राजकारण

नाना पटोले यांची टीका, भाजपाकडून आयारामांना उमेदवारी, निष्ठावंत मात्र वंचितच

राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाला आयात केलेल्या लोकांना उमेदवारी द्यावी लागली. जगातील सर्वात मोठा पक्ष व ‘विश्वगुरु’ असे नेतृत्व असल्याच्या वल्गणा करणाऱ्यांकडे राज्यसभेसाठी उमेदवार नसावा यातूनच भाजपा हा हवा भरलेला फुगा आहे तो कधीही फुटू शकतो हे दिसते. आयारामांना उमेदवारी आणि निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलणे हीच भाजपाची पद्धत आहे, अशी टीका …

Read More »

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आदेश, खंडोबाच्या दर्शनासाठी लिफ्ट बसवा…

पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील निमगाव येथील खंडोबा मंदिर हे पौराणिक धार्मिक स्थळ आहे. याठिकाणी भरणाऱ्या यात्रेला दरवर्षी तीन ते चार लाख भाविक येत असतात. त्याचप्रमाणे वर्षभर येणाऱ्या भाविकांची संख्यादेखील मोठी आहे. त्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, मुले, महिला आदी भाविकांना मंदिरापर्यंत जाण्याची योग्य सोय होण्यासाठी अत्याधुनिक लिफ्टची सोय करावी. …

Read More »

सुप्रिया सुळे यांचा सवाल, सध्या दोन राष्ट्रवादी काँग्रेस आहे ना?

सध्याचे सरकार असंवेदनशील सरकार आहे. शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत. यामुळे दिल्लीत शेतकरी आंदोलन करत आहे. शेतकरी आक्रमक कधी होतात, जेव्हा अन्याय होतो. सरकारने अमानुषपणे अन्याय केला आहे. सरकार कष्ट करणाऱ्यांवर अन्याय करत आहे. अनेक अडचणी साखर कारखान्यांबाबत निर्माण झाल्या आहेत. परंतु हे प्रश्न खोके सरकार सोडवू शकत नाही असे राष्ट्रवादी …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांचा जरांगेंना सल्ला, मराठा आरक्षणाचा प्रश्न लोकसभेत मांडा

राज्यातील मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारच्या विरोधात उपोषणाचे हत्यार उपसले आहे. आज त्यांच्या उपोषणाचा ६ वा दिवस असून त्यांची प्रकृती अस्वस्थ होत आहे. तसेच डॉक्टरांकडून उपचार घेण्यासही नकार दिला आहे. त्यातच राज्यात ओबीसी विरूध्द मराठा असे चित्र सध्या सामाजिक आणि राजकिय स्तरावर दिसू …

Read More »

महायुतीचे उमेदवार जाहीर, अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, मिलिंद देवरा, डॉ गोपचडे

राज्याच्या राजकारणात काँग्रेसकडून काहीसे अडगळीत गेलेल्या माजी खासदार मिलिंद देवरा आणि सध्या मराठवाड्यातील मराठा विरूध्द ओबीसी राजकारणात स्पष्ट भूमिका न घेणारे राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश करत आगामी खासदारकीचे तिकिट मागील महिन्यातच बुक करून ठेवले. तर काही …

Read More »

राज्यसभेसाठी काँग्रेसची यादी जाहिरः सोनिया गांधी, चंद्रकांत हंडोरे, अभिषेक मनु सिंघवी…

राज्यसभेच्या एकूण रिक्त होणाऱ्या ५६ जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आज सुरु झाली. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांना वाढत्या वयामुळे आणि आजारपणामुळे जवळपास सक्रिय राजकारणातून दूर रहावे लागत आहे. तसेच हिंडण्या फिरण्यावरही मर्यात येत आहे. त्यामुळे यंदाची लोकसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे सोनिया …

Read More »

मल्लिकार्जून खर्गे यांची आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना गॅरंटी, आम्ही देऊ एमएसपी…

देशातील शेतकऱ्यांच्या शेत मालाला एमएसपी अर्थात आधारभूत किंमत मिळावी म्हणून पंजाब, हरियाणामधील सर्व शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात चलो दिल्ली आंदोलन पुकारले. तसेच केंद्र सरकारकडून आधारभूत किंमतीबाबतचा निर्णय जाहिर केल्याशिवाय माघारी फिरायचे नाही असा निश्चय करून दिल्लीच्या दिशेने शेतकरी मोर्चा निघाला. मात्र केंद्र सरकारने पुन्हा एकदा आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना दिल्लीत प्रवेश करण्यावर …

Read More »

काँग्रेसची टीका, अशोक चव्हाण डरपोक, मैदान सोडून पळाले!

अशोक चव्हाण यांना दोनवेळा मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष, आमदार, खासदार अशी विविध पदे काँग्रेस पक्षाने दिली. पक्षात नेतृत्व करण्याची संधी दिली. कालपर्यंत ते काँग्रेस पक्षात होते पण अचानक ते भारतीय जनता पक्षात गेले. अशोक चव्हाण डरपोक आहेत, ते मैदान सोडून पळाले आणि विरोधकांशी हातमिळवणी करून काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला, असा घणाघात प्रदेश …

Read More »

अशोक चव्हाण यांनी नव्याने धारण केले कमळः काँग्रेस नेमकी चाललीय कुठे?

मागील काही काळापासून अशोक पर्व आणि कफ परेडला लागून असलेल्या संरक्षण दलाच्या जमिनीवर आदर्श नामक इमारतीतील सदनिकांच्या घोटाळ्याप्रकरणी आरोपाच्या संशयाच्या भोवऱ्यात सापडलेले काँग्रेसचे माजी वरिष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपला हात काँग्रेसच्या हातातून सोडवून घेत (राजीनामा देत) भाजपाचे कमळ नुसतेच हाती नाही धरले तर अंगावर धारण केले. …

Read More »

शेतकऱ्यांसाठी पुन्हा दिल्ली बंदीः सिंघू सीमेवर आंदोलकांवर अश्रू धुराच्या नळकांड्या

आपल्या न्याय हक्कांसाठी आणि शेतमालाला योग्य भाव मिळावा, कर्जमाफीच्या मागणीसाठी पंजाब आणि हरियाणासह देशभरातील शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा चलो दिल्लीचा नारा दिला. घाबरलेल्या केंद्रीय गृह विभागाने मात्र दिल्लीच्या हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेशसह सर्व दिल्लीच्या सर्व सीमावर मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला. त्यासाठी सिमेंटच्या बॅरिकेड्स, टोकसाई सळईचे लोखंडी बॅरिके़डस, पाण्याचे टँकर …

Read More »