राजकारण

मुंबई महापालिकेच्या विभाजनावरून भाजप-काँग्रेस समोरासमोर तर शिवसेनेला उशीराने जाग ; सभागृहाचे कामकाज दोनवेळा तहकूब

नागपूर : प्रतिनिधी राज्याची राजधानी असलेल्या मुंबईची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने मुंबई महापालिकेचे तीन भागात विभागण करण्याची मागणी काँग्रेसचे आमदार नसीम खान यांनी केली. मात्र भाजपने याचा राजकिय फायदा उठविण्यासाठी मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे पाडण्यासाठी काँग्रेसकडून हा प्रस्ताव आणला जात असल्याचा आरोप आमदार आशिष शेलार यांनी केला. त्यामुळे सत्ताधारी भाजप …

Read More »

राणेची जबाबदारी आमच्यावर तर खडसे प्रस्थापित नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्ट कबुली

नागपूर : प्रतिनिधी मागील अनेक दिवस राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारावराबरोबरच एनडीएचे घटक पक्ष बनलेले नारायण राणे आणि भ्रष्टाचारासह विविध आरोपावरून मंत्रीपदावरून पायउतार झालेले एकनाथ खडसे यांच्या समावेशाबाबत चर्चा सुरु आहे. त्यानुसार विस्थापित असलेल्या नारायण राणे यांची जबाबदारी राज्य सरकारवर आहे. तर मंत्री पदावरून पायउतार झालेले एकनाथ खडसे हे भाजपमधील प्रस्थापित नेते …

Read More »

निकाल गुजरातचा मात्र असुरक्षिततेची भावना महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांमध्ये काँग्रेससह सर्वच विरोधकांमधील आत्मविश्वास दुणावला

मुंबई : प्रतिनिधी मागील तीन वर्षापासून महाराष्ट्रासह देशभरातील सर्वंच राज्यामध्ये भाजपच्या अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उधळलेल्या राजकिय वारूला कोण रोखणार असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र गुजरात विधानसभेत भाजप ९९ जागां जिंकत तेथील सत्तेवर चवथ्यांदा स्थानापन्न होणार असली तरी तेथील निसटत्या विजयाने भाजपमधील नेते-कार्यकर्त्यांची चलबिचल वाढली असून गुजरातच्या निकालाची …

Read More »

पोषक आहार धान्य खरेदीत कोट्यावधींचा भ्रष्टाचार एसआयटी मार्फत चौकशी करण्याची खडसेंची मागणी

नागपूर: प्रतिनिधी राज्यातील शाळांना पुरविण्यात येणाऱ्या शालेय पोषक आहाराच्या धान्य खरेदीत कोट्यावधी रूपयांचा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी करत याप्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी केली. विधानसभेत रायगड जिल्ह्यात शालेय पोषण आहार पुरविण्याच्या कामात अव्वाच्या सव्वा दर आकारण्यात आल्याचा आरोप चंद्रपूरचे कॉंग्रेसचे आमदार गोपालदास अगरवाल …

Read More »

चिरीमिरी दिल्याशिवाय टेंडर मंजूर होत नाही अजित पवारांचा पाणी पुरवठा विभागावर आरोप

नागपूर : प्रतिनिधी राज्यातील सत्ताधारी पक्षाचे आमदारांची अडचण होत असल्याने त्यांच्याकडून प्रश्न उपस्थित केले जात नाहीत. याचा अर्थ असा नव्हे की, सारे काही आलबेल सुरु आहे, असे नसून कोणी कितीही नाही म्हणटले तरी पाणी पुरवठा विभागात चिरीमिरी दिल्याशि‌वाय टेंडरच मंजूर नसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांनी केला. विधानसभेत …

Read More »

घोटाळेबाजांना शासन होईपर्यंत काँग्रेसकडून पाठपुरावा सुरुच ठेवणार काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा इशारा

मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या महिला व बाल कल्याण विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नुकतीच चिक्की घोटाळा प्रकरणात क्लीनचीट दिली. त्यामुळे राज्यातील भाजप-शिवसेनेचे सरकार हे ‘क्लीन-चीटर’ सरकार असून चिक्की खरोदीत ज्यांनी भ्रष्टाचार केला, ज्यांच्या विरोधात तक्रार केली. त्यांच्याच कडून लाचलुचपत विभागाने अभिप्राय घेत चोराच्या साक्षीवर  मंत्र्याला क्लीन चीट दिल्याचा …

Read More »

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर पुन्हा रणकंदन विधान परिषदेत सत्ताधारी विरोधकांमध्ये खडाजंगी

नागपुर : प्रतिनिधी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर विधान परिषेदत सर्व पक्षिय सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर याप्रश्नावर मंत्रीमंडळाची उपसमिती चर्चा करीत असते. त्या समितीला मार्गदर्शन करण्यासाठी सदस्यांनी त्या चर्चेत भाग घ्यावा असे आवाहन राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. याप्रश्नी सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सभागृहात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्याने सभागृहाचे …

Read More »

जमिन नसलेल्याला आणि शिवसेनेच्या आमदाराला कर्जमाफीचा लाभ विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडून सरकारची पोलखोल

नागपूर : प्रतिनिधी राज्य सरकारकडून कर्जमाफी योजनेत पात्र शेतकऱ्यालाच लाभ मिळावा यासाठी सर्व प्रक्रिया ऑनलाईन स्वरूपात केल्याचा दावा राज्य सरकारने केला. तरीही कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेच्या एका आमदाराचे नाव अर्ज भरलेला नसताना कर्जमाफीच्या यादीत आहे. तर उस्मानाबादमधील एक गुंठा जमिन नसलेल्या मुलाला कर्जमाफीची रक्कम मिळाल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण पाटील …

Read More »

टोल मुक्त महाराष्ट्रासाठी १० हजार कि.मीचा रस्ता सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती

नागपूर : प्रतिनिधी निवडणूकीच्या कालवाधीत टोल मुक्त महाराष्ट्राची घोषणा भाजपने केली होती. या घोषणेनुसार राज्यातील लहान वाहनांबरोबरच मोठ्या वाहनांनाही टोल मुक्ती कधी देणार असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी विधानसभेत उपस्थित केला. त्यास उत्तर देताना राज्याला टोलमुक्त करण्याच्यादृष्टीने महाराष्ट्रात ३० हजार कोटी रूपये खर्चुन १० हजार किलोमीटर लांबीचे रस्ते …

Read More »

राज्यातील १२ हजार शाळा बंद करण्याचा सरकारचा डाव शिक्षणाच्या प्रश्नावर विधान परिषदेचे कामकाज दोन वेळा तहकूब

नागपूर : प्रतिनिधी राज्यात १३०० शाळांपाठोपाठ १२ हजार शाळा बंद करण्याचा घाट शालेय शिक्षण मंत्र्यांनी घातला आहे. मंत्र्यांच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांनंतर शिक्षकांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या होतील असा इशारा जनता दल (युनायटेड ) चे आमदार कपिल पाटील देत शिक्षणाच्याबाबत सरकारचे दुटप्पी आणि उदासीन धोरण सरकारचे असल्याचा आरोपही त्यांनी विधान परिषदेत केला. …

Read More »