विशेष बातमी

सर्वोच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना जामीन नाकारला सीबीआयला बजावली न्यायालयाची नोटीस

कथित दिल्ली अबकारी धोरण घोटाळ्याच्या संबंधात केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) ने नोंदवलेल्या भ्रष्टाचार प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी नकार दिला. अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती उज्वल भुयान यांच्या खंडपीठाने सीबीआयला नोटीस बजावली असून या प्रकरणात जामीन मागितला आहे आणि आणखी …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांची माहिती, राज्यात पानमांजर, गिधाड, रानम्हैससाठी प्रजनन केंद्र दुर्मिळ वनस्पतींच्या जतन आणि संवर्धनावर भर

राज्यात दुर्मिळ होत असलेल्या वनस्पतींच्या जतन आणि संवर्धनावर भर देण्याचे निर्देश देत पानमांजर (ऑटर), गिधाड, रानम्हैस यांच्या प्रजनन केंद्रासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य वन्य जीव मंडळाच्या बैठकीत आज मान्यता दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेला ‘एक पेड माँ के नाम’ हा उपक्रम राज्यात सर्व महापालिका, नगरपालिका, शाळा, महाविद्यालयामध्ये …

Read More »

राष्ट्रपतींचा ‘कॉलर ऑफ दि ऑर्डर’ पुरस्काराने गौरव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका ट्विटच्या माध्यमातून अभिमान

तिमोर लेस्ते या राष्ट्राचा सर्वोच्च नागरी पुरस्कार समजल्या जाणाऱ्या ‘कॉलर ऑफ दि ऑर्डर’ पुरस्काराने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना गौरवण्यात आल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका ट्विटच्या माध्यमातून अभिमान व्यक्त केला आहे. या प्रतिष्ठेच्या सन्मानाने भारत आणि तिमोर लेस्ते या देशांमधील खोलवर रुजलेले बंध आणि परस्परांप्रती असलेला आदर अधोरेखित होत असल्याचं …

Read More »

पाणबुडी आयएनएस अरिघाट नौदलासाठी सज्ज भारतात बांधलेली ही दुसरी अरिहंत श्रेणीची पाणबुडी

हिंद महासागर क्षेत्रात भारताची ताकद वाढविण्यासाठी केंद्र सरकारने जोरदार कंबर कसली आहे, त्यामुळे चीनच्या वेगवान हालचालीवर लक्ष ठेवत अचूक उत्तर देण्यासाठी भारताने वेगवान पद्धतीने प्रगतीचा जणू काही आलेखच तयार केल्याचे चित्र स्पष्ट होत आहेत, याचाच प्रत्यय हिंद महासागरात अणु क्षेपणास्त्रांनी सज्ज असलेली पाणबुडी आयएनएस अरिघाट भारतीय नौदलात सामील होण्यासाठी सज्ज …

Read More »

जांभेकर महिला विद्यालयाच्या शतक महोत्सवाचे राष्ट्रपतींना निमंत्रण महाराष्ट्रातील एक अग्रगण्य शैक्षणिक संस्था रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी

रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी ही महाराष्ट्रातील एक अग्रगण्य शैक्षणिक संस्था असून शहरी व ग्रामीण भागातील सुमारे १५००० विद्यार्थी-विद्यार्थिनी संस्थेमध्ये विविध प्रकारचे शिक्षण घेत आहेत. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे गोदूताई जांभेकर विद्यालय यावर्षी शतक महोत्सवी वर्ष साजरे करण्यात असल्याने या कार्यक्रमांच्या प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रण देण्यात आले. हा शतक …

Read More »

उदार शक्ती सरावानंतर भारतीय हवाईदलाची तुकडी मायदेशी संयुक्त सराव सत्रात भारतीय हवाई दलाने Su-30MKI लढाऊ विमानांसह सहभाग

मलेशियात उदार शक्ती 2024 या सरावात यशस्वी सहभाग नोंदवून भारतीय हवाई दलाची तुकडी 10 ऑगस्ट 2024 रोजी भारतात परतली. रॉयल मलेशियन हवाई दलाबरोबरचा हा संयुक्त हवाई सराव पाच ते नऊ ऑगस्ट 2024 या कालावधीत मलेशियातील कुआंतान इथे पार पडला. या संयुक्त सराव सत्रात भारतीय हवाई दलाने Su-30MKI लढाऊ विमानांसह भाग …

Read More »

आफ्रिकेतील उहुरु शिखरावर फडकवला, भारताचा राष्ट्रीय ध्वज चिकाटी आणि सहकार्य यातून हे ध्वजारोहन साध्य

देशाच्या 78 व्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीतील हिमालयीन गिर्यारोहण संस्थेच्या दिव्यांगजन मोहिम चमूने आफ्रिकेतील सर्वात उंच शिखर असलेल्या किलिमंजारो पर्वतावरील उहुरु शिखरावर 7800 चौरस फूटाचा भारतीय राष्ट्रीय ध्वज फडकवला. या चमूने त्यांचा प्रवास बेस कॅम्प पासून सुरू केला आणि 15500 फुट उंचीवरील कीबु हट इथे 7 ऑगस्टला पोहोचले. …

Read More »

कायद्यात बदल, मुलींच्या लग्नाचे वय नऊ वर्षे …! मानवाधिकार व स्त्री हक्क संघटनांचा विरोध

इराकच्या न्याय मंत्रालयाने कायद्यात सुधारणा करण्याच्या नावाखाली मुलींचे लग्नाचे वय १८ वरून ९ वर्षे करणारा नवीन कायदा आणण्याची तयारी सुरू केल्याने मानवाधिकार व स्त्री हक्क संघटनांचा विरोध केला आहे. मंत्रालयाने हे विधेयक संसदेत सादर केले असून त्यातील तरतुदींमुळे ते वादग्रस्त ठरले आहे. तसेच यामुळे देशात पुन्हा बालविवाहाचे प्रमाण वाढण्याची भीती …

Read More »

पंतप्रधानांकडून प्रोफाईलला तिरंगा लावण्याचे आवाहन हर घर तिरंगा चळवळ संस्मरणीय बनवण्याचे आवाहन

नागरिकांनी समाज माध्यम मंचावर आपल्या प्रोफाईल छायाचित्रामध्ये बदल करून त्या जागी तिरंगा असलेले छायाचित्र लावण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी मोदी यांनी त्यांचे प्रोफाईल छायाचित्र बदलून त्या जागी तिरंगा असलेले प्रोफाईल छायाचित्र ठेवले आहे. त्यांनी सर्वांनाच असे करून हर घर तिरंगा चळवळ एक संस्मरणीय …

Read More »

एचआयव्ही एड्स जनजागृतीसाठी रविवारी ‘रेड रन मॅरेथॉन’ स्पर्धा तरूणाईसोबतच नागरिकांनाही स्पर्धेत सहभागी होता येणार

ह्युमन इम्युनो डेफिसिएन्सी व्हायरस (एचआयव्ही) / एड्स बाबतची जनजागृती बृहन्मुंबई महानगरपालिका संचालित मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्थेमार्फत करण्यात येते. राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटनेच्या (नॅको) मार्गदर्शक नियमावलीनुसार मुंबईमध्ये एचआयव्ही एड्सच्या नियंत्रणासाठी ही संस्था कार्यरत आहे. या संस्थेमार्फत मुंबईत रविवार दिनांक ११ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ७ ते ११ या वेळेत ‘रेड …

Read More »