Breaking News

सुप्रिया सुळे यांचा टोला, … हे मी नाही सांगत तर केंद्राचा डेटाच सांगतोय जो न्याय दुसऱ्या राज्यांना तोच महाराष्ट्राला मिळाला पाहिजे

भारताच्या ७८ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रवादी भवन प्रदेश कार्यालय, मुंबई येथे ध्वजारोहण करून तिरंग्याला सलामी देण्यात आली. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात बलिदान दिलेल्या सर्व महापुरुषांना वंदन करुन राष्ट्रीय कार्याध्यक्षा तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रध्वज फडकवला. आजचा दिवस साजरा करताना जो न्याय दुसऱ्या राज्याला तोच न्याय महाराष्ट्राला मिळावा अशी अपेक्षा सत्ताधाऱ्यांचे नाव न घेता टोला लगावत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.

पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, यावर्षी महाराष्ट्रात मागील वर्षाच्या तुलनेत चांगला पाऊस झाला आहे. परंतु राज्यातील काही भागांमध्ये हवा तेवढा पाऊस पडलेला नाही. ज्या भागामध्ये पाऊस कमी पडला त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. महागाई ,बेरोजगारी ,भ्रष्टाचाराचे आव्हान राज्य आणि देशासमोर आहे. शेतकरी असो ,अनेक ठिकाणी पिण्याच्या प्राण्यांचे प्रश्न असतील महागाई ,बेरोजगारी, भ्रष्टाचाराचे आव्हान राज्यासमोर आणि देशासमोर, असल्याचे सांगितले.

सुप्रिया सुळे पुढे बोलताना म्हणाल्या की, आपल्यासमोर देखील एका वर्षांपूर्वी एक संघर्ष आला होता, मला आठवते आपण सर्व इथे उभे होतात, ना पक्ष होता ना चिन्ह होते. गेल्या वर्षापासून आपण संघर्ष करत आहोत. आणि शेवटी सत्यमेव जयते त्याचाच विजय होतो. महाराष्ट्राच्या मायबाप जनतेचे आभार मानले पाहिजे ना पक्ष, ना चिन्ह महाविकास आघाडीचे ३३ खासदार जनतेने निवडून दिले. महाराष्ट्राने आपल्याला यश दिले पण या यशा बरोबर आपल्याला प्रचंड जबाबदारी दिलेली आहे. आपल्याला आलेल्या यशाबरोबर जबाबदारीही आलेली आहे. प्रत्येकाने आपल्या जबाबदारीचे पालन करावे आपले कार्यकर्ते पदाधिकारी यांनी ताकतीने उभे राहिले पाहिजे अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त केली.

पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, पुढचा काळही संघर्षाचा आहे. कारण महागाई, बेरोजगारी महाराष्ट्रात हे कमी होताना दिसत नाही. महाराष्ट्रात महिलांवरचे अत्याचार वाढत आहेत. हे मी नाही सांगत आहे. हे केंद्र सरकारचा डेटा सांगत आहे. महागाई , बेरोजगारीला जबाबदार अर्थातच हे सरकार आहे. मला जे जे कार्यकर्ते पदाधिकारी भेटतात ते ते त्यांच्या मतदारसंघातील बेरोजगारी महागाई प्रश्न मांडतात नोकऱ्या येतात आणि दुसऱ्या राज्यात जात आहेत. दुसऱ्या राज्याचे भलं होत आहे. त्याबद्दल आम्हाला काही म्हणायचं नाही. पण याही राज्यातील तरुणांना न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी केली.

सुप्रिया सुळे पुढे बोलताना म्हणाल्या की, या राज्यातील तरुण सुशिक्षित आहेत पण ते बेरोजगार आहेत. त्याबद्दल आपण आवाज उठवला पाहिजे. इतर राज्याप्रमाणे या राज्यालाही न्याय मिळाला पाहिजे महात्मा गांधी म्हणायचे ना झुकूगा ना झुकने दूंगा तसंच महाराष्ट्र दिल्ली समोर कधीही झुकला नाही आणि झुकणार ही नाही. आपल्याला महाराष्ट्रात स्वाभिमानी सरकार आणायच आहे. महाराष्ट्रात होणाऱ्या चुकीच्या गोष्टी विरोधात आवाज उठवायचा असल्याचा निर्धारही यावेळी व्यक्त केला.

यावेळी राष्ट्रीय सचिव नसीम सिद्दीकी, राष्ट्रीय प्रवक्ते क्लाईड क्रास्टो ,मुंबई विभागीय अध्यक्षा राखीताई जाधव, मुख्य प्रवक्त्या विद्याताई चव्हाण, सेवा दल प्रदेशाध्यक्ष डॉ. जानबा म्हस्के, प्रदेश सरचिटणीस रवींद्र पवार, प्रदेश सरचिटणीस बबन कनावजे, प्रदेश सरचिटणीस अदितीताई नलावडे, प्रदेश उपाध्यक्ष चाँदबीबी झैदी, प्रदेश चिटणीस भालचंद्र शिरोळे, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष रुपेश खांडके, मुंबई विभागीय अल्पसंख्याक सेल अध्यक्ष सुहेल सुबेदार, मुंबई विभागीय विद्यार्थी अध्यक्ष प्रशांत दिवटे, मुंबई विभागीय सरचिटणीस मुबारक खान यांसह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

नाना पटोले यांचा टोला, … भाजपाचा आरोप म्हणजे ‘उलटा चोर कोतवाल को डांटे’ गोंदियाचे भाजपा नेते गोपाल अग्रवाल यांची काँग्रेसमध्ये घर वापसी

लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी भाजपाने कोट्यवधी रुपये खर्च केले, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *