महापालिकेच्या ठेवीवरून नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना ठेवू काय चाटायला नसतात असे वक्तव्य केले. या वक्तव्यावरून उद्धव ठाकरे यांनीही मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर पलटवार करत म्हणाले की, मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटल्याप्रमाणे ठेवी काय चाटायला नसतात हे अशोभनीय वक्तव्य आहे. मला त्यांना सांगायचं की तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे. ठेवी चाटायला नसतात. पण काँट्रेक्टरचे बूट चाटून त्यांना वाटायलाही नसतात असे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वक्तव्याची परतफेडही केली.
मुंबई महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठाचे उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा संयुक्त वचननामा शिवसेना भवनात आयोजित पत्रकार परिषदेवेळी केली. त्यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते.
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, त्यांनी संपूर्ण विल्हेवाट लावायचं ठरवलं आहे. जमा खर्चाचा ताळमेळ साधून खर्च केला जातो, किती पैसा जमा होणार आहे. माझ्या माहितीप्रमाणे महापालिकेचे १५ हजार कोटी खर्चाचा अर्थसंकल्प आहे, तीन लाख कोटींच देणं करून ठेवलं आहे. तीन लाख कोटींचां घोटाळा या खर्चासुरांनी केलेला असल्याचा आरोपही यावेळी केला.
मुंबईचा महापौर मराठी हिंदू होणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरे बोलताना म्हणाले की, याचा अर्थ भाजपा मराठी माणसाला हिंदू समजत नाही का, आम्ही मराठी आहोत, अस्सल हिंदूच आहोत, यावेळी राज ठाकरे यांनी मुंबईचा महापौर मराठीच होणार असल्याचा निर्धारही यावेळी व्यक्त केला.
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आम्ही मुंबईसाठी खूपच छोट्या केल्या. त्याचं श्रेय तुम्ही कशाला घेता असा खोचक टोला लगावत आम्ही साधीची कामं केली आहेत. ती आम्ही होर्डिंग्जवर दाखवतो, साधं कोस्टल रोडचं काम केलंय, मध्य वैतारणाचं काम केलं आहे. कोरोना काळात कामं केली आहेत. आमच्या कामांच श्रेय घेण्यापेक्षा त्यांनी जी कामे केली आहेत. म्हणजे मोदींनी कैलास पर्वत बांधला, स्वर्गातून गंगा आणली, मिंधेनी समुद्र तयार केला. याचं श्रेय मागे पडतंय, रिगलच्या येथे जो बाळासाहेबांचा पुतळा उभारण्यात आला ती जागा मी निवडली होती. त्याचा खर्च आम्ही केला. तरीही श्रेय मिंधे घेतो आहे. केलास पर्वत मोदींनी बांधला हे का सांगत नाही, अरबी समुद्र मिंधे आणि फडणवीस यांनी बांधलं. समुद्र मंथन करून ते शिवस्मारक कधी आणणार एकनाथ शिंदे- फडणवीसांना कोणी ओळखतं नव्हतं. तेव्हापासून आम्ही कोस्टल रोडचं प्लॅनिंग केलंय. ही कामं साधी आहेत. त्यापेक्षा कैलास पर्वत मोदींनी आणला, स्वर्गातून गंगा आणली याचं श्रेय घ्या आमच्या श्रेय घेताना हे मागे पडत आहे असा टोलाही यावेळी लगावला.
Marathi e-Batmya