राजकारण

अजित पवार म्हणाले, आमच्या अडीच वर्षाच्या काळात असे कधी झाले नव्हते सीमा भागातील अनेक गावे आताच का बोलायला लागली

राज्यात शिंदे-फडणवीस यांचे सरकार आले. मात्र हे सरकारच आहे की नाही अशी अवस्था झाली आहे. या सरकारच्या काळात महाराष्ट्रातील सीमावर्ती भागात असलेली गावे कधीही बोलत नव्हती. मात्र आता ती गावे कोण म्हणतं गुजरातला जातो, कोण म्हणतं तेलंगणात जातो म्हणतो, तर कोणी थेट कर्नाटकात जातो असे म्हणतंय. आमच्या अडीच वर्षाच्या काळात …

Read More »

उध्दव ठाकरेंचा इशारा, राज्यपाल आणि नेभळट शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात महामोर्चा १७ डिसेंबरला जिजामाता उद्यान ते आझाद मैदान मोर्चा

मागील काही दिवसांपासून राज्याचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजाचा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपाच्या आमदार, पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत असलेल्या अवमानाच्या आणि कर्नाटक सरकारकडून महाराष्ट्राच्या विरोधात करण्यात येत असलेल्या वक्तव्यावर एक चकार शब्दही न काढणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात १७ डिसेंबर रोजी महामोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा …

Read More »

आशिष शेलार म्हणाले, काँग्रेस, राष्ट्रवादी सोबतचा संसार हाच सगळ्यात मोठा नेभळटपणा सामनाच्या अग्रलेखाला भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांचे उत्तर

वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना जे अभिवादन करायला तयार नाहीत, अशा काँग्रेस, राष्ट्रवादी सोबत तडजोडीचा संसार हाच सगळ्यात मोठा नेभळटपणा नाही का? …असे म्हणत भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी सामनातील अग्रलेखाला प्रतिउत्तर दिले आहे. त्यांनी पत्रात म्हटले आहे की, विरोधी पक्षाने नरसिंह होऊन खोके सरकारचा अंत करायला हवा, …

Read More »

प्रत्येक शाळा-महाविद्यालयात ‘युथ अगेंन्स्ट ड्रग्ज क्लब’ स्थापन करा ‘ड्रग्ज फ्री मुंबई’ अभियान-- पालकमंत्री दीपक केसरकर

शालेय विद्यार्थी आणि तरुण मुलांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी समाजातील सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांची गरज आहे. त्यासाठी कडक उपाययोजनांची गरज असून मुंबई शहरात व्यसनाधीनतेच्या आहारी नेणाऱ्या पदार्थांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कडक कार्यवाही करा आणि असे ड्रग रॅकेट उद्ध्वस्त करा, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिले. …

Read More »

नाना पटोले म्हणाले, महाराजांचा अपमान करणे भाजपाचे नियोजित षडयंत्र छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांवर भाजपा कारवाई का करत नाही ?

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करण्याची भारतीय जनता पक्षात चढाओढच लागल्याचे दिसत आहे. मागील महिनाभरात भाजपाच्या चार-पाच नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारी वक्तव्ये केली आहेत. हे प्रकार अनवधानाने झालेले नसून भाजपाने छत्रपती शिवाजी महाराज यांची बदनामी करण्याचे जाणीवपूर्वक रचलेले षडयंत्र आहे, असा घणाघाती हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष …

Read More »

भाजपा म्हणते, उध्दव ठाकरे हे आंबेडकरच काय ओवैसींशीही युती करू शकतात पण जिंकेल भाजपा युतीच-प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा टोला

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रकाश आंबेडकरच काय ओवैसी यांच्याशीसुद्धा युती करू शकतात, पण आमच्या विरोधात कोणी कितीही युती केली, तर राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आम्ही एक्कावन्न टक्के मतांची लढाई लढून कोणत्याही निवडणुकीस कधीही सज्ज आहोत, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे …

Read More »

भाजपाचा उध्दव ठाकरेंना सवाल, संघाला विरोध आणि पीएफआयला इलूइलू ?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्वतंत्र आंदोलनात कुठे होता? संघाची टोपी काळी का? असा सवाल संघाला विचारता आणि पीएफआयवरील बंदीचे समर्थन करण्यास तयार नाही? संघाला विरोध आणि पीएफआयला इलूइलू? असा खडा सवाल भाजपा नेते आमदार ॲड. आशिष शेलार यांनी करीत आज पुन्हा एकदा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला जागर …

Read More »

देवेंद्र फडणवीसांच्या सारथ्याखाली मुख्यमंत्री शिंदेनी केली समृध्दीची पाहणी

हिंदूहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या पाहणी दौऱ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागपूर येथे आगमन झाले. दुपारी १२.४५ वाजता दोन्ही नेत्यांनी नागपूर ते शिर्डी या प्रवासाला सुरुवात केली. विदर्भात नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलडाणा जिल्ह्यामध्ये पाहणी दौऱ्याचे प्रचंड स्वागत झाले. विशेष म्हणजे या दौऱ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …

Read More »

काँग्रेसच्या पहिल्याच सुकाणू समितीत मल्लिकार्जून खर्गेंनी मांडली भविष्यकालीन योजना

सोनिया गांधी जी आणि काँग्रेस सुकाणू समितीचे सर्व सन्मानित सहकारी…सुकाणु समितीच्या पहिल्या बैठकीत मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो.. अध्यक्षपदासाठी माझ्यावर विश्वास दाखवलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सर्व सहकाऱ्यांचाही मी आभारी आहे. सोनियाजी गांधी यांनी कुशल नेतृत्व, अथक परिश्रम व काँग्रेस पायाभूत सिद्धांतावर मोठ्या आत्मविश्वासाने दोन दशके काँग्रेस पक्ष व देशाला मार्गदर्शन …

Read More »

प्रसाद लाड यांच्याकडून अखेर भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी

मागील काही दिवसांपासून शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यासह भाजपाच्या कधी मंत्र्याकडून तर कधी प्रवक्त्याकडून तर कधी आमदाराकडून अवमानकारक वक्तव्ये केली जात आहेत. तसेच शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनीही छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले. त्यामुळे राज्यातील वातावरण दिवसेंदिवस तापत चालले आहे. त्यातच भाजपाचे आमदार प्रसाद …

Read More »