला असून या बँकेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती सहकार विभागातील विश्वसनीय …
Read More »
Marathi e-Batmya