Breaking News

बदलापूरप्रकरणी सरकारवर टीका करत शरद पवार यांनी दिली शपथ भरपावसात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर केले आंदोलन

बदलापूर प्रकरणी राज्य सरकारच्या विरोधात आज पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला मुंबई उच्च न्यायालयाने अटकाव केल्यानंतर महाविकास आघाडीचे प्रमख नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन केले. आंदोलनावेळी शरद पवार यांनी उपस्थित कार्यकर्त्ये-पक्षाचे पदाधिकाऱ्यांनी यांना शपथ दिली. तसेच राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या कारभारावरून टीकाही केली. विशेष म्हणजे पुण्यात आज सकाळपासून पावसाला सुरुवात झाली होती. तरीही या पावसात शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले.

यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, बदलापूर येथे एक अस्वस्थ करणारी घटना घ़डली. त्या घटनेचा निषेध करण्यासाठी आपण एकत्र आलो. बदलापूरात जो अत्याचार झाला, त्यामुळे संबध देशभरात महाराष्ट्राच्या नावलौकिकेला धक्का बसला आहे. महिलांच्या संरक्षणाची जबाबदारी राज्य सरकारवर आहे, पण त्याची जाणीव राज्य सरकारला राहिली नाही. त्यामुळे बदलापूरप्रकरणी निषेध होत असताना आणखीही अशाच दुर्दैवी घटना घडल्या. महाराष्ट्रात एक दिवसही असा जात नाही की, भगिनींवर अत्याचार झाल्याची बातमी वाचायला मिळते. हे राज्य शिवछत्रपतींच आहे. त्यांनी आपल्या राजवटीत त्या आरोपीचे हात कलम करण्याची शिक्षा दिली होती असेही यावेळी सांगितले.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, आजच्या स्थितीत जे घडलं त्याची गांभीर्याने नोंद सरकारने घेतली पाहिजे. संवेदनशील भूमिका घेतली पाहिजे, परंतु राज्यकर्त्ये, राज्याचे प्रमुख आणि त्यांचे सहकारी म्हणतातयत की, बदलापूर प्रकरणात विरोधक राजकारणात आणत आहे. मुलीबाळींवरींल अत्याचाराबाबत कोणी आवाज काढला तर हा निष्कर्ष काढत असतील तर राज्यकर्त्ये किती असंवेदनशील आहेत, भगिनींकडे पाहण्याचा दृष्टीकोन किती चमत्कारीक आहेत, याची प्रचिती येते अशी खोचक टीका केली.

यावेळी शरद पवार यांनी उपस्थितांना महिला सुरक्षेची शपथ दिली,

मी शपथ घेतो की, स्त्रिंयांवर होणारा अत्याचार कधीही खपवून घेणार नाही. माझे घर, माझा परिसर, माझे गावं, माझे कार्यालय अशा कोणत्याही ठिकाणी जर महिलांची छेडछाड, किंवा अत्याचार होत असेल तर त्यास मी विरोध करून त्याबद्दल आवाज उठविन, मी मुलगा आणि मुलगी असा भेदभाव कधीही करणार नाही, महिलांचा सन्मान राखीन, आणि या पुण्यनगरीत, महाराष्ट्रात आणि देशात महिलांसाठी अधिकाधिक सुरक्षित व भयमुक्त स्थिती बनविण्यासाठी प्रयत्न अशी शपथही यावेळी शरद पवार यांनी उपस्थितांना दिली.

Check Also

भाजपा सोलापूरातील एका आमदाराला घरी बसविणार वाढत्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये खलबतं सुरु

आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपाकडून पुन्हा सत्तेत येण्याच्या अनुषंगाने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *