Breaking News

विजय वडेट्टीवार यांची मागणी, दाभाडे यांच्या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करा दाभाडे कुटुंबियांची विजय वडेट्टीवार यांनी घेतली भेट

मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरूच आहेत. पिंपळखुंटा या गावातील विठ्ठल दाभाडे या शेतकऱ्याने आत्महत्या केली. शेती गहाण ठेऊन काढलेल्या कर्जाचे बँक पैसे देत नाही. बँक मॅनेजरने कर्जाचे पैसे खात्यात जमा करायला टाळाटाळ केल्यामुळे या शेतकऱ्याने आत्महत्या केली. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाचा हा गंभीर आरोप आहे. या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी करत महायुती सरकारच्या अपयशी कारभारामुळे आत्महत्या सुरु असल्याची टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. त्याचबरोबर दाभाडे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन या कुटुंबियांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे असल्याचा विश्वास त्यांनी दिला.

छत्रपती संभाजीनगर येथील पिंपळखुंटा गावातील विठ्ठल नामदेव दाभाडे वय ५२ वर्ष यांनी शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. एका खाजगी बँकेकडे चार महिन्या पूर्वी शेती तारण ठेवून कर्ज मागणी केली असता बँकेने शेती गहाण ठेवून चार पाच महिने झाले तरी बँकेचे शाखाधिकारी पैसे खात्यावर टाकण्यासाठी टाळाटाळ करत राहिले. त्यामुळे निराश होऊन दाभाडे या शेतकऱ्यांने आत्महत्या केली. विठ्ठल दाभाडे यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहीली असून यामध्ये बँक मॅनेजर पैसे द्यायला टाळाटाळ करत असल्याचे म्हटले आहे. आता मी खचलो..मी माझ्या नशिबावर नाराज आहे. कर्ज मंजूर होऊन तब्बल चार महिने कर्जाची रक्कम खात्यात टाकली नाही, असे या चिट्ठीत म्हटले आहे. बँक मॅनेजर आणि एजंट पैसे मागत असल्याची देखील तक्रार दाभाडे कुटुंबियांनी केली.

यावेळी विजय वडेट्टीवार म्हणाले की, हे प्रकरण गंभीर असून महायुती सरकारचे हे अपयश आहे. सरकारने या कुटुंबाला न्याय दिला पाहिजे, आत्महत्या रोखण्यासाठी उपाययोजना केल्या पाहिजेत, अशी मागणीही यावेळी केला.

https://x.com/VijayWadettiwar/status/1796066357831926238

दाभाडे यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली हीच ती चिठ्ठी

 

https://x.com/VijayWadettiwar/status/1796066357831926238

Check Also

भाजपा सोलापूरातील एका आमदाराला घरी बसविणार वाढत्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये खलबतं सुरु

आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपाकडून पुन्हा सत्तेत येण्याच्या अनुषंगाने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *