सुनिल तटकरे म्हणाले, अजितदादांनी तुमच्या जीवावर महाराष्ट्र…

अजितदादांनी तुमच्या जीवावर महाराष्ट्र घडवण्याची जबाबदारी घेतली आहे ती आपल्याला पार पाडायची आहे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी वैचारिक मंथन शिबीरात केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वैचारिक मंथन शिबिराची सुरुवात आज कर्जत येथे झाली. शिबीराच्या सुरुवातीला ध्वजारोहण राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या हस्ते पार पडले.

पुढे बोलताना सुनिल तटकरे म्हणाले, भिन्न विचारसरणीचे वेगवगळे पक्ष देशात एकत्र येतात तर मग आम्ही शाहू – फुले – आंबेडकरांच्या विचारांचा वारसा जपत महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी झालो तर आमचे काय चुकले असा सवालही उपस्थित केला.

तसेच सुनिल तटकरे म्हणाले, अजितदादांमुळेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभा राहिला हे स्पष्टपणे ठणकावून सांगतानाच अजितदादांचे पक्षासाठीचे योगदान कोण विसरू शकत नाही. ‘घड्याळ तेच वेळ नवी’ या वैचारिक शिबिरातून नवी दिशा घेत पक्षाची भविष्यात वाटचाल करायची आहे असेही सांगितले.

सुनिल तटकरे यांनी सांगितले की, अजितदादांनी घेतलेला निर्णय कसा योग्य आहे हे कृतीतून दाखवून देऊया असे आवाहनही करत राष्ट्रवादी काँग्रेसचे ५३ पैकी ४३ आमदार अजित पवार यांच्या पाठीशी उभे राहतात याचाच अर्थ आपल्या नेतृत्वाने केलेले काम समोर येते असेही स्पष्ट केले.

सुनिल तटकरे यांनी मराठा आरक्षण प्रश्नी भूमिका मांडताना म्हणाले, सकल मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही पक्षाची भूमिका असल्याचे स्पष्ट करत अजितदादा तुमची प्रत्येक हालचाल बातमी होते. पण राजकीय आजार घेऊन दादा घरात बसणारा नेता नाही हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे ठणकावून सांगत अजितदादांनी घेतलेली भूमिका किती योग्य आहे हे आपल्याला जनतेपर्यंत पोचवायचे आहे. मात्र काहीजण दादांनी सत्तेसाठी, यंत्रणांच्या भीतीपोटी भूमिका घेतली अशी टीका करत आहेत त्यालाही सडेतोड उत्तर दिले.

शिबीराच्या सुरुवातीला ध्वजारोहण राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या हस्ते पार पडले.

या वैचारिक मंथन राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, कृषीमंत्री धनंजय मुंडे, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील, अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मारावबाबा आत्राम, क्रीडा मंत्री संजय बनसोडे, महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, सेवादल अध्यक्ष राजेंद्र लावंघरे, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम, सामाजिक न्याय सेल प्रदेशाध्यक्ष सुनील मगरे, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे, राज्य समन्वयक ईश्वर बाळबुधे, अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष इद्रीसभाई नायकवडी आदींसह पक्षाचे आमदार, खासदार, पक्षाचे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, कार्याध्यक्ष, युवक, युवती, महिला, विद्यार्थी पदाधिकारी उपस्थित होते.

About Editor

Check Also

जयंत पाटील यांची मागणी, राज्य शासनाने पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट व सरचार्ज रद्द करण्याचा निर्णय घ्यावा मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र पाठवित केली मागणी

कठीण आर्थिक परिस्थितीत नागरिकांच्या हिताचा विचार करून राज्य शासनाने पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट व सरचार्ज तात्काळ रद्द …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *