राजकारण

बलात्कारी लोकांना पाठीशी घालणारे फडणवीस सरकार हाय हाय घटनेची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची खा. सुप्रिया सुळेंची मागणी

मुंबईः प्रतिनिधी राज्यात अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचार आणि जालना जिल्हयातील १९ वर्षीय मुलीवर मुंबईतील चेंबुर परिसरात चार नराधमांनी विषारी ड्रग्ज पाजवून सामुहिक बलात्कार केला होता. त्यात एक महिना मृत्यूशी झुंज दिल्यानंतर त्या मुलीचा जगण्याशी संघर्ष गुरुवारी संपला. याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असून मुंबईमध्ये सरकारविरोधात भव्य मोर्चा काढण्यात आला. …

Read More »

मंत्रालय बनले टेंडर मॅनेजमेंटचा अड्डा प्रधानमंत्री आवास योजनेच्या १४ हजार कोटींच्या निविदेतही भ्रष्टाचार झाल्याचा काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा आरोप

मुंबई: प्रतिनिधी नियमांना बगल देऊन, नियमांची मोडतोड करून मनमर्जीने नविन नियम तयार करून राज्यातील मोठ मोठ्या प्रकल्पाच्या निविदा तयार केल्या जातात आणि मर्जीतल्या कंत्राटदारांनाच काम मिळेल याची सोय केली जाते. मंत्रालय व मुख्यमंत्री कार्यालयाशी जवळीक असणारे सरकारचे जावई या करिता कार्यरत असून अधिका-यांशी संगनमत करून प्रसंगी दबाव आणून हजारो कोटींचा …

Read More »

१४-१५ सप्टेंबर रोजी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता नवरात्रीत निवडणूकीची रणधुमाळी तर दिवाळीत सरकार स्थापन होणार

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील निवडणूकीला अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक राहीला असून जनतेला खुष करण्यासाठी विद्यमान राज्य सरकारला आणखी १५ दिवसांचा कालावधी मिळणार आहे. पुढील सप्टेंबर आणि ऑक्टोंबर महिने हे सणासुदीचे महिने असल्याने ऐन नवरात्रीत राज्य विधानसभेच्या निवडणूकीची रणधुमाळी तर दिवाळी नव्या स्थानापन्न होणाऱ्या सरकारला जनतेसोबत साजरी करायला मिळणार आहे. विद्यमान …

Read More »

सोपल साहेब उभी हयात एका बाजूला आणि तिन्हीसांजेला उद्धव ठाकरेंच्या दारात पाणी भरायला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेषाध्यक्ष जयंत पाटील यांची टीका

सोलापूर – माळशिरसः प्रतिनिधी सोपल साहेब उभी हयात एका बाजूला घातली आणि तिन्हीसांजेला उद्धव ठाकरेंच्या दारात पाणी भरायला गेलात… वाह रे विश्वासू सहकारी… लोक कसा विश्वास ठेवतील तुमच्यावर अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी आमदार दिलीप सोपल यांच्या शिवसेनेतील प्रवेशाचा समाचार माळशिरस येथील जाहीर सभेत घेतला. विधानसभेमध्ये …

Read More »

बीडमधील गर्भाशय शस्त्रक्रिया प्रकरणाचा अहवाल आरोग्य विभागास सादर महिलांना आरोग्य कार्ड देण्याची समितीच्या अध्यक्ष अँड. नीलम गोऱ्हे यांची शिफारस

मुंबई : प्रतिनिधी बीड जिल्ह्यात गर्भाशय काढून टाकण्याच्या शस्त्रक्रिया संदर्भात गठीत करण्यात आलेल्या समितीने आपला अहवाल आज सादर केला. ऊस तोडणीसाठी जाण्यापूर्वी आणि जाऊन आल्यानंतर महिलांची वैद्यकीय तपासणी करावी. त्यासाठी महिलांना आरोग्य कार्ड देणे, ऊस तोडणीच्या ठिकाणी साखर कारखान्यांनी मुलभूत सुविधा उपलब्ध करून देणे, खासगी रुग्णालयांनी गर्भाशय काढण्याच्या शस्त्रक्रियांबाबत जिल्हा …

Read More »

परवडणाऱ्या घरांवरील जीएसटी कर १ टक्क्याने कमी घरे स्वस्त होणार असल्याची अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी महानगरातील ६० चौ.मी चटई क्षेत्र असणाऱ्या घरांसाठी आणि महानगराव्यतिरिक्त इतर शहरे आणि गावांमधील ९० चौ.मी चटई क्षेत्राच्या घरांसाठी जीएसटीचा दर ८ टक्क्यांवरून एक टक्का करण्यात आल्याने अल्प उत्पन्न गटातील लोकांना हक्काचे घर कमी किंमतीत मिळणे शक्य झाले असल्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. वस्तू आणि सेवा कर …

Read More »

पूरामुळे उध्दवस्त झालेल्या भागांची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात दोन पथक करणार पाहणी

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील पूरग्रस्त जिल्ह्यात झालेल्या नुकसानीच्या पाहणीसाठी केंद्र शासनाची दोन पथके आज दाखल होत आहेत. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सहसचिव डॉ. व्ही. थिरूपुगझ यांच्या नेतृत्वाखालील सात जणांची ही पथके पूरग्रस्त जिल्ह्यांचा दौरा करुन झालेल्या नुकसानीचा आढावा घेणार आहेत. यंदाच्या भीषण पूरपरिस्थितीनंतर राज्य सरकारने ६,८१३ कोटींच्या मदतीचा केंद्र शासनाला प्रस्ताव …

Read More »

एससी-एसटीप्रमाणे ओबीसींनाही आरक्षण आणि शिष्यवृत्ती देणार वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांचे आश्वासन

मुंबई: प्रतिनिधी ओबीसींना एससी-एसटीप्रमाणे स्कॉलरशिप वंचित बहुजन आघाडी सत्तेत आल्यावर ओबीसींना पदोन्नतीमध्ये आरक्षण दिले जाईल व क्रिमिलेयर काढण्यासाठी शासनस्तरावर एक अभ्यास गट नेमला जाईल. या अभ्यासानंतर जो निर्णय येईल त्या पद्धतीने तत्काळ अंमलबजावणी केली जाईल. ज्याप्रमाणे अनुसूचित जाती-जमातींचे वेगळे बजेट आहे तसेच ओबीसींचेही स्वतंत्र बजेट करून त्यांच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप, फ्री …

Read More »

बेरोजगारीच्या विरोधात बेरोजगार युवकांचा एल्गार राष्ट्रवादीच्या युवक संघटनेने दीड तास रोखला मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे

पुणेः प्रतिनिधी वाढत्या बेरोजगारीच्या विरोधात आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने आक्रोश मोर्चा काढत दीडतास मुंबई – पुणे एक्स्प्रेस रोखून धरला. महाराष्ट्रातील बेरोजगारीने होरपळणाऱ्या तरुणांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख यांच्या नेतृत्वाखाली आज मुंबई- पुणे एक्स्प्रेस हायवेवर आंदोलन करण्यात आले. शेकडो पोलिसांचा फौजफाटा तैनात असतानाही तब्बल दीड तास …

Read More »

विधानसभेसाठी भाजपा-शिवसेनेत झटपट युती होईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

बीडः प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीच्या आधी माध्यमांनी भरपूर चर्चा केली की भारतीय जनता पार्टी – शिवसेना युती होणारच नाही पण आम्ही एका दिवसात युती केली आणि घोषणा केली. आताही विधानसभा निवडणुकीत असेच होईल. तुमच्या लक्षातही येणार नाही, अशी झटपट युती होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केला. महाजनादेश …

Read More »