विजय वडेट्टीवार यांचा सवाल, गुंडांना संरक्षण देण्यासाठी जनतेने बहुमत दिले का? आजच्या कामकाजावर काँग्रेसचा बहिष्कार

राज्यात महायुती सरकारचे बहुमतात सरकार आले. या सरकार आल्यावर परभणी आणि बीड इथे घडलेल्या घटना या राज्याला काळीमा फासणाऱ्या आहेत. राज्यात गुंडांना संरक्षण देण्यासाठी बहुमत मिळाले का असा सवाल आमदार विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.
हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आज विरोधकांनी पायऱ्यांवर परभणी आणि बीड प्रकरणी आंदोलन केले. त्यानंतर कामकाज सुरू झाल्यावर विरोधकांनी या प्रकरणी स्थगन प्रस्ताव मांडला.

यावेळी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, परभणी मध्ये संविधानाची विटंबना करण्यात आली. या प्रकरणी अटक केलेल्या सोमनाथ सुर्यवंशी यांचा मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवालात सोमनाथ सुर्यवंशी यांच्या शरीरावर जखमा असल्याचे स्पष्ट नमूद आहे. त्यामुळे पोलिसांनी कस्टडी मध्ये असताना सुर्यवंशी यांना बेदम मारहाण केल्याचा आरोप करत या प्रकरणी पोलिसांवर अजूनही कारवाई करण्यात आली नसल्याचा मुद्दा उपस्थित केला.

विजय वडेट्टीवार पुढे बोलताना म्हणाले की, बीड मध्ये देखील एक गुंड सरपंच संतोष देशमुख यांना धमकी देतो, त्यांचा जीव जाईल इतकी मारहाण होते. सरपंचाचे डोळे जाळले गेले, इतके होईपर्यंत पोलीस गुंड विरोधात कारवाई करत नाही. हा गुंड एका मंत्र्यांच्या विश्वासू आहे, त्यामुळे त्यास संरक्षण दिले जाते का असा सवाल उपस्थित करत याप्रकरणी विरोधकांनी आज विधानसभेत स्थगन प्रस्ताव मांडला होता, पण हा प्रस्ताव देखील विधानसभा अध्यक्षांनी फेटाळून लावला.

पुढे बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून विरोधक या प्रश्नांवर चर्चा मागत होते पण हा प्रस्ताव फेटाळून विरोधकांचा आवाज दाबला गेला अशी टीका केली. म्हणूनच आज काँग्रेसने सभात्याग केला आणि आजच्या दिवसभराच्या कामकाजावर बहिष्कार टाकला. महायुती सरकारचा निषेध करत विरोधकांनी प्रश्न उपस्थित केला की यासाठी सरकारला बहुमत तुम्हाला मिळाले आहे का? असा खोचक सवालही यावेळी महायुती सरकारला यावेळी केला.

परभणी आणि बीड प्रकरणी विरोधक घटनास्थळी भेट देणार असल्याचे देखील विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.

About Editor

Check Also

माणगाव, तळा व म्हसळातील आदिवासी लाभार्थ्यांसाठी घरकुलासाठीचा प्रस्ताव सादर करा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे आदेश

माणगाव, तळा व म्हसळा नगरपंचायत हद्दीतील अनुसूचित जमातीच्या पात्र लाभार्थ्यांना आदिवासी घरकुल योजना (शहरी) अंतर्गत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *