शरद पवार यांचा इशारा, रस्ता चुकला की त्याला जागा दाखवलीच पाहिजे अजित पवार यांच्यासह सोडून गेलेल्या आमदारांना दिला इशारा

राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराचा खऱ्या अर्थाने सुपर संडे, उद्या संध्याकाळी विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराची सांगता होईल आणि ४८ तासानंतर प्रत्यक्ष मतदानाचा दिवस अर्थात २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. दरम्यान राष्ट्रवादीतील काका शरद पवार आणि पुतण्या अजित पवार यांच्यात कोण कोणावर मात करणार याचा फैसलाही या निवडणूकीच्या निमित्ताने बारामतीत होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकिय समीकरणंही आता चांगलीच बदलेली आहेत. या सगळ्या घडामोडीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी अजित पवार यांच्यासह सोडून गेलेल्या आमदारांना इशारा देत रस्ता चुकला की त्याला जागा दाखवलीच पाहिजे असे सांगत नाद करायचा पण… असा सज्जड इशाराही ही यावेळी दिला.

शरद पवार हे सोलापूरातील टेंभूर्णी येथील प्रचारसभेसाठी आले होते. त्यावेळी त्यांनी अजित पवार यांच्यासह सोडून गेलेल्या ४० आमदारांना दिला.

यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, १९८० साली निवडणूक झाली. त्या निवडणूकीत माझे आणि सहयोगी पक्षाच्यावतीने एकंदरीत ५८ आमदार निवडूण आले. मी ५८ लोकांचा नेता झालो. विरोधी पक्षनेता झालो. मी चार दिवसांसाठी परदेशी गेलो आणि परत आलो तर तत्कालीन मुख्यमंत्री अंतुले यांनी काही चमत्कार केला होता. निवडूण आलेल्या ५८ आमदारांपैकी ५२ आमदारांना ते घेऊन गेले. त्यामुळे मी फक्त ६ आमदारांचा नेता राहिलो, विरोधी पक्षनेते पदही गेल्याची आठवण सांगितली.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, आता करणार अशी चर्चा होती. काही केलं नाही. दुसऱ्या दिवशी बाहेर पडलो, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेलो. तीन वर्षे अहोरात्र प्रयत्न केले. निवडणूकीला जे मला सोडून गेले. त्यांच्या विरोधात नव्या पिढीचे उमेदवार उभे केले. आणि मला अभिमान वाटतो की ते ५२ आमदार पडले असेही यावेळी सांगितले.

शेवटी बोलताना म्हणाले की, एकदा रस्ता चुकला की त्याला त्याची जागा दाखवलीच पाहिजे. त्यांची जागा दाखवायची असेल तर उद्याच्या निवडणूकीत साधं सुधं पाडायचं नाही. जोरात पाडायचं पूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे की सगळ्याचा नाद करायचा पण असे म्हणताच समोरच्या उपस्थितांमधून आवाज आला की शरद पवारांचा करायचा नाही असा इशाराही सोडून गेलेल्या आमदारांना यावेळी दिला.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, अमेरिकेबरोबर व्यापारी करार केल्याने शेतमालाचे भाव पडले सरकारकडे पैसे नसताना ८८ हजार कोटी रुपयांच्या महामार्गाची गरजच काय?

अमेरिकेबरोबर व्यापारी करार झाल्यापासून भारतातील सर्व शेतमालांचे भाव पडले आहेत, फळांचेही भाव पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *