Breaking News

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे आणि महायुतीचे हे उमेदवार विजयी काँग्रेसचे ३, अजित पवार गटाचा एक, एकनाथ शिंदे गटाचा दोन, उबाठा गटाला २, शरद पवार गटाला ४

लोकसभा निवडणूकीच्या मतमोजणीला सकाळी ८ वाजता सुरुवात झाली. त्यानंतर दुपारपर्यंत महाराष्ट्रातील महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांच्या विजयाचे कल जाहिर होण्यास सुरुवात झाली. साधारणतः दिड वाजल्यापासून विजयी उमेदवार घोषित होण्यास सुरुवात झाली.

सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील आणि भाजपाचे संजय काका पाटील आणि शिवसेना उबाठा गटाचे पैलवान उमेदवार चंद्रहार पाटील यांच्यात लढत झाली. मात्र या तिन्ही उमेदवारांपेकी प्रमुख लढत ही अपक्ष उमेदवार विशाल पाटील आणि भाजपाचे संजय काका पाटील यांच्यातच झाली. यात विशाल पाटील यांना ४ लाख ९२ हजार १३१ मते मिळाली तर भाजपा उमेदवार संजय काका पाटील यांना ४ लाख ८ हजार ८७८ मते मिळाली. ८३ हजार २५३ मते मिळवित विशाल पाटील यांनी भाजपाचे संजय काका पाटील यांच्यावर मात करत विजय मिळविला.

महाराष्ट्रात काँग्रेसच्या पहिल्या विजयी उमेदवाराचा सलामी गोवाल पाडवी यांनी दिली. गोवाल पाडवी यांना काँग्रेस ६ लाख २९ हजार ७२१ मते पडली. तर भाजपाच्या उमेदवार हिना गावित यांना ४ लाख ८८ हजार ९८६ मते मिळाली. यात गोवाल पाडवी यांनी १ लाख ४० हजार ७३५ मतांची आघाडी घेत हिना गावित यांचा पराभव केला.

त्यानंतर शिवसेना उबाठा गटाने पहिल्यांदाच राज्यसभेचे खासदार अनिल देसाई यांना दक्षिण मध्य मधून उमेदवारी दिली. या मतदारसंघात विद्यमान शिंदे गटाचे विद्यमान खासदार राहुल शेवाळे यांच्या होत होता. दक्षिण मध्य मुंबईतून शिवसेना उबाठाचे अनिल देसाई यांना ३ लाख८९ हजार १३९ मते मिळविली. तर शिंदे गटाच्या राहुल शेवाळे यांना ३ लाख ३६ हजार ४३० मते. अनिल देसाई यांना राहुल शेवाळे यांच्यापेक्षा ५३ हजार ३८४ मतांची आघाडी घेत विजय मिळविला. त्यामुळे अनिल देसाई यांच्या रूपाने शिवसेना उबाठा गटाने मुंबईत आपले खाते उघडले.

त्यानंतर दक्षिण मुंबईतून शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार अरविंद सावंत आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या उमेदवार यामिनी जाधव यांच्यात झाली. सुरुवातीला यामिनी जाधव या मतांच्या आघाडीवर होत्या. मात्र सकाळी ११ नंतर अरविंद सावंत यांनी आघाडी घेण्यास सुरुवात केली ती शेवटपर्यंत कायम ठेवली. अरविंद सावंत यांना ३ लाख ९१ हजार ६२३ मते मिळवली. तर यामिनी जाधव यांना ३ लाख ३९ हजार ३२२ इतकी मते मिळाली. यामिनी जाधवपेक्षा अरविंद सावंत यांना ५२ हजार ३०१ इतकी जास्तीची मते मिळवित विजय मिळविला.

सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे आणि भाजपाचे उमेदवार राम सातपुते यांच्या अंत्यत चुरशीची लढत झाली. आज झालेल्या मतमोजणीत अगदी सुरुवातीपासून प्रणिती शिंदे यांनी राम सातपुते यांच्या विरोधात मतांची आघाडी घेतली होती. दुपार अखेर प्रणिती शिंदे यांना ५ लाख २४ हजार ७४६ मते मिळवली. तर भाजपाच्या राम सातपुते यांना ४ लाख ४७ हजार ०७७ मते मिळाली. यात प्रणिती शिंदे यांना ७७ हजार ६६९ मतांची आघाडी मिळवित राम सातपुते यांचा पराभव केला.

त्याचबरोबर मुंबईतून उत्तर मध्यमधून काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड आणि भाजपाचे उमेदवार अॅड उज्वल निकम यांच्या प्रामुख्याने लढत झाली. यात काँग्रेस उमेदवार वर्षा गायकवाड यांना ४ लाख २६ हजार ९१३ मते मिळाली. तर भाजपा उमेदवार ४ लाख १२ हजार ५४६ इतकी मते मिळाली. उज्वल निकम यांच्यापेक्षा वर्षा गायकवाड यांना १४ हजार ३६७ इतक्या मतांची आघाडी मिळवित विजयी झाल्या.

याशिवाय ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर आणि ऐनवेळी शिंदे गटासोबत गेलेले रविंद्र वायकर यांच्यात प्रामुख्याने लढत झाली. या लढतीत अमोल किर्तीकर आणि रविंद्र वायकर यांच्यात आलटून पालटून आघाडी घेत होते. मात्र दोघांपैकी कोणाला अधिक मते मिळतील आणि कोण विजयी होईल हे सांगता येत नव्हते. अखेर शेवटच्या काही फेरीत अमोर किर्तीकर यांना ४ लाख १७ हजार ८६५ मते मिळाली. तर रविंद्र वायकर यांना ४ लाख १३ हजार २८२ मते मिळाली. अमोल किर्तीकर यांनी रविंद्र वायकर यांच्यापेक्षा ४ हजार ५८३ इतकी जास्तीची मते मिळवित विजय मिळवला.

भिवंडीतून भाजपाचे उमेदवार कपिल पाटील यांचा ७० हजार ६३८ मतांनी पराभव करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बाळ्या मामा अर्थात सुरेश म्हात्रे यांनी विजय मिळविला. तर सातारा लोकसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या मुख्य लढत झाली. या निवडणूकीत उदयनराजे भोसले यांना शशिकांत शिंदे यांच्यापेक्षा ३२ हजार ३५ इतकी जास्तीची मते अधिक मिळवित विजय मिळविला.

बारामती मतदारसंघाकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देशभराचे लक्ष लागून राहिलेल्या नणंद सुप्रिया सुळे आणि भावजय सुनेत्रा पवार यांच्यात लढत झाली. या लढतीत सुप्रिया सुळे यांचा विजय झाला. तर रायगड लोकसभा मतदारसंघातून अजित पवार यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी ५ लाख ८ हजार ३६२ मते मिळवित अनंत गीते यांच्या विरोधात ८२ हजार ७८४ इतकी जास्तीची मते मिळवित विजय मिळविला.

याशिवाय ठाणे लोकसभा मतदारसंघ आणि कल्याण लोकसभा मतदारसंघातून शिंदे गटाचे डॉ श्रीकांत शिंदे तर ठाण्यातून नरेश मस्के यांनी शिवसेना उबाठा गटाचे राजन विचारे यांचा पराभव करत विजय मिळविला.

 

Check Also

पैठण, गंगापूर येथे जिल्हा अतिरिक्त न्यायालय हिंगोली स्वतंत्र न्यायिक जिल्हा परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांचे न्यायिक काम परभणीतून

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण व गंगापूर येथे जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालय तसेच हिंगोली स्वतंत्र न्यायिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *