विशेष बातमी

पंगू लंघयते गिरी आदिवासी महिलांची गती ठरलीय सुग्रती

अमरावती: प्रतिनिधी पंगू लंघयते गिरी, हा वाक्प्रचार आपल्यापैकी बहुतेकांना माहित असेल. पंगू म्हणजे पांगळी व्यक्ती, म्हणजेच दिव्यांग व्यक्ती पर्वत कसा चढणार हा प्रश्न सर्वसामान्यपणे कुणालाही पडेल. मात्र प्रयत्न, जिद्द आणि चिकाटी अंगी असेल तर दिव्यांग व्यक्ती आकाशाला गवसणी घालू शकते. याचे जिवंत उदाहरण आहे अमरावती जिल्ह्यातील सुग्रती या तरुणीची.. चिखलदरा …

Read More »

वाघाच्या हल्ल्यात मृत वनरक्षक ढुमणे यांच्या कुटुंबाला मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली मदत १५ लाखांची मदत पतीला नोकरी-मुख्यमंत्र्यांकडून ढुमणे कुटुंबीयांचे सांत्वन

मुंबई: प्रतिनिधी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात कर्तव्यावर असताना वनसंरक्षक  वाघाच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या वनरक्षक स्वाती ढुमणे यांच्या कुटुंबियांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांत्वन केले. मृत श्रीमती ढुमणे यांच्याप्रति संवेदना व्यक्त करतानाच, त्यांच्या कुटुंबियांना १५ लाख रुपयांची मदत देण्याचे तसेच त्यांच्या पतीला वन विभागाच्या सेवेत घेण्यात येईल, असेही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज जाहीर केले. ताडोबा-अंधारी प्रकल्पातील …

Read More »

गुरू(शरद पवार)चा इशारा शिष्या (नरेंद्र मोदी)ने गांभीर्याने घेतला का? किंमत चुकवावी लागेल या भीतीपोटीच कायदे माघारी घेतल्याचा पवारांचा टोला

चंद्रपूर-मुंबई: प्रतिनिधी सध्या विदर्भ दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काल भाजपाला चांगलाच अल्टीमेटम देत चुकांची किंमत चुकवावी लागेल आणि हिशोब द्यावा लागेल असा स्पष्ट इशारा देत भाजपामुक्त भारत निर्माण करण्यासाठी सर्व प्रयत्न करणार असल्याचेही जाहीर केले. त्यानंतर भाजपाच्यादृष्टीने राष्ट्रीय राजकारणात अडचणींचा कृषी कायदे आणि शेतकऱ्यांचे आंदोलन यावर …

Read More »

वर्षभरात शेतकरी आंदोलन आणि त्यांच्यासोबत काय घडले ? जाणून घ्या पार्श्वभूमी २० व्या आणि २१ व्या शतकातील शेतकऱ्यांचे सर्वाधिक काळ चालले आंदोलन- १ वर्ष २ महिने

नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी साधारणत: २३ सप्टेंबर २०२० मध्ये संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु असताना कंत्राटी शेतीच्या अनुषंगाने आणि पहिल्यांदाच शेती व्यवसायात थेट कार्पोरेट क्षेत्राला प्रवेश देण्यारे तीन कायदे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत संसदेत मंजूर करण्यात आले. विशेष म्हणजे त्यावेळी या विधेयकामुळे शेतकऱ्यांना चांगला भाव मिळण्याचे आमिष दाखविण्यात आले. परंतु यात …

Read More »

महाराष्ट्रातील बीजमाता राहीबाई पोपेरे यांच्यासह ६ जण पद्म पुरस्काराने सन्मानित उद्योजक आनंद महिंद्रा यांना पद्म भुषण, एकता कपूर, करण जोहर, पोपटराव पवार यांचाही सन्मान

नवी दिल्ली : प्रतिनिधी सर्वोच्च नागरी पद्म पुरस्कारांचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रपती भवन येथे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील ६ मान्यवरांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये उद्योजक आनंद महिंद्रा यांना पद्म भुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पद्म पुरस्कार वितरण सोहळयास उपराष्ट्रपती एम. वैंकय्या नायडु, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित …

Read More »

पुणे-अहमदनगर-नाशिककरांसाठी खुषखबर: लवकरच बुलेट ट्रेन महारेलच्या माध्यमातून होणार प्रकल्प पूर्ण

मुंबई: विशेष प्रतिनिधी मराठावाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात नागपूर ते मुंबई दरम्यान बुलेट ट्रेन सुरु करण्याबाबतची घोषणा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केल्यानंतर आता पुणे-अहमदनगर-नाशिक दरम्यान आणखी एक बुलेट ट्रेन सुरु करण्यासंदर्भातील हालचाली युध्दपातळीवर सुरु असल्याची विश्वसनीय माहिती नुकतीच हाती आली आहे. मुंबई ते अहमदाबाद दरम्यान बुलेट ट्रेन सुरु करण्याचा पंतप्रधान …

Read More »

“लक्ष्मी” सहाय्याने बदली करून घेतलेले म्हाडाचे ४० अधिकारी ईडीच्या रडारवर ? घाबरलेले अधिकारी म्हणतात फोनवर काही बोलू नका

मुंबई : विशेष प्रतिनिधी मागील अनेक महिन्यांपासून लॉकडाऊन आणि त्यानंतरच्या काळात अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपली मोक्याच्या जागी वर्णी लागावी यासाठी लक्ष्मी नामकच्या सहाय्याने इच्छितस्थळी जागा पटकाविल्याची चर्चा म्हाडा परिसरात सुरु असून त्या आधारे म्हाडाचे तब्बल ४० अधिकारी ईडीच्या रडारवर असल्याची माहिती पुढे येत आहे. मंध्यतरीच्या काळात अनेक अधिकाऱ्यांनी आपल्या स्पेशल …

Read More »

पेगॅसिस प्रकरणी निकाल देताना न्यायालय म्हणाले, “Big brother watching you” तीन सदस्यीय समिती करणार हेरगिरी प्रकरणाची चौकशी

नवी दिल्ली-वृत्तसंस्था: प्रतिनिधी देशातील पत्रकार, राजकिय व्यक्ती आणि काही सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींची पॅगेसिस सॉफ्टवेअरचा वापर करत फोनच्या माध्यमातून हेरगिरी केल्याप्रकरणावरील याचिकेवर निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने प्रसिध्द इंग्रजी साहित्यिक जॉर्ज ऑर्वेल यांच्या १८९४ या पुस्तकातील ‌“Big Brother watching  you” या वाक्याचा संदर्भ देत कोणत्याही व्यक्तीवर अशा प्रकारची हेरगिरी करण्यास परवानगी …

Read More »

क्रांती रेडकरांचे की वानखेडेंच्या वडिलांचे म्हणणे खरे ? समीर वानखेडेच्या जातप्रमाणपत्रावर ज्ञानदेव वानखेडेंची परस्पर विधाने

मुंबई: प्रतिनिधी एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी नोकरी मिळवताना मागासवर्गीय असल्याचे खोटे प्रमाणपत्र सादर केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केल्यानंतर समीर वानखेडे यांच्या जातीबद्दल पत्नी क्रांती रेडकर आणि वानखेडेचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी परस्पर विरोधी विधाने केल्याने यातील नेमकी कोणाचे म्हणणे खरे असा …

Read More »

मविआ सरकारचा मोठा निर्णय: महानगरपालिका- नगरपरिषदांमधील नगरसेवकांची संख्या वाढवली महानगरपालिकांमध्ये १७५ तर नगरपरिषदांमधील नगरसेवकांच्या संख्येत १७ टक्के वाढ

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील झपाट्याने वाढलेली लोकसंख्या तसेच नागरी विकास योजनांचा वेग वाढविण्याची गरज लक्षात घेऊन महानगरपालिका व नगरपरिषदांमधील निर्वाचित सदस्यांच्या संख्येमध्ये वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. सध्या महानगरपालिकांतील सदस्य संख्या किमान ६५ सदस्य व कमाल १७५ इतकी आहे. तर …

Read More »