ऑपरेशन सिंदूरला काँग्रेससह सर्वपक्षियांचा पाठिंबाः पंतप्रधान मात्र गैरहजर केंद्र सरकारच्या बोलाविलेल्या सर्वपक्षिय बैठकीत दिली ऑपरेशन सिंदूरची माहिती

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबविले. तसेच या ऑपरेशन सिंदूरची माहिती सर्वपक्षीय बैठकीत केंद्र सरकारने सर्वपक्षिय नेत्यांच्या बैठकीत दिली. केंद्र सरकारकडून राबविण्यात येत असलेल्या ऑपरेशन सिंदूर बाबत विरोधकांनी सरकार आणि सशस्त्र दलांना पाठिंबा दर्शविला. काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जगाला चांगला संदेश देण्यासाठी संसदेचे अधिवेशन बोलावण्याची मागणी केल्याचे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आज झालेल्या सर्वपक्षिय बैठकीनंतर सांगितले.

बैठकीला उपस्थित राहिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना मल्लिकार्जून खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित न राहिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे म्हणाले की, पंतप्रधानांनी सहभागी व्हावे आणि दहशतवादाविरुद्धच्या कारवाईबद्दल थोडक्यात बोलावे अशी आमची इच्छा होती. शौर्य दाखवणाऱ्या जवानांना आम्ही सलाम करतो. पंतप्रधानांनी येऊन आम्हाला माहिती द्यावी अशी आमची इच्छा होती. पण ते आले नाहीत. ते मागे झालेल्या बैठकीलाही उपस्थित राहिले नव्हते, असे सांगत नाराजी व्यक्त केली.

यावेळी पुढे बोलताना मल्लिकार्जून खर्गे म्हणाले की, तुम्ही पुढे जा आणि आम्ही तुमच्या निर्णयात तुमच्यासोबत आहोत आणि सैन्यासोबत उभे आहोत असेही यावेळी सांगितले.

पंतप्रधानांनी सांगितले आहे की, त्यांनी लष्कराला कोणतीही कारवाई करण्याचा पूर्ण अधिकार दिला आहे, असे मल्लिकार्जून खर्गे म्हणाले.

यावेळी बोलताना संरक्षणमंत्री (राजनाथ सिंह) म्हणाले की, हा एक संवेदनशील काळ आहे आणि देशाच्या हितासाठी, संरक्षण गुपिते असलेले तपशीलवार प्रश्न विचारले जाऊ नयेत, असे ते म्हणाले.

सर्वपक्षिय बैठकीला उपस्थित असलेल्यांनी सीमावर्ती भागात राहणाऱ्या लोकांच्या सुरक्षेचा मुद्दाही उपस्थित केल्याचे सांगत जम्मू आणि काश्मीरात गोळीबारात ज्यांनी आपले प्राण गमावले आहेत त्यांची काळजी घेतली पाहिजे, असेही मल्लिकार्जून खर्गे यांनी सांगितले.

मल्लिकार्जून खर्गे पुढे बोलताना म्हणाले की, सरकारने आम्हाला सर्व प्रकारची पावले उचलण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच राहुल गांधी यांनी संसदेचे अधिवेशन बोलावण्याची मागणी केली, जेणेकरून बाहेर चांगला संदेश जाईल, जर अधिवेशन बोलावले तर खासदार त्यांचे विचार मांडू शकतात आणि लोकांचा विश्वास वाढवू शकतात. पण सरकारने याबाबत कोणतेही आश्वासन दिले नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

२२ एप्रिल रोजी पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, गेल्या पंधरा दिवसांत दुसऱ्यांदा सरकारी अधिकारी आणि विरोधी पक्ष नेते भेटले तेव्हा सरकारने गुरुवारी सर्वपक्षीय बैठकीत ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल आणि त्यानंतरच्या परिस्थितीबद्दल माहिती दिली.

केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, अमित शाह, एस जयशंकर, जे. पी. नड्डा आणि निर्मला सीतारमण यांनी सरकारचे प्रतिनिधित्व केले, तर काँग्रेसकडून राहुल गांधी आणि मल्लिकार्जून खर्गे, तृणमूल काँग्रेसचे संदीप बंदोपाध्याय आणि द्रमुकचे टी. आर. बालू हे प्रमुख विरोधी पक्षनेते होते. तसेच पक्षाचे नेतेही या बैठकीला उपस्थित होते.

About Editor

Check Also

मेहबूबा मुफ्ती यांचा इशारा, गांधी, नेहरूचा हिंदूस्तान लिंचिस्तान बनत चाललाय बांग्लादेशातील हिंदूची हत्या झाल्यानंतर केली केंद्रावर टीका

बांग्लादेशातील हिंदू समुदायांवर स्थानिकांकडून हल्ले करण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर एका हिंदू तरूणाची हत्या झाल्यानंतर जम्मू …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *