राजकारण

गृहनिर्माण मंत्र्यांच्या चौकशीची माहिती द्या सामान्य प्रशासन विभागाचा गृहनिर्माण विभागाला अजब आदेश

मुंबई : प्रतिनिधी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत असतानाच अनेक आमदारांकडून राज्य सरकारच्या कामकाजाबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येतात. मात्र मुंबईतील ताडदेव येथील एम.पी.मिल कंपाऊडमधील प्रकल्पाला मंजूरी प्रकरणी गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता हे संशयाच्या भोवऱ्यात असल्याने त्यांची चौकशी लोकायुक्तामार्फत झाली का नाही याची माहिती गृहनिर्माण विभागानेच द्यावी असा अजब आदेश राज्याच्या …

Read More »

विरोधकांचा १२ डिसेंबरला विधानभवनावर जनआक्रोश हल्लाबोल मोर्चा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद नेतृत्व करणार

नागपूर : प्रतिनिधी सरकारला नाकर्तेपणाचा जाब विचारण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार आणि राज्यसभेचे विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांच्या नेतृत्वाखाली १२ डिसेंबर २०१७ रोजी विधानभवनावर जनआक्रोश हल्लाबोल मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह शेकाप, समाजवादी पक्ष, रिपाई (कवाडे) आदी सहभागी होणार असल्याची माहिती माजी मंत्री …

Read More »

नाना पटोले काँग्रेसच्या वाटेवर पक्ष संघटनेत महत्वाचे स्थान मिळण्याची शक्यता

मुंबई: प्रतिनिधी गेले काही दिवस शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावरून आणि राज्य व केंद्र सरकारच्या कारभारवरून भाजपचे खासदार नाना पटोले यांनी सातत्याने टीका सुरु केली होती. मात्र त्याची दखल भाजपश्रेष्ठींकडून घेण्यात न आल्याने अखेर त्यांनी कंटाळून भाजप सदस्यत्वाचा आणि खासदारकीचा राजीनामा देत घरवापसी अर्थात काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याच्या हालचाली सुरु केल्या असून …

Read More »

भाजपच्या अकार्यक्षम आणि उदासीनतेचा परिपाक म्हणजे पटोलेंचा राजीनामा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांची टीका

मुंबईः प्रतिनिधी गुजरात निवडणूकांचा निकाल जाहीर व्हायच्या आधीच भाजपचे खासदार नाना पटोले यांनी खासदारकीचा आणि पक्ष सदस्यत्वाचा शुक्रवारी राजीनामा दिला. मात्र पटोले यांचा राजीनामा म्हणजे भाजपच्या अकार्यक्षम आणि उदासीन धोरणांचा परिपाक असून भाजपलाच हा घरचा आहेर असल्याची टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी केली. नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणूकीत …

Read More »

गुजरातची निवडणूक ठरविणार महाराष्ट्रातील राजकारण पुढील राजकिय वाटचालीच्या अनुषंगाने सर्वच राजकिय पक्षांकडून चाचपणी

मुंबई : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांचा बालेकिल्ला असलेल्या गुजरात विधानसभेच्या निवडणूकांची रणधुमाळी सुरु आहे. गुजरात विधानसभेचा निकाल १८ डिसेंबरला जरी लागणार असला तरी त्या निवडणूकीच्या निकालावर महाराष्ट्रातील राजकारणाची गणिते अवलंबून बदलणार असून शिवसेनेची भूमिका आणि विरोधातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमधील आघाडीचे भवितव्यही ठरणार आहे. प्रत्येक राजकिय पक्षाकडून …

Read More »

विधान परिषद निवडणूकीत विरोधकांची मते पुन्हा फुटलेलीच भाजपच्या प्रसाद लाड यांना २०९ तर विरोधकांच्या दिलीप मानेंना अवघी ७३ मते

मुंबई: प्रतिनिधी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले आणि महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे प्रमुख नारायण राणे यांच्या विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक झाली. या निवडणूकीत कॉंग्रेसचे दिलीप माने आणि भाजपचे प्रसाद लाड यांच्यात थेट लढत झाली. या लढतीत अपेक्षे  प्रमाणे प्रसाद लाड यांचा विजय निश्चित मानला जात होता. मात्र निकाल …

Read More »

राज्यातील उद्योग वाढीसाठी उत्तम पायाभूत सुविधांना चालना विकासासाठी ३२ सांमज्यस करार करण्यात आल्याची मुख्यमंत्र्यांची माहीती

मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या विकासाच्य आणि उद्योग वाढीच्या दृष्टीकोनातून पायाभूत सुविधांच्या कामांना मोठ्या प्रमाणात चालना देण्यात आली आहे. याचाच एक भाग म्हणून नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाची तयारी पूर्ण होत आली असून २०१९ पर्यंत पहिले टर्मिनल आणि रनवे तयार होणार आहे. तर मुंबईला राज्याच्या इतर भागाशी जोडणाऱ्या ट्रान्स हार्बर लिंकचे कामही येत्या …

Read More »

हिवाळ्याच्या सुरुवातीलाच विरोधकांकडून राजकिय वातावरण तापविण्याचा प्रयत्न सरकार विरोधात राष्ट्रवादीचा हल्लाबोल तर काँग्रेसकडून शेतकरी संघटनांना एकत्र आणण्याचे काम

मुंबईः प्रतिनिधी वातावरणातील बदलामुळे काहीशा उशीरानेच सुरु झालेल्या हिवाळ्याच्या सुरुवातीलाच राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसकडून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काम करणाऱ्या शेतकरी संघटनांना एकत्रित आणण्याचे काम सुरु केले आहे. तर दुसऱ्याबाजूला राष्ट्रवादी काँग्रेसने यवतमाळ ते नागपूर असा शेतकऱ्यांचा मोर्चाच काढला आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशनात विरोधकांकडून राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरण्यात येणार …

Read More »

संदीप देशपांडेसह १२ मनसैनिकांना १८ पर्यंत न्यायालयीने कोठडी

मुंबईः प्रतिनिधी मुंबईतील आझाद मैदानालगत असलेल्या प्रदेश काँग्रेसच्या कार्यालयावर हल्ला केल्याप्रकरणी  मनसेचे माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांच्यासह १२ मनसैनिकांना १८ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मनसैनिकांवर गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांना अटक करून किल्ला कोर्टात आज सोमवारी हजर करण्यात आले. त्यावेळी किल्ला कोर्टाच्या न्यायाधीशांनी त्यांना १८ डिसेंबर अखेर पर्यंत न्यायालयीन …

Read More »

प्रदेश भाजपच्या ट्वीटने मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावरील नाराजीला वाट मोकळी ?

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारला नुकतेच तीन वर्षे झाली. मात्र या तीन वर्षाचा कार्यकाळाने महाराष्ट्रातील जनतेचे समाधान किती झाले यापेक्षा भाजपच्या कार्यकर्त्यांचे कितपत समाधान याची चर्चा प्रामुख्याने भाजपच्या लोकप्रतिनिधींसह पदाधिकाऱ्यांमध्ये नेहमीच दबक्या आवाजात रंगत आली आहे. परंतु त्याबाबत आतापर्यंत मंत्री, आमदार, खासदार किंवा सामान्य कार्यकर्ता कधी बोलत …

Read More »