विरोधी पक्ष अपयशी ठरल्यामुळे आणि त्यांनी हिंदू मतांना एकत्रित केल्यामुळे भाजपा सातत्याने निवडणुका जिंकत आहे, असे हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी सांगत मोदीविरोधी मतांमध्ये कपात करण्याच्या सूचनांना नकार दिल्याचा दावाही यावेळी केला.
एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत एमआयएमआयचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी सांगितले.
पुढे बोलताना असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, तुम्ही माझ्यावर दोष कसा टाकू शकता, मला सांगा? जर मी २०२४ च्या संसदीय निवडणुकीत हैदराबाद, औरंगाबाद, किशनगंज आणि इतर काही जागांवर निवडणूक लढवली आणि भाजपाला २४० जागा मिळाल्या तर मी जबाबदार आहे का? असा सवालही यावेळी केला.
असदुद्दीन ओवैसी पुढे बोलताना म्हणाले की, विरोधी पक्ष अपयशी ठरल्याने भाजपा सत्तेत येत आहे. भाजपा निवडणुका जिंकत आहे, कारण त्यांनी जवळजवळ ५०% हिंदू मतं एकत्रित केली आहेत, असे सांगत इतर पक्षांना भाजपाची बी-टीम म्हणणे हे विरोधकांचा त्यांच्या पक्षाबद्दलचा “द्वेष” आहे, कारण ते मोठ्या प्रमाणात मुस्लिमांचे प्रतिनिधित्व करते. जेव्हा समाजातील प्रत्येक घटकात राजकीय नेतृत्वाचे स्वरूप असते आणि ते तुम्हाला मान्य आहे. परंतु मुस्लिमांमध्ये राजकीय आवाजाचे, राजकीय नेतृत्वाचे स्वरूप असावे असे तुम्हाला वाटत नाही, असेही यावेळी सांगितले.
याबाबत असदुद्दीन ओवैसी यांना विचारले की, ते काँग्रेसचा संदर्भ देत आहेत का असे विचारले असता, असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, ते बसपा, सपा आणि भाजपासह सर्व विरोधी पक्षांचा संदर्भ देत आहे. यादव एक नेता असेल, मुसलमान एक भिकारी असेल. उच्च जातीचा नेता असेल, मुसलमान एक भिकारी असेल. ते कसे योग्य आहे ते मला सांगा, असेही यावेळी सांगितले.
असदुद्दीन ओवैसी पुढे बोलताना म्हणाले की, सध्याच्या राजकिय परिस्थितीबद्दल दुःख व्यक्त करताना म्हणाले की, भारताच्या संस्थापकांनी देशात सहभागी लोकशाही म्हणून कल्पना केली होती, मग मुस्लिमांचा सहभाग कुठे आहे? असा सवाल करत जेव्हा भारताच्या अखंडतेचा आणि सुरक्षेचा प्रश्न येतो, तेव्हा आपण पुढे येऊन भारतीय लष्कराच्या पाठीशी उभे राहू. पण आपल्याला आपल्या घरातील समस्यांबद्दल बोलायला हवे, नाही का? असे निदर्शनास आणून दिले की, देशातील सर्वात मोठा अल्पसंख्याक गट असूनही, मुस्लिमांचा संसदेत आणि कायदेमंडळात फक्त ४% सहभाग असल्याचेही यावेळी सांगितले.
असे का आहे असे विचारले असता, असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, राजकीय पक्ष मुस्लिमांना निवडणूक लढवण्यासाठी तिकिटे देत नाहीत आणि लोक मुस्लिमांना मतदान करत नाहीत.
पुढे बोलताना असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, इतक्या मोठ्या समुदायाला दुर्लक्षित आणि कमकुवत ठेवून भारत २०४७ पर्यंत “विकसित भारत” चे ध्येय साध्य करू शकत नाही. राजकीय पक्षांनी मुस्लिमांना मतपेढी म्हणून पाहणे थांबवावे आणि त्याऐवजी त्यांचे उत्थान, त्यांना शिक्षित करणे, त्यांच्याशी न्याय्य वागणूक देणे आणि त्यांना नोकऱ्या देणे यासाठी काम करावे, असे ते म्हणाले.
असदुद्दीन ओवैसी पुढे बोलताना म्हणाले की, आमची लढाई अशी आहे की आम्हाला मतदार राहायचे नाही. आम्हाला नागरिक म्हणूल राहायचे आहे.
Marathi e-Batmya