राजकारण

उध्दव ठाकरे यांना गुलाबराव पाटील यांचा इशारा, १८ पैकी १२ खासदार अनं २२ आमदार… शिवसेना पक्ष आमचा आहे अनं तो पुन्हा उभा करू

शिवसेनेतील बंडखोरीनंतर किमान राहिलेले तरी आपल्या सोबत रहावेत किंवा आहेत की नाहीत या उद्देशाने शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडून झाडून सर्व शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांना भेटून आपली बाजू मांडत त्यांची मते जाणून घेत आहेत. तसेच आपलीच शिवसेना खरी असल्याचे सांगत असतानाच शिवसेनेचे बंडखोर आमदार गुलाबराव पाटील यांनी अप्रत्यक्ष उध्दव ठाकरे यांना …

Read More »

राज्यात ५० आमदारांचे बंड आणि गॅस मागे ५० रूपयांची दरवाढ काय निष्कर्ष काढायचा? प्रवक्ते महेश तपासे यांचा सवाल

राज्यात एकाबाजूला शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होवून काही तासांचा अवधी होत नाही तोच आजपासून केंद्र सरकारने गॅसच्या दरात ५० रूपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने या दरवाढीवरून खोचक सवाल करत निशाणा साधला आहे. विशेष म्हणजे नुकत्याच झालेल्या सत्ता संघर्षात शिवसेनेतील ४० आमदारांनी तर त्यांना पाठिंबा देणाऱ्या १० असे …

Read More »

नाना पटोले यांचा निशाणा, मोदी सरकारचा नवा नारा ‘न खाने दूँगा और न पकाने दूँगा मोदीजी १०५३ रुपयांचा गॅस सिलिंडर किती लोकांना परवडणार ?

केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने एलपीजी सिलिंडरच्या किमतीत ५० रुपयांची वाढ करून सर्वसामान्य जनतेला महागाईचा आणखी एक झटका दिला आहे. या भाववाढीने गॅस सिलिंडर १०५० रुपये झाला आहे. एवढा महाग गॅस घेणे किती लोकांना परवडणार आहे ? असा सवाल विचारत ‘न खाने दूँगा और न पकाने दूँगा’ हा मोदी सरकारचा …

Read More »

शिवसेनेचे खासदारही आता उध्दव ठाकरे यांची साथ सोडत शिंदे गटाकडे? राष्ट्रपती पदाच्या भाजपा उमेदवार द्रौपदी मुर्म यांना पाठिंबा देण्यासाठी ठाकरेंना पत्र

राज्यात शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील तब्बल ४० आमदारांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या विरोधात बंड पुकारत भाजपाच्या मदतीने राज्यात सरकारही स्थापन केले. त्यानंतर राज्यात उध्दव ठाकरेंचा गट सोडून शिंदे गटात जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तर दुसऱ्याबाजूला संसदेतील अनेक खासदार शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा राज्यात सुरु झालेली असतानाच …

Read More »

शरद पवार यांनी केलेल्या भाकितावर चंद्रकांत पाटील म्हणाले, जे म्हणायचे असते ते… मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्याचा दाखला देत केले वक्तव्य

भाजपा आणि शिंदे गटाने एकत्रित येत राज्यात नवीन सरकार स्थापन केल्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील हे कोथरूड विधानसभा मतदारसंघात दाखल झाले. यावेळी कार्यकर्त्यानी त्यांचे स्वागत केले. यांनतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सरकारच्या भवितव्याबाबत केलेल्या भाकितावर बोलताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपले मत व्यक्त करताना म्हणाले, …

Read More »

उध्दव ठाकरे यांच्या माईक हिसकाविण्याच्या टीकेवर फडणवीस म्हणाले, काळजी करू नका आम्ही एकमेकांना देणारे, घेणारे नाही

विधानसभेच्या दोन दिवसीय अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने काल विश्वासदर्शक ठराव जिंकला. त्यानंतर मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना फडणवीस यांनी मुख्यमंत्री बोलत असताना माईक खेचून घेतला. त्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आज निशाणा साधला. या टीकेला प्रत्युत्तर देताना नागपूरात पोहोचलेल्या …

Read More »

संजय राऊत यांचा टोला; २०० जागांची भाषा दिल्लीतील नेत्यांची, राज्यातील नव्हे आमदार संतोष बांगर यांच्या शिंदे गटात जाण्यावर केले भाष्य

गेलेल्या शिवसेनेच्या आमदारांना परत आणण्याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्यासमोर सातत्याने भूमिका मांडणाऱ्या आमदाराने विश्वासदर्शक ठरावाच्या दिवशी एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश करत शिवसेनेला मोठा झटका दिला. यापार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटात गेलेल्या शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्यावर निशाणा साधला. जे आमदार …

Read More »

राष्ट्रवादीचा सवाल, तुम्ही सत्कारात व्यस्त; नैसर्गिक आपत्तीत लोकांनी करायचं काय ? प्रवक्ते महेश तपासे यांचा उपमुख्यमंत्री फडणवीस आणि मुख्यमंत्री शिंदेंना सवाल

राज्यात नव्याने स्थापन झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपा नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने विश्वासदर्शक ठराव काल विधानसभेत जिंकला. त्यानंतर नागपूरात देवेंद्र फडणवीस यांचे जंगी स्वागत करत त्यांचा मोठा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ठाणे शहरात जंगी स्वागत करण्यात आले. त्यातच मागील …

Read More »

उध्दव ठाकरे यांचा बंडखोरांना इशारा, अश्रुंची किंमत मोजावीच लागणार महिला रणरागिनींच्या मेळाव्यात उध्दव ठाकरे यांनी दिला इशारा

मागील २४-२५ वर्षापासून ज्यांच्या विरोधात आपण लढत होतो. त्यांनी आपल्यावर विश्वास दाखविला. तर ज्यांना सोबत घेवून आपण पुढे निघालो तो आज आपला एक नंबरचा शत्रु निघाला असून तर ज्यांच्या जीवावर आपण पुढे निघालो होतो त्यांनी तर पाठीत खंजीर खुपसला असल्याची टीका करत त्यांच्या खंजीर खुपसण्यामुळे ज्या शिवसैनिकांच्या डोळ्यात अश्रु आले, …

Read More »

मुंबईसह ‘या’ भागात १०० मिलीपेक्षा जास्त पाऊस, मुख्यमंत्री शिंदेंचे लक्ष एनडीआरएफ तसेच इतर यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश

राज्याच्या कोकणासह काही भागात सुरु असलेल्या जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपत्ती व्यवस्थापन आणि मदत कार्यावर लक्ष ठेऊन आहेत. पूर परिस्थितीवर उपाययोजना म्हणून राज्यातील विविध जिल्ह्यात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दल (एनडीआरएफ) आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाच्या (एसडीआरएफ) ११ टीम तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच बेस स्टेशनवर एनडीआरएफच्या ९ …

Read More »