परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री म्हणाले, पाकिस्तानने वापरलेला ड्रोन तुर्की प्रमाणे कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कंमाडर व्योमिका सिंग यांची माहिती

सरकारने शुक्रवारी म्हटले की ८ मे रोजी भारतीय शहरांवर झालेल्या हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराने तुर्की ड्रोनचा वापर केला असावा अशी शक्यता परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच केंद्र सरकारने म्हटले की, पाडलेल्या ड्रोनमधून सापडलेल्या ढिगाऱ्यांच्या प्राथमिक फॉरेन्सिक विश्लेषणावरून असे दिसून येते की ते तुर्की-निर्मित “असिसगार्ड सोंगर” मॉडेल होते, जे सामान्यतः देखरेख आणि अचूक हल्ल्यांसाठी वापरले जात असल्याचेही यावेळी सांगितले.

यावेळी विंग कमांडर व्योमिका सिंग म्हणाल्या, ८-९ मे २०२५ च्या मध्यंतरी रात्री, पाकिस्तानी लष्कराने लष्करी पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्याच्या उद्देशाने संपूर्ण पश्चिम सीमेवर भारतीय हवाई हद्दीचे अनेक उल्लंघन केले असल्याचे सांगितले.

विंग कमांडर व्योमिका सिंग म्हणाल्या की, पाकिस्तानी लष्कराने नियंत्रण रेषेवर जड कॅलिबर शस्त्रांचा वापर देखील केला. मोठ्या प्रमाणात हवाई घुसखोरी देखील झाली. आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेवर, लेह ते सर क्रीक पर्यंत छत्तीस ठिकाणी अंदाजे तीनशे ते चारशे ड्रोन आणि नॉन-गतिज साधनांसह ड्रोन घुसखोरीचा प्रयत्न करण्यात आल्याचेही यावेळी सांगितले.

परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री म्हणाले की, या मोठ्या प्रमाणात हवाई घुसखोरीचा संभाव्य उद्देश (हवाई संरक्षण) एडी प्रणालींची चाचणी करणे आणि गुप्त माहिती गोळा करणे हा होता. रात्री उशिरा परिस्थिती आणखी बिकट झाली जेव्हा पाकिस्तानच्या एका सशस्त्र यूएव्हीने भटिंडा लष्करी तळाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला जो शोधून निष्क्रिय करण्यात आल्याचेही यावेळी सांगितले.

भारतानेही पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून, पाकिस्तानमधील चार हवाई संरक्षण स्थळांवर सशस्त्र ड्रोन सोडण्यात आले. त्यापैकी एक ड्रोन एडी रडार नष्ट करण्यात यशस्वी झाला, असल्याचे यावेळी सांगितले.

केंद्र सरकारने अधोरेखित केले की, सीमापार आक्रमकता ड्रोनपुरती मर्यादित नव्हती. पाकिस्तानने जम्मू आणि काश्मीर क्षेत्रातील सुंदर, उरी, पूंछ, मेंढर, राजौरी, अखनूर आणि उधमपूर येथे हेव्ही कॅलिबर तोफखाना तोफा आणि सशस्त्र ड्रोन वापरून नियंत्रण रेषेवर तोफगोळ्यांचा मारा केला, ज्यामुळे भारतीय लष्कराच्या जवानांना काही नुकसान आणि दुखापत झाली.

भारतीय प्रत्युत्तरात पाकिस्तानी सैन्याचेही मोठे नुकसान झाले, असे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री, कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

About Editor

Check Also

पंतप्रधान मोदी यांची माहिती, अर्थसंकल्प हा तयारी आणि प्रेरणेतून तयार केलेला एका लेखी मुलाखती दरम्यान व्यक्त केली भावना

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ हा “आता किंवा कधीच नाही” हा जबरदस्तीतून निर्माण झालेला क्षण नव्हता तर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *