अनामप्रेमच्या दोन दिव्यांग कन्यांना मिळाले जीवानाचे साथीदार वधू-वर मेळाव्यात ४०० जणांनी नोंदविला सहभाग

अहमदनगर : प्रतिनिधी

समाजात पालक असूनही अनेक सदृढ व्यक्तींचे विवाह होत नाहीत. मात्र समाजात आणि जगात ज्यांचे कोणी नाहीत अशासाठी स्नेहाच्या अर्थात प्रेम आणि मैत्रीच्या भावनेतून अनामप्रेमाच्या मायेतून त्यांचा सांभाळ करणे आणि त्यांना मनुष्य म्हणून जगायला समर्थपणे उभे करणाऱ्या स्नेहालयच्या अनामप्रेमच्या दोन दिव्यांग कन्यांचा विवाह काल रविवारी २९/०४/२०१८ रोजी पार पडला. आदल्या दिवशी अनामप्रेमच्या राज्यस्तरीय दिव्यांग वधू-वर मेळाव्यास ४०० दिव्यांगानी सहभाग नोंदवला होता.

यामध्ये सातारा येथील एका अंध प्रवर्गातील दिव्यांगांचा विवाह जुळून आला. कु.राणी वाघमारे आणि चि.निलेश शिंदे यांचा विवाह जुळून आला. तसेच स्नेहाधार प्रकल्पाची आणि अनामप्रेमची विद्यार्थीनी मुकबधीर प्रवर्गातील कु.धनश्री आणि श्रीरामपूर येथील चि.धर्मराज गिरमे हिच्याशी विवाह झाला.

निंबळक येथील सत्यमेव जयते ग्राम येथील प्रकल्पात हा दिव्यांगांचा विवाह समारंभ पार पाडला. दिव्याग दोन्ही कन्या या अनामप्रेमच्या प्रकल्पातील लाभार्थी असल्याने सर्व विद्यार्थी-कार्यकर्ते यांनी हा कौटुंबिक विवाह समारंभ रविनंदा संकुलात अत्यंत उत्साहाने पार पाडला. या दिव्यांग वधुंचे कन्यादान व धार्मिक विधी आधुनिक विचारानुसार भारती सोनावणे,  मीना भिंगारदिवे, आड.लता वाघ यांनी केले.

या विवाह समारंभास उद्योजक मिलिंद एकनाथ कुलकर्णी, संजय बंदिष्टी ,अँड श्याम असावा,शरद कोलते, नंदेश शिंदे, अनिल गावडे, गोविंद लासुरे, अँड.अविनाश बुधवंत, प्रियदर्शनी रोटरी क्लबच्या प्रतीभा धूत, डॉ.प्राची पाटील, नीना मोरे, युनियन बँकेच्या अंजली यावलकर, रविनंदा संकुलाचे सहयोग दाते डॉ.रविंद्र सोमाणी, सुनंदा सोमाणी, स्नेहाधारच्या शिल्पा केदारी उपस्थित होते.

दोन्ही दिव्यांग कन्येची सासरी पाठवणी करताना सर्व कार्यकर्त्यांच्या अश्रूंच्या कडा पाणावल्या. या दोघींनी केलेला आयुष्यातील संघर्ष आणि आव्हाने हि डोळ्यासमोरून सर्वांच्या तरळल्याने अश्रूंची झाली फुले असाच सर्व अनामप्रेमी यांनी अनुभूती घेतली.

या विवाह समारंभाच्या यशस्वीतेसाठी अनामप्रेमचे अजित कुलकर्णी, अजित माने, नाना भोरे, सुभाष शिंदे, किशोर कुलकर्णी, रामेश्वर फटांगडे, निलेश शिंदे, प्रदीप कुंभार, उमेश पांडूरे, विष्णू वारकरी, अनिता दास स्वाती वाणी, उद्धव तांदळे, शुभांगी खोसे, मिनिनाथ जाधव यांनी अथक परिश्रम घेतले.

About Editor

Check Also

कर्मयोगी संत गाडगेबाबा आणि समाजप्रबोधन संत गाडगेबाबा यांच्या जयंती दिनानिमित्त खास लेख

महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सुधारणावादी परंपरेत १९०५ ते १९५६ असे सतत पाच दशके ज्यांनी समाज सुधारणा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *