उद्धव ठाकरे यांचा टोला, उद्या मुंबईचे नाव बदलून अदानी स्मार्ट सिटी करतील… लाडक्या मित्राचे टेंडर रद्द करा, नव्याने निविदा काढा

राज्यातील महायुती सरकारने आल्यानंतर त्यांच्या नेत्याला खुश करण्यासाठी धारावीच्या पुनर्विकासाची निविदा त्यांच्या लाडक्या मित्राला देण्यात आले. मात्र त्यांच्या लाडक्या मित्रासाठी सध्या विविध सरकारच्या जमिनी आणि प्रकल्पाच्या जमिनी अधिग्रहीत करून देण्याचा सपाटा ज्या पध्दतीने राज्य सरकारकडून सुरु करण्यात आला आहे. त्यावरून सध्या प्रश्ननिर्माण होत आहे की, धारावीचा पुनर्विकास करायचाय की, मुंबईत अदानी स्मार्ट सिटी निर्माण करायचीय असा सवाल उपस्थित करत यांचे काय उद्या मुंबईचे नाव बदलून अदानी स्मार्ट करतील असा खोचक टोला शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज राज्य सरकारला लगावला.

धारावीच्या पुनर्विकास प्रकल्पासाठी अदानीने आणखी ५९० एकर जमिन देण्यासाठी राज्य सरकारकडून विविध प्रकल्पाच्या जमिनी अधिग्रहीत करण्याचा सपाटा लावण्यात आला आहे. या संदर्भात उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत त्याचा भंडाफोड केला.

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, धारावीची जेव्हा निविदा जाहिर करण्यात आली. त्यावेळी ज्या सवलती त्यावेळी देण्यात आल्या नव्हत्या त्या सवलती निविदा अदानीला दिल्यानंतर देण्यात येत आहेत. विशेष म्हणजे या पुनर्विकास योजनेचा आराखडा अद्याप सादर करण्यात आलेला नाही. तरीही राज्य सरकारकडून धारावीच्या प्रकल्पासाठी जमिनी अधिग्रहीत करून देण्यात येत आहे असा आरोप करत आतापर्यंत धारावीसाठी कुर्ला येथील आरेची जमिन, मानखुर्दची मिठागराची जमिन, कांजूर मार्ग येथील जमिन यापूर्वी मेट्रो डेपोसाठी देत नव्हते, आता मात्र धारावीसाठी देण्याचा घाट घालण्यात येत असल्याचा आरोपही यावेळी केला.

तसेच उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, धारावीचे पुनर्विकास करताना त्यांच्या चमड्याचे उद्योग, इतर व्यापाराचे उद्योग, कुंभार वाड्याचे उद्योग आणि इतर उद्योगाच्या काय असा त्याची व्यवस्था धारावी करांसाठी त्यांच्या राहत्या घरासोबत केली आहे का? असा सवाल करत धारावी करांचे पुर्नवसन आहे त्या जागेवर करण्याची मागणी करत धारावी करांना ५०० चौरस फुटाचे घर मिळालेच पाहिजे अशी मागणीही यावेळी केली.

या मागण्यांसाठी मी आणि माझी शिवसेना धारावीकरांच्या पाठिशी ठामपणे उभे राहु. तसेच पात्र अपात्रतेच्या नावाखाली धारावी रिकामी करण्याचा डाव यांचा असून त्या जागा अदानीच्या घशात घालण्याचा प्रयत्न एकप्रकारे राज्य सरकारचा सुरु असल्याची टीकाही उद्धव ठाकरे यांनी करत काही जणांच्या बुध्दीला बुरशी लागलेली असल्यानेच असे उद्योग करण्यात येत असल्याची टीकाही यावेळी केली.

शेवटी उद्धव ठाकरे म्हणाले की, विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर आता विविध योजनांचे गाजर राज्यातील जनतेला दाखविण्यात येत आहे. मात्र जनता अशा गोष्टींना बुलणार नाही असे सांगत यावेळी महायुतीच्या सरकारला जनता सत्तेवरून खाली उतरविल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही यावेळी दिला.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, नगरपालिका निवडणुकांमध्ये लोकशाहीचे वस्त्रहरण सालेकसामध्ये मतदान संपल्यावर १७ ईव्हीएमचे सील तोडून पुन्हा मतदान पण गुन्हा दाखल नाही

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये बोगस मतदान, दडपशाही व सर्व नियम धाब्यावर बसवून मतदान झाले. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *