सामाजिक

अंनिसच्या श्याम मानव यांनी दिले आव्हान, धीरेंद्र महाराजांनी दिव्यशक्ती सिध्द करावी दिव्यशक्ती सिध्द केल्यास ३० लाखाचे बक्षिस

महाराष्ट्रासह देशभरात सध्या भोंदू बाबांचे प्रस्थ वाढत चालले असून ज्यांना अद्याप नीटस् मिसरूडही फुटले नाही की जीवनाचा अनुभव नाही की अध्यात्मिकता कशाशी खातात याचेही भान नाही अशा व्यक्ती स्वतःला संत, गुरू आणि महाराज ही उपाधी लावून स्वतःला दिव्यशक्ती असल्याचा दावा करत लोकांना मुर्ख बनविण्याचा प्रयत्न करतात. अशा भोंदू लोकांच्या दाव्यातील …

Read More »

बनावट मेसेजना बळी पडू नका; महावितरणचे आवाहन ग्राहकांच्या रक्षणासाठी महावितरणची दक्षता

महावितरणच्या ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी कंपनी एसएमएस किंवा ऑनलाईन बिले भरण्याची सुविधा सुरक्षित असेल याची दक्षता घेत असते. ग्राहकांनी महावितरणची कार्यपद्धती समजून घ्यावी. ग्राहकांनी अनोळखी क्रमांकावरून येणाऱ्या बनावट मेसेजना बळी पडू नये व वीजग्राहकांना लुटणाऱ्या सायबर भामट्यांपासून सावध रहावे, असे आवाहन महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी …

Read More »

अजित पवार म्हणाले, माझी हात जोडून विनंती, २ वरच थांबा उगाच पलटण वाढवू नका देवाची कृपा की कोणाची कृपा आम्हाला माहितच आहे

वाढत्या लोकसंख्येमुळे स्थानिक पातळीवरील पायाभूत सुविधांवर पडणाऱ्या ताणावरून नेहमीच राजकिय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या जातात. मात्र हाच मुद्दा राज्याचे विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी अतिशय मिश्किलपणे उपस्थित करत छोटे कुटुंब सुखी कुटुंबाचा सल्ला दिला. बारामतीत आयोजित एका कार्यक्रमात अजित पवार म्हणाले, ‘माझी महिलांना हात जोडून विनंती …

Read More »

अल्पसंख्याकांच्या उन्नतीसाठी पंतप्रधान १५ कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी करा राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या सदस्या सय्यद शेहजादी

अल्पसंख्याक विकास विभागाअंतर्गत शासन राबवित असलेल्या कल्याणकारी योजनांचा लाभ सर्व अल्पसंख्याक समुदायापर्यंत पोहचणे गरजेचे आहे. अल्पसंख्याक समुदायाच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक उन्नतीसाठी केंद्र शासनाने पंतप्रधान १५ कलमी कार्यक्रम आखला असून, या कार्यक्रमांतर्गत योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी तसेच दर तीन महिन्याने आढावा घेण्यात यावा, अशा सूचना राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या (भारत सरकार) सदस्या …

Read More »

चला! जाणून घेऊ या संरक्षण दलाची सज्जता आणि सक्षमता एकदा अवश्य भेट द्या…डीआरडीओच्या दालनाला

आपले संरक्षण दल व त्याच्या वेगवेगळ्या शाखा अखंडपणे देश संरक्षणासाठी सज्ज असतात. मात्र ही सज्जता, सक्षमता आणि आक्रमकता येते ती विज्ञान आणि तंत्रज्ञानातून. या विज्ञान तंत्रज्ञानाच्या नवनवीन शोधाचे प्रात्यक्षिक दाखवणारे संरक्षण संशोधन आणि विकास संघटना विभागाचे (डीआरडीओ) दालन इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये सर्वांचे लक्ष वेधुन घेत आहे. संरक्षण क्षेत्रातील अत्याधुनिक प्रयोग …

Read More »

रामदास आठवले म्हणाले, विजयस्तंभाच्या स्मारकासाठी १०० एकर जमीन संपादित करा मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेणार

भीमा कोरेगाव येथील ऐतिहासिक विजयस्तंभास अभिवादन करण्यास दरवर्षी १ जानेवारीला शौर्यदिनी देशभरातून लाखो आंबेडकरी अनुयायी भेट देत असतात. त्यामुळे या विजयस्तंभाचे भव्य स्मारक उभारले पाहिजे. त्यासाठी विजयस्तंभ परिसराची १०० एकर जमीन शासनाने संपादित करावी अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली. आज दुपारी १२ वाजता रामदास आठवले …

Read More »

शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात सोलापूरच्या महिलेचा विधिमंडळासमोर आत्महत्येचा प्रयत्न महिलेने अंगावर रॉकेल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला

नागपूरात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असून आज हिवाळी अधिवेशनाचा पाचवा दिवस आहे. हिवाळी अधिवेशनाच्या आधी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्र्यांकडून महापुरूषांचा सातत्याने करण्यात येत असलेल्या अवमानाच्या विरोधात महामोर्चाही काढला. मात्र त्यावर अद्याप शिंदे-फडणवीस सरकारने कोणतीच कारवाई केली नाही. त्याच्या निषेधार्थ विधिमंडळाच्या गेटवर सोलापूरच्या एका महिलेने स्वतःच्या अंगावर रॉकेल …

Read More »

पेपरलेस लाईट बिलाची सुरुवात करा अन वीज बिलात १० रूपये सूट मिळवा गो ग्रीन योजनेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १ एप्रिलपासून ई ऑफीस प्रणाली सुरू करणार असल्याची घोषणा नुकतीच केली असून त्यामध्ये पेपरलेस व्यवहार करण्यावर भर असेल. त्या दिशेने महावितरणने बिलांच्या बाबतीत यापूर्वीच काम सुरू केले असून गो ग्रीन योजनेचा लाभ घेऊन वीज ग्राहकांनी पर्यावरण वाचविण्यास मदत करावी आणि प्रत्येक बिलात दहा रुपये सवलत मिळवावी, असे …

Read More »

एनसीआरबीच्या २०२१ च्या अहवालानुसार दररोज दलित अत्याचाराच्या १५३ घटना डॉ.आंबेडकर सेंट्र फॉर जस्टीस अँड पीसकडून एनसीआरबीच्या अहवाला आधारे आरोप

भारताने अनु.जाती – जमाती  विरोधात  होणाऱ्या अमानवीय अन्याय अत्याचार थांबविण्यासाठी त्वरित पावले उचलावी- संयुक्त मानवाधिकार आयुक्त यांना निवेदन सादर संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेने २००८ मध्ये युनिव्हर्सल पिरीयोडिक रिव्ह्यू (UPR) यंत्रणा सुरू केल्यापासून, भारताच्या मानवी हक्कांच्या स्थितीवर संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेने लक्ष केंद्रित केले आहे. संयुक्त राष्ट्र संघ मानवाधिकार परिषदेचे यू.पी.आर.(युनिव्हर्सल …

Read More »

लवकरच ३ हजार ११० तलाठी भरती ५१८ मंडळ अधिकारी पदोन्नती प्रक्रिया लवकरच सुरु होणार

गेल्या काही वर्षांपासून राज्यात तलाठी पदाच्या अनेक जागा रिक्त होत्या. एकाच तलाठयाकडे अनेक गावे सोपविण्यात आल्याने कामांना विलंब व्हायचा आणि महसूल यंत्रणेवर ताण येत होता. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी तलाठी भरती आणि मंडळ अधिकारी पदोन्नती प्रक्रियेला गती मिळावी यासाठी पुढाकार घेतला होता. येत्या काही दिवसांमध्ये तलाठी भरती आणि …

Read More »