Breaking News

प्रज्वल रेवण्णाने व्हिडिओ जारी करत काँग्रेसवर आरोप, पण मी ३१ मे पूर्वी येणार एसआयटीच्या नोटीसीनुसार हजर होणार

कर्नाटकचे खासदार तथा जनता दल (धर्मनिरपेक्ष) नेते प्रज्वल रेवण्णा, यांच्यावर घरातील घरकाम करणाऱ्या महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप करत इतर अनेक महिलांचे लैगिंक छळ केल्याचा आरोप ऐन लोकसभा निवडणूकीच्या काळात करण्यात आले. त्यानंतर प्रज्वल रेवण्णा याच्या लैंगिक छळाचे अनेक व्हिडिओ व्हायरलही झाले. मात्र प्रज्वल रेवण्णा हे मतदान झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी अज्ञानस्थळी रवाना झाले. त्यातच माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांनी प्रज्वल रेवण्णा यास येण्याचे आवाहन केले. त्यानुसार प्रज्वल रेवण्णा याने ३१ मे रोजी कर्नाटक पोलिसांच्या एसआयटी चौकशी पथकासमोर हजर राहणार असल्याचे एक व्हिडिओ जारी करत जाहिर केले.

प्रज्वल रेवण्णा याने एक व्हिडिओ जारी करत म्हणाला की, माझ्याशी चूक करू नका, ३१ तारखेला सकाळी १० वाजता मी एसआयटीसमोर असेन आणि मी सहकार्य करीन. माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे आणि हे माझ्यावर दाखल करण्यात आलेले खटले हे खोटे असून माझा विश्वास आहे की कायदा मला न्याय देईल.

३३ वर्षीय हसन खासदार यांच्यावर महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. त्याने २६ एप्रिल रोजी अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे व्हिडिओ समोर आल्यानंतर त्याने देश सोडला.

प्रज्वल रेवण्णा यानी त्याच्यावर करण्यात आलेल्या आरोपांना “राजकीय षडयंत्र” असल्याचे सांगत “नैराश्य आणि वितुष्ठवादी” असल्याचे सांगत आपला ठावठिकाणा न लावल्याबद्दल आपल्या कुटुंबीयांची आणि कार्यकर्त्यांची प्रज्वल रेवण्णा याने माफीही मागितली.

https://x.com/zoo_bear/status/1795047040348573842

प्रज्वल रेवण्णा म्हणाले की, माझ्या परदेशात ठावठिकाणाबाबत योग्य माहिती न दिल्याबद्दल मला माझ्या कुटुंबातील सदस्यांची, माझे कुमारअण्णा [काका एचडी कुमारस्वामी] आणि पक्ष कार्यकर्त्यांची माफी मागायची आहे. २६ एप्रिलला निवडणुका संपल्या तेव्हा माझ्याविरुद्ध कोणताही खटला नव्हता. मी गेल्यानंतर दोन किंवा तीन दिवसांनी एसआयटी तयार झाली नाही, मी माझ्या वकिलामार्फत एसआयटीला सात दिवसांचा वेळ मागितला.

प्रज्वल रेवण्णा यानी पुढे अधोरेखित केले की काँग्रेस नेते राहुल गांधी आणि इतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी या प्रकरणाबद्दल जाहीरपणे बोलत आरोप केला आणि, “हे एक राजकीय षडयंत्र आहे असल्याचा दावा ही स्वतःच्या बचावासाठी केला.

जनता दल सेक्युलर JD(S) हा कर्नाटकातील भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (NDA) भाग आहे.

एसआयटीने दाखल केलेल्या नोटीशीनंतर विशेष न्यायालयाने १८ मे रोजी प्रज्वल रेवण्णा याच्या विरोधात अटक वॉरंट जारी केले होते. सीबीआय मार्फत एसआयटीने केलेल्या विनंतीनंतर इंटरपोलने त्याच्या ठावठिकाणाविषयी माहिती मागणारी ‘ब्लू कॉर्नर नोटीस’ आधीच जारी केली.

गेल्या आठवड्यात कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून प्रज्वलचा डिप्लोमॅटिक पासपोर्ट रद्द करण्याची विनंती केली होती.

आमदार एचडी रेवण्णा यांच्यावरही त्यांच्या मुलासह दोन खटले आहेत. एक स्वयंपाकाच्या विनयभंगाशी संबंधित आहे, जिच्यावर प्रज्वलने बलात्कार केल्याचा आरोप आहे आणि दुसरा एका महिलेच्या अपहरणाशी संबंधित आहे. तो जामिनावर बाहेर आहे.

Check Also

पैठण, गंगापूर येथे जिल्हा अतिरिक्त न्यायालय हिंगोली स्वतंत्र न्यायिक जिल्हा परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांचे न्यायिक काम परभणीतून

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण व गंगापूर येथे जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालय तसेच हिंगोली स्वतंत्र न्यायिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *