पृथ्वीराज चव्हाण यांचा सवाल, जे व्हेनेझुएलामध्ये घडले ते भारतात घडेल का? एका वृत्तसंस्थेशी बोलताना उपस्थित केला सवाल

काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांच्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ‘अपहरण’ करू शकतात का, असा सवाल उपस्थित केल्याने एका नव्या वादाला सुरुवात केली.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लावलेल्या शुल्कांवर भाष्य करताना पृथ्वीराज चव्हाण यांनी हे विधान केले. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासोबतचा व्यापार विस्कळीत करण्यासाठी शुल्कांचा वापर केला असल्याचे सांगत पुढे म्हणाले की, डोनाल्ड ट्रम्प यांनी अतिरिक्त ५०% शुल्क लावले तरी काही फरक पडणार नाही. त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी सवाल केला की, डोनाल्ड ट्रम्प आता भारताच्या पंतप्रधानांचे ‘अपहरण’ करतील का?

पुढे बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, “प्रश्न हा आहे की, व्हेनेझुएलामध्ये जे घडले ते भारतात घडेल का? डोनाल्ड ट्रम्प आपल्या पंतप्रधानांचे अपहरण करतील का?” असा सवालही यावेळी उपस्थित केला.

“काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण निर्लज्जपणे भारताच्या परिस्थितीची तुलना व्हेनेझुएलाशी करत आहेत. ‘व्हेनेझुएलामध्ये जे घडले ते भारतात घडू शकते का’, असा प्रश्न विचारून काँग्रेस आपला भारतविरोधी दृष्टिकोन स्पष्ट करत आहे,” असे भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्त्याने ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

दुसऱ्या एका मुलाखतीत, पृथ्वीराज चव्हाण यांनी अशीच विधाने केली आणि व्हेनेझुएलामध्ये जे घडले ते भारतातही घडू शकते, असे म्हटले. या संकटावर केंद्र सरकारच्या कथित मौनावरून त्यांनी केंद्रावर हल्ला चढवला आणि व्हेनेझुएलामधील घडामोडी ‘संयुक्त राष्ट्रांच्या सनदेच्या विरोधात’ असल्याचे म्हटले. अशा कृतींमुळे जागतिक स्तरावर एक धोकादायक पायंडा पडू शकतो, असा इशाराही त्यांनी दिला.

पृथ्वीराज चव्हाण पुढे बोलताना म्हणाले की, “व्हेनेझुएलामध्ये जे काही घडले आहे ते संयुक्त राष्ट्रांच्या सनदेच्या विरोधात आहे. एका निवडून आलेल्या राष्ट्राध्यक्षांचे अपहरण करण्यात आले आहे. ही एक अत्यंत गंभीर चिंतेची बाब आहे की उद्या हे कोणत्याही दुसऱ्या देशासोबत होऊ शकते. उद्या हे भारतासोबतही होऊ शकते.”

पृथ्वीराज चव्हाण यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणावरही निशाणा साधला आणि प्रमुख जागतिक संघर्षांवर सरकार स्पष्ट भूमिका घेण्यात अपयशी ठरल्याचा आरोप केला.

पुढे बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, “भारताने नेहमीप्रमाणेच व्हेनेझुएलाच्या मुद्द्यावर काहीही भूमिका घेतलेली नाही. रशिया आणि चीनने भूमिका घेतली आहे आणि अमेरिकेने केलेल्या कृतीवर टीका करत पूर्वीच्या संघर्षांशी तुलना केली.

पुढे बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, “युक्रेन युद्धातही असेच घडले. आम्ही कोणतीही बाजू घेतली नाही. आम्ही इस्रायल-हमासच्या मुद्द्यावर कोणतीही भूमिका घेतली नाही, आणि आता आम्ही अमेरिकनांना इतके घाबरलो आहोत की जे घडले आहे त्यावर टीका करण्याचा प्रयत्नही करत नाही,” असे त्यांनी पुढे म्हटले. काँग्रेस नेत्याने व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांच्यावर लावलेल्या आरोपांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले, ज्यांच्यावर अमेरिकेने अंमली पदार्थांच्या तस्करीमध्ये सामील असल्याचा आरोप केला.

पृथ्वीराज चव्हाण पुढे म्हणाले की, “मादुरो स्वतः अंमली पदार्थांची तस्करी करत आहेत, हा एक खोटा दावा आहे. यासाठी काही पुरावा असायला हवा, पण कोणताही पुरावा नाही,” असे सांगत त्यांच्यावरील खटला राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे मत व्यक्त केले.

पृथ्वीराज चव्हाण यांच्या मते, व्हेनेझुएलाचे प्रचंड ऊर्जा साठे हे या संकटाच्या मुळाशी आहेत. “हा संपूर्ण तपास व्हेनेझुएलावर आधारित आहे, कारण व्हेनेझुएलाकडे जगातील तेलाचा सर्वात मोठा साठा आहे आणि अमेरिका त्यावर नजर ठेवून आहे, की तेलाचा वापर शस्त्र म्हणून कसा केला जातो,” असेही स्पष्ट केले.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, आंतरराष्ट्रीय समुदायातील काही घटकांनी अमेरिकेच्या या कारवाईवर टीका केली आहे, परंतु भारताने मौन बाळगणे पसंत केले आहे. “आंतरराष्ट्रीय समुदायाने यावर टीका केली आहे आणि भारत नेहमीप्रमाणे शांत आहे,” असल्याची बाबही निदर्शनास आणून दिली.

पृथ्वीराज चव्हाण यांनी हा मुद्दा भारताच्या जागतिक महत्त्वाकांक्षेपर्यंत वाढवला आणि स्पष्ट भूमिका घेतल्याशिवाय नवी दिल्ली नेतृत्वपदाची आकांक्षा बाळगू शकते का, असा सवाल करत “जर आपण म्हणत असाल की भारत ही जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे, तर तुम्हाला भूमिका घ्यावी लागेल. जर तुम्हाला सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्य व्हायचे असेल, तर तुम्हाला भूमिका बजावावी लागेल. असे चालणार नाही,” असेही यावेळी स्पष्ट केले.

शेवटी बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, “तुम्ही दोन्ही बाजूंना खूश करू शकत नाही. या संदर्भात, तुम्हाला भूमिका घ्यावी लागेल. यात काहीतरी गडबड आहे,” असे सांगत पुढे म्हणाले आंतरराष्ट्रीय समुदायाचा भाग म्हणून भारताने ‘उच्च स्तरावर’ आपले मत मांडावे, असे आवाहनही यावेळी केले.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांची भावुक, ‘मित्रशोक हृदय आणि अंतस्थ आत्म्यालाही जाळतो’ शोकप्रस्तावा दरम्यान व्यक्त केली भावना

राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मांडण्यात आला. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *