विधानसभा निवडणूकीचा निकाल जाहिर झाल्यानंतर काका शरद पवार आणि पुतण्या अजित पवार यांनी एकमेकांपासून दूर राहणेच पसंत केल्याचे दिसून आतापर्यंत दिसून आले. तसेच कार्यक्रमाच्या निमित्ताने एकाच मंचावर बसणेही टाळले. परंतु वसंतदादा पाटील शुगर इन्स्टीट्युटच्या आज आयोजित कऱण्यात आलेल्या कार्यक्रमात मात्र मंचावर एकत्रित बसण्याआधी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार आणि महाएनसीपीचे प्रमुख अजित पवार यांची शेजारी-शेजारी असलेली आसन व्यवस्था पुन्हा एकदा अजित पवार यांनी बदलली. मात्र ही आसन व्यवस्था बदलण्याआधी बंद दाराआड काका-पुतण्यामध्ये काय चर्चा झाली याची उत्सुकता सध्या लोकांमध्ये सुरु झाली.
वसंतदादा पाटील शुगर इन्स्टीट्युटमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी शरद पवार यांच्या खुर्ची शेजारी अजित पवार यांची आसान व्यवस्था करण्यात आली होती. परंतु तत्पूर्वी बंद दाराआड अजित पवार आणि शरद पवार यांच्यात एक बैठक झाली. या बैठकीत काक-पुतण्यामध्येच काय चर्चा झाली, कोणते पुढील राजकिय डावपेचाबाबत चर्चा झाली याबाबत उत्सकुता राजकिय वर्तुळात निर्माण झाली आहे.
बैठकीनंतर बाहेर आलेल्या अजित पवार यांना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी गाठत या बंद दाराआड बैठकीत काय चर्चा झाली याबाबत विचारणा केली. त्यावर अजित पवार म्हणाले की, राज्यातील साखर कारखान्यांच्या साखर संघाच्या प्रश्नासंदर्भात चर्चा झाली. तर त्यानंतर कार्यक्रमाच्या सुरुवातील अजित पवार यांनी शरद पवार यांच्या शेजारी त्यांच्या नावाची पाटी असलेली पाटी घेऊन काढून घेत शरद पवार यांच्यापासून एक खुर्ची अर्थात एक हात अंतरावरील खर्चीवर बसले त्यावेळी अधिकाऱ्यांना इशाऱ्याच्या माध्यमातून शरद पवार यांच्या शेजारी बाळासाहेब पाटील यांच्या नावाची पाटी लावण्यात आली.
कार्यक्रम सुरु झाल्यानंतरही शदर पवार, त्यांच्या शेजारी बाळासाहेब पाटील आणि नंतर अजित पवार अशी आसन व्यवस्था अजित पवार यांनी निर्माण यांनी करून घेतल्याचे दिसून आले.
त्यानंतर यासंदर्भात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी विचारले असता अजित पवार म्हणाले की, साहेबांशी (शरद पवार) मी कधीही बोलू शकतो. पण बाळासाहेब पाटील यांना साहेबांशी बोलायचे असल्याने मी एक खुर्ची सोडून बसल्याचे सांगत माझा आवाजच असा आहे की, दोन लोकांनंतर तिसऱ्या व्यक्तीपर्यंत माझा हळु आवाजही पोहोचतो अशी मिश्किल टीपण्णी करत या विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
Marathi e-Batmya