विशेष बातमी

महाराष्ट्रातील राजकिय नेत्यांसाठी दिल्ली असुरक्षित बनतेय ? बैठकीनंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे थेट मुंबईकडे रवाना

नवी दिल्ली-मुंबई: विशेष प्रतिनिधी स्वातंत्र्यपूर्व काळापासून दिल्ली राजकिय घडामोडींचे प्रमुख केंद्र राहिलेलं आहे. मात्र या दिल्लीत राजकिय अस्थिरता नेहमीच अनेक राजकिय पक्षांनी अनुभवली असली तरी मागील काही वर्षांपासून देशातील राजकिय नेत्यांनाच आता दिल्ली असुरक्षित वाटू लागल्याची चर्चा अनेक महिन्यांपासून राजकिय वर्तुळात सातत्याने सुरु आहे. विशेषत: महाराष्ट्रातील भाजपेतर पक्षाच्या नेत्यांकडून दिल्लीत …

Read More »

बदली तर झाली पण महिना झाला तरी अधिकाऱ्यांना मंत्रालयात पोस्टींग मिळेना पोस्टींग मिळेना म्हणून अधिकारी जून्याच विभागात कार्यरत

मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्याचे मुख्यालय असलेल्या मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर पदोन्नतीमुळे  आणि कालावधी पूर्ण झाल्याने बदल्या करण्यात आल्या. विशेष म्हणजे या बदल्या करताना सामान्य प्रशासन विभागाने पर्यायी अधिकाऱ्याची वाट न पाहता बदली झालेल्यांना तात्काळ कार्यमुक्त करावे असे सक्त आदेश बजावत बदली झालेल्या ठिकाणी तात्काळ रूजू करावे असे स्पष्ट निर्देश दिलेले …

Read More »

नगरविकास मंत्र्यांना म्हणे फाईली वेगळ्या करायला वेळच मिळेना सातारा प्रादेशिक कर्न्झव्हेशनचे धोरण फाईलीवर ८ महिने झाले तरी लाल फितीतच

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील महानगर पालिका आणि जिल्ह्यांच्या अनुषंगाने महत्वाचे खाते असलेल्या नगर विकास विभागाकडे सातत्याने विकासात्मक धोरणाला मंजूरी मिळावी यासाठी अनेक फाईली येत असतात. मात्र या विभागाचे मंत्री असलेले आणि शिवसेनेचे वजनदार म्हणून ओळखले जाणारे मंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्याच फाईली हातावेगळ्या करण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नसल्याची धक्कादायक माहिती …

Read More »

केंद्राचे न्यायालयात अजब तर्कट, “ओबीसींचा डेटा देण्याची कायदेशीर तरतूद नाही” महाविकास आघाडी सरकारच्या याचिकेवर केंद्राचे प्रतिज्ञा पत्र

नवी दिल्लीः प्रतिनिधी महाराष्ट्रातील ओबीसींचे राजकिय आरक्षण टिकविण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत केंद्राने त्यांच्याकडील असलेली ओबीसींचा डेटा राज्याला द्यावा या मागणी केली. मात्र अशी कोणतीही कायदेशीर तरतूद घटनेत नसल्याचे प्रतिज्ञा पत्र केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सादर करत या याचिकेवर कोणताही निर्णय देवू अशी विनंतीही केली. महाराष्ट्रातील ओबीसी …

Read More »

सावधान ! तुमचा फोन खूप लवकर डिस्चार्ज होतोय का? असू शकतो व्हायरस हँकिंग टाळण्यासाठी हे काम त्वरित करा

मुंबई: प्रतिनिधी आज जवळजवळ प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन (smartphone) आहे. स्मार्टफोनमध्ये इंटरनेट कनेक्शन (internet connection) आहे आणि सोशल मीडिया (social media) वर अकाऊंट देखील आहेत. अशा परिस्थितीत, सायबर क्राइम (cyber crime) ची वाढती प्रकरणे ही काही आता नवीन गोष्ट राहिलेली नाही. व्हायरस स्मार्टफोनमध्ये प्रवेश करतात आणि आपली माहिती हॅकर्सला देतात. विशेष …

Read More »

WhatsApp वर ग्रुप कॉल करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, येत आहे हे नवे फिचर व्हाईस आणि व्हिडिओ कॉल शॉर्टकट मध्ये उपलब्ध

मुंबई: प्रतिनिधी ग्रुप कॉल करणाऱ्यांसाठी व्हॉट्सअॅपने आनंदाची बातमी दिली आहे. नवीन फिचर्समुळे ग्रुप कॉल करणं सोपं होणार आहे. व्हॉट्सअॅपने अलीकडेच 2.21.19.15 बीटा अपडेट जारी केले आहे. WABetaInfo च्या एका अहवालातून समोर आलं आहे की, या नवीन फिचरमुळे वापरकर्त्यांना ग्रुप कार्डद्वारे ग्रुप कॉल करणं खूप सोपं होईल. या नवीन अपडेटमध्ये व्हॉइस …

Read More »

या कारणामुळे फडणवीस आणि मंत्री पाटील यांचा एकाच वाहनाने प्रवास काल नंदूरबार मधील कार्यक्रमासाठी दोघांनी केला होता एकत्र प्रवास

नंदूरबार-मुंबई: प्रतिनिधी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आजी-माजी एकत्र आले तर भावी सहकारी ठरतील असे सूचक वक्तव्य करत राजकिय वर्तुळात एकच खळबळ उडाली. त्यातच लगेच दुसऱ्या दिवशी नंदूरबार मधील एका कार्यक्रमासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एकाच …

Read More »

औरंगाबादेत ऑफर नंदुरबारमध्ये सोबत? की कात्रजचा घाट… राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि देवेंद्र फडणवीस एकाच गाडीत

मुंबई : विशेष प्रतिनिधी राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी भाजपाने अनेक क्लृपत्या लढविल्यानंतर अखेर शांत झालेल्या भाजपाला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आजी, माजी आणि एकत्र आले तर भावी सहकारी असे वक्तव्य भाजपाच्या दोन मंत्र्यांकडे बघत केले आणि भाजपात हर्षोल्लासाचे वातावरण बघायला मिळाले. मात्र त्यास २४ तासाचा अवधी लोटत नाही तोच …

Read More »

…आणि औरंगाबादचे आता “संभाजीनगर” शासकिय नामांतर झाले ? मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनीच औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर केला

औरंगाबाद : प्रतिनिधी काही महिन्यांपूर्वी महानगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नामांतराचा मुद्दा उपस्थित होत भाजपा आणि शिवसेनेकडून एकमेकांच्या विरोधात औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्याच्या राजकिय कुरघोड्यांना ऊत येत भाजपानेही संभाजीनगर नामांतर कधी करणार असा सवाल करत शिवसेनेला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. अखेर आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनीच औरंगाबादाचा उल्लेख संभाजीनगर करत अनौपचारीक नामांतर …

Read More »

सुधीर मुनगंटीवारांच्या खुलाशामुळे अजित पवारांची अडचण होणार ? पेट्रोल-डिझेलचा जीएसटी करात समाविष्ट करण्याचे या आधीच राज्य सरकारचे पत्र

मुंबई: विशेष प्रतिनिधी देशातील नागरीकांना स्वत: दरात पेट्रोल-डिझेल देण्यासाठी या दोन्ही वस्तुंचा समावेश जीएसटीत करण्याचे संकेत केंद्राने दिल्यानंतर यासंदर्भात राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्राला राज्याच्या कर लागू करण्याच्या अधिकार गदा आणू नका असा इशारा दिला. त्यास काही तासांचाच अवधी लोटला नाही तोच भाजपा नेते तथा माजी अर्थमंत्री …

Read More »