Breaking News

प्रकाश आंबेडकर यांची स्पष्ट भूमिका, एससी, एसटींना क्रिमीलेयर नको आरक्षण धोरण हे आर्थिक विकासाचे नसून सामाजिक न्यायाचे

वंचित बहुजन आघाडी एससी SC अर्थात अनुसूचित जाती आणि एसटी ST अर्थात अनुसूचित जमाती च्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणामधील क्रिमीलेयरच्या विरोधात असल्याची भूमिका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून स्पष्ट केली.

ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पुढे आपल्या ट्विट म्हणाले की, न्यायमूर्ती गवई हे क्रिमी लेयरवर प्रवचन देत आहेत. परंतु, त्यांचे दिवंगत वडील रा सु गवई राज्यसभेत खासदार असताना ते न्यायाधीश झाले. त्यांचे दिवंगत वडील हे १९६४ ते २०११ या कालावधीत ३ वेगवेगळ्या राज्यांचे राज्यपाल होते. तसेच ते लोकसभा आणि राज्यसभेचे खासदार, महाराष्ट्रात विधान परिषदेचे सभापती, आमदार होते अशी आठवणही यावेळी न्यायाधीश बी आर गवई यांना करून दिली.

मग हा दांभिकपणा का ?

प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले की, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचे आरक्षण धोरण हे आर्थिक विकासाचे धोरण नसून सामाजिक न्यायाचे हत्यार आहे. दलित प्रशासनाचा भाग नव्हते आणि त्यांना सैन्यातही भरती करण्यात आले नव्हते. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी न्यायीक धोरण म्हणजे अत्याचारितांवर होणारा अन्याय दूर करण्यासाठी धोरण आखणे हे असते असेही यावेळी स्पष्ट केले.

Check Also

छगन भुजबळ यांचा आरोप, जरांगेच्या मागे राजेश टोपे आणि रोहित पवार… राजेश टोपे यांचा बोलण्यास नकार

राज्यातील आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण समर्थक आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी भाजपा प्रणित …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *