एक गुलाब गेलं. पण दुसरं गुलाब वाघ आले. नागाला कितीही दुध पाजा. तो चावतो म्हणजे चावतोच! त्या सर्वांना निष्ठेचे कितीही दुध पाजलं तरी औलाद गद्दारच निघाल्या अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांवर सडकून टीका केली. उध्दव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी जळगाव आणी नाशिक येथील शिवसैनिक उद्धव ठाकरे …
Read More »राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले ‘हे’ निर्णय भिवंडी-कल्याण शीळ फाटा रस्त्यासह, वर्धा बॅरेज, लेंडी प्रकल्प यासह अन्यचा समावेश
राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या भवितव्याच्या दृष्टीने महत्वाच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु होती. मात्र या याचिकेवर आज कोणताही ठोस निर्णय न्यायालयाने दिला नाही. त्यामुळे दुपारी झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांच्या उपस्थित झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले. ते खालीलप्रमाणे… भिवंडी कल्याण शीळ …
Read More »छगन भुजबळ यांचा इशारा, ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही बांठिया आयोगाच्या अहवालातील त्रुटींवर उपाययोजना करा
ओबीसी राजकीय आरक्षणासाठी समर्पित बांठिया आयोगाने सादर केलेला ओबीसींचा विश्लेषणात्मक अहवाल (इम्पिरिकल डाटा) आपण सर्वोच्च न्यायालयात सादर केला आहे. त्याआधारे ओबीसींचा राजकीय आरक्षण पूर्ववत झाले मात्र ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी नेमलेल्या समर्पित बांठिया आयोगाच्या अहवालात अनेक त्रुटी असल्याचे दिसते आहे त्यामुळे या त्रुटी दूर करण्यासाठी राज्य सरकारने उपाययोजना कराव्या त्याचप्रमाने सर्वोच्च …
Read More »महेश तपासे यांचा आरोप, बेरोजगारीबाबतची मोदी सरकारची आश्वासने खोटी उज्वला योजनेतील लाभार्थ्यांनी पाच वर्षात एकदाही सिलेंडर नव्याने भरला नाही...
महागाई, बेरोजगारी आणि डॉलर या तीन गोष्टींनी मोदीसरकारच्या कार्यकाळात उच्चांक गाठला असल्याने तरुणवर्ग हवालदिल झाला आहे त्यामुळे बेरोजगारी बाबतची मोदींची आश्वासने खोटी ठरली असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला. ज्या उज्वला योजनेचा गवगवा मोदी सरकारने केला त्या योजनेतील ४.१३ कोटी लाभार्थ्यांनी गेल्या पाच वर्षात एकदाही …
Read More »केंद्र सरकारची माहिती, धार्मिक भावना भडकाविल्याप्रकरणी ४ हजाराहून अधिक अटकेत लोकसभेत दिली केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी दिली माहिती
देशात मोदी सरकार आल्यापासून या ना त्या कारणाने दोन धर्मियांमध्ये सातत्याने भावना भडकाविण्याचे आणि तथा आशयाचे वक्तव्य करण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. मात्र धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी २०१८ ते २०२० या तीन वर्षाच्या कालावधीत ४७९४ आरोपींना अटक करण्यात आली असल्याची माहिती गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत दिली. तृणमूल …
Read More »आदित्य ठाकरे म्हणाले, गद्दारांचं सरकार फार काळ टिकणार नाही आदित्य ठाकरेंचे आव्हान, हिम्मत असेल तर राजीनामे देऊन निवडणुकीला सामोरे जा
शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या शिव संवाद यात्रेच्या दुसरा टप्पा सुरू आहे . आज ही यात्रा सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात दाखल झाली, यावेळी पाटणतालुक्यात या यात्रेकरिता शिवसैनिक आणि सातारकर नागरिकांनी अभूतपूर्व गर्दी करत, आदित्य ठाकरे यांना आपला पाठिंबा असल्याचं दाखवून दिलं. या गर्दीने गद्दारांना क्षमा नाही, शिवसेना आणि ठाकरे कुटुंबाच्या …
Read More »माजी सैनिक, शहीद सैनिक पत्नी व कुटुंबियांना शिक्षक पात्रता परीक्षा गुणांच्या टक्केवारीत सूट उमेदवारांनी आरक्षणाबाबत १० ऑगस्टपर्यंत ऑनलाईन नोंद करण्याचे आवाहन
शालेय शिक्षण विभागामार्फत राज्यातील माजी सैनिक, शहीद सैनिक पत्नी व कुटुंबियांना शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये १५ टक्के गुणांची सवलत देण्यात आलेली आहे. ही सवलत घेण्यासाठी पात्र उमेदवारांना माजी सैनिक आरक्षणांतर्गत नोंद करण्याकरीता https://mahatet.in या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून त्यांनी १० ऑगस्ट २०२२ पर्यंत आवश्यक ते बदल करावेत, असे …
Read More »राज्यपाल कोश्यारी यांची राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने भेट घेत दिले ‘हे’ निवेदन दिले २१ मागण्यांचे निवेदन
विदर्भ, मराठवाड्यासह राज्यात अतिवृष्टी व पूरामुळे नुकसान झालेल्या भागातील शेतकरी व नागरिकांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत व दिलासा मिळण्यासाठी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची आज (२ ऑगस्ट रोजी) राजभवन येथे भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी ज्येष्ठ नेते व माजी मंत्री छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, अदितीताई …
Read More »संजय शिरसाट म्हणाले, शरद पवार बोलले नाहीत म्हणजे संजय राऊत यांचा… संजय राऊत यांच्या अटकेनंतर बंडखोर आमदार संजय शिरसाट यांचे वक्तव्य
पत्रावाला चाळप्रकरणी शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांना ईडीने अटक केली. राऊतांच्या अटकेनंतर शिवसेनेसह महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यांनी प्रतिक्रिया का दिली नाही? यावरून आता महाराष्ट्रातील राजकारणात तर्क -वितर्क लावले जात आहेत. याच मुद्द्यावरून …
Read More »नाना पटोले म्हणाले, छापेमारी सूडबुद्दीने, पण मोहित कंबोजची भेट योगायोगाने ईडीला फक्त विरोधी पक्षांवर कारवाई करण्याचेच काम; काँग्रेस कारवायांना घाबरत नाही
केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने विरोधकांना संपवण्याचा चंगच बांधला असून ईडीच्या कारवाया हा त्याचाच भाग आहे. सोनिया गांधी व राहुल गांधी यांना चौकशीच्या नावाखाली त्रास देऊनही भाजपा सरकारचे समाधान झालेले नसल्याने आता नॅशनल हेराल्ड वर्तमानपत्राच्या देशभरातील कार्यालयावर छापेमारी केली आहे. ईडीची ही छापेमारी केवळ राजकीय सूडबुद्धीने केली असल्याचा आरोप काँग्रेस …
Read More »
Marathi e-Batmya