राज्यातील सत्ता गेल्याचा धक्का सुप्रिया ताई अजून पचवू शकलेल्या नाहीत, त्यामुळे त्यांची स्मरणशक्तीसुध्दा कमी झालेली दिसतेय. त्यांची स्मरणशक्ती वाढविण्यासाठी त्यांना एखादे टॉनिक आम्ही लवकरच पाठवू असं प्रत्युत्तर शिंदे गटाच्या शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी सुप्रिया सुळे याना दिले आहे. गेल्या दीड दोन महिन्यात महाराष्ट्राची प्रचंड बदनामी झाली असे वक्तव्य करणाऱ्या …
Read More »भाऊराव पाटील म्हणायचे की माझ्या दाढीला जेव्हढे केस आहेत तेवढे… शाळकरी मुलांची कोणतीही गैरसोय आम्ही होऊ देणार नाही, शिक्षण संस्थांच्या अडचणी आम्ही दूर करू - छगन भुजबळ
समतेच्या वाटेने जाणाऱ्या कर्मवीर भाऊराव पाटील यांनी नेहमी बंडाचा झेंडा हाती घेतला. त्यांनी लावलेले रयत शिक्षण संस्थेचे रोपटे आज वटवृक्ष झाला आहे. बहुजनांच्या मुलांना शिक्षण देणाऱ्या भाऊराव पाटील यांचा सन्मान करणे आमचे कर्तव्यच आहे असे मत राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. आज निफाड तालुक्यातील विंचूर येथील कर्मवीर …
Read More »मंत्री संजय राठोड यांना मोठा धक्का, महंत सुनिल महाराजांचा शिवसेनेत प्रवेश संजय राठोड यांचा पराभव अटळ
बंजारा समाजाचे नेते म्हणून ओळख असलेल्या संजय राठोड यांना मोठा धक्का बसला आहे. बंजारा समाजाचे महंत सुनिल महाराज यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. एका महिलेच्या आत्महत्येस जबाबदार असल्याच्या आरोपा वरून मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागल्यानंतर त्यांना पुन्हा मंत्री करा म्हणून मागणी करणारे महंत सुनिल महाराज आघाडीवर होते. संजय राठोड यांनी …
Read More »‘भारत जोडो’च्या मदतीच्या मोबदल्यात दसरा मेळाव्यासाठी काँग्रेसी गर्दीची तडजोड भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांची घणाघाती टीका
महाराष्ट्राच्या राजकारणातून अस्तित्व पुसले जाण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली असून बुडत्या काँग्रेसला वाचविण्यासाठी शिल्लक सेनेचा हात पुढे करण्याची ठाकरे यांची तडजोड आता दोन्ही पक्षांना बुडविणार आहे, अशी घणाघाती टीका प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आज प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. तसेच केशव उपाध्ये म्हणाले, शिवाजी …
Read More »रश्मी ठाकरे मुख्यमंत्री शिंदेंच्या बालेकिल्ल्यात, आनंद आश्रम आणि नवरात्रौत्सवाला हजेरी आनंद दिघेंचे दर्शन घेत देवीची केली आरती
शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांनी सुरु केलेल्या टेंभी नाक्यावरील नवरात्रोत्सव राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात येतो. या उत्सवाला गुरुवारी दुपारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी उपस्थिती लावत महाआरती केली. यानिमित्ताने ठाकरे गटाकडून उत्सवाच्या परिसरात मोठे शक्तीप्रदर्शन करण्यात आले. तसेच महाआरतीनंतर …
Read More »अतिवृष्टीच्या निकषात न बसणाऱ्या बाधित शेतकऱ्यांना ७५५ कोटी रुपयांची मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत निर्णय
अतिवृष्टीसाठी विहित करण्यात आलेल्या निकषांमध्ये बसत नसतानाही जून ते ऑगस्ट २०२२ या कालावधीत अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने मोठा दिलासा दिला आहे. विशेष बाब म्हणून सुमारे ७५५ कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत आज घेण्यात आला. याचा राज्यातील अंदाजे ५ लाखांपेक्षा अधिक …
Read More »उध्दव ठाकरे म्हणाले, काही लोक ढळली पण खरे अढळ आहेत ते… आपल्याला लढाई जिंकायची आहे
उद्धव ठाकरेंनी ‘मातोश्री’ निवासस्थानाबाहेर पुणे यवतमाळच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी दसरा मेळावा, निवडणूक आयोगातील लढाई यावर भाष्य केलं. यावेळी त्यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांनाही लक्ष्य केलं. उध्दव ठाकरे म्हणाले, माझ्यासोबत जुनी माणसं आहेत, पण सोबत नवीन येत आहेत याचा आनंद आहे. शिरुरमधील काही लोक ढळली, पण जे खरे अढळ …
Read More »जयंत पाटील म्हणाले, अशोक चव्हाण यांनी जो गौप्यस्फोट केला त्यात तथ्य… मराठा समाजाबद्दलचे तानाजी सावंतांचे वक्तव्य तीच भूमिका मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची...
२०१४ साली अशोक चव्हाण यांची एकनाथ शिंदे यांनी भेट घेऊन शिवसेना – कॉंग्रेस आघाडीबाबत चर्चा केली असा अशोक चव्हाण यांनी गौप्यस्फोट केला असेल तर त्यात तथ्य असणे स्वाभाविक आहे, असे मत व्यक्त करतानाच सध्या मुख्यमंत्र्यांनी जी युती केली आहे ती कशासाठी केली हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे असा टोलाही राष्ट्रवादी …
Read More »सेवा पंधडरवडा अंतर्गत मुंबई भाजपाकडून १०० ठिकाणी महापुरुषांच्या पुतळ्यांची स्वच्छता मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथून स्वच्छता अभियानाची सुरूवात
छत्रपती शिवाजी महाराज पार्क मधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि सावरकर स्मारक येथील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुतळ्याची स्वच्छता करून मुंबई भाजपा अध्यक्ष ॲड. आशिष शेलार यांनी पुतळा स्वच्छता अभियानाची सुरुवात केली. तसेच दोन्ही पुतळयांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. तर पर्यटन व महिला बालकल्याण मंत्री ॲड. मंगलप्रभात लोढा यांच्या …
Read More »राज्य मंत्रिमंडळाने निर्णय फिरवताच राज्यपालांकडून निवड समिती स्थापन
महाविकास आघाडी सरकारच्या काळात विद्यापीठ कुलगुरू निवडीचे अधिकार राज्यपालांऐवजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांना बहाल करण्यात आले. तसेच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री जी नावे सुचवतील त्यातील एका नावास पसंती देण्याचा पर्यायही राज्यपालांना देण्यात आला होता. मात्र राज्यात सत्तांतर होत शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर स्थानापन्न झाले. नुकत्यात झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंत्र्यांना कुलगुरू …
Read More »
Marathi e-Batmya