विशेष बातमी

कोरोना लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी तरूणाईला दिला सल्ला वाचनसंस्कृती जतन आणि वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन

मुंबई: प्रतिनिधी तरूणांमध्ये एक भीतीचे वातावरण असून लॉकडाऊन वाढेल की काय अशी शंका त्यांच्या मनात घर करून आहे. परंतु मी कालपासून गीत रामायण ऐकतोय. गदीमा आणि सुधीर फडके यांचं संगीत ऐकल्यावर मनापासून समाधान मिळत असल्याचे सांगत नव्या पिढीने वाचन संस्कृती जतन व वाढवण्यासाठी प्रयत्न करायला हवा. मराठीत अनेक पुस्तके वाचनीय …

Read More »

कंपनी, दुकान मालकांनो कर्मचाऱ्यांचे पगार कापाल तर तुरूंगात जाल राज्य सरकारकडून आदेश जारी

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन घोषित केला आहे. याकालावधीत अनेक कामगारांना घरीच थांबावे लागत आहे. त्यामुळे या कालावधीतील कंपन्यांमध्ये असलेले कंत्राटी कर्मचारी, विस्थापित-बेघर कर्मचारी, आऊटसोर्सिंग करण्यात आलेल्या कर्मचाऱी आणि खाजगी दुकानांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पगार कापल्यास संबधित मालक, कंपनीच्या प्रमुखावर कायदेशीर कारवाई करून एक ते दोन वर्षाची …

Read More »

आणि राज्याचा कामगार विभाग जागा झाला बांधकाम कामगार, असंघटीत कामगारांची संख्या विभागालाच माहित नाही

मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्यातील संघटीत क्षेत्राबरोबरच असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या हिताचे रक्षण व्हावे यासाठी राज्यात कामगार विभागाची स्थापना करण्यात आली. मात्र गेल्या कित्येक वर्षात राज्यातील असंघटीत क्षेत्रात किती कामगार काम करत आहेत, बांधकाम कामगार किती आहेत याची साधी माहिती गोळा करण्याचे काम अद्याप या विभागाने केलेले नसल्याची धक्कादायक माहिती …

Read More »

देश लॉक डाउन असताना साखर कारखाने सुरु कसे ? ऊसतोड कामगारही माणसेच आहेत गुलाम नाहीत

प्रतिनिधी : बीड संपुर्ण देश लॉक डाऊन असताना राज्यातील आणि कर्नाटकातील साखर कारखाने चालू राहतातच कशी ?  ऊसतोड कामगारही माणसेच आहेत . गुलाम नाहीत.   त्यांना गुलामप्रमाणे वागवू नका. ते रोज नव्या गांवात नव्या ठिकाणी समूहाने काम करतात .  त्यांनाही कोरोना होऊ शकतो , त्यांच्या आरोग्याशी . खेळ सुरू ठेवणारे  सर्व …

Read More »

आमदारांच्या गाडीवरील ड्रायव्हरच्या वेतनसाठीही विधेयक आणणार सुधीर मुनगंटीवारांच्या मागणीवर अजित पवारांचे आश्वासन

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील सर्व आमदारांच्या वाहनावर काम करणाऱ्या खाजगी ड्रायव्हर अर्थात वाहन चालकांकडून आमदारांची काळजी घेतली जाते. मात्र या वाहन चालकांना फारच तुटपुंजी रक्कम वेतनाच्या स्वरूपात मिळते. त्यामुळे आमदारांच्या वाहनावर काम करणाऱ्या वाहन चालकांच्या वेतनात वाढ करावी अशी मागणी भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली. विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासानंतर सुधीर …

Read More »

आमदारांच्या प्रश्नांना उत्तरे नाही, मग मुख्य सचिवांना माफीची शिक्षा उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मध्यस्थीनंतर एकवेळ संधी

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्याचे कायदेमंडळ असलेल्या विधानसभा सदस्यांकडून मतदारसंघातील अनेक प्रश्न औचित्याच्या मुद्याद्वारे उपस्थित करण्यात येतात. मात्र संबधित विभागाकडून महिना उलटून गेला तरी त्यावर उत्तर दिले जात नसल्याने राज्याच्या मुख्य सचिवांनी विधानसभेच्या दरवाज्यात उभे राहून सभागृहाची माफी मागावी असे आदेश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले. याप्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित …

Read More »

महाराष्ट्रातही बलात्कार, लैगिंक छळ आदींच्या गुन्ह्यांसाठी फाशीची शिक्षा अर्थसंकल्पीय अधिवेशनातच नवा कायदा मांडणार असल्याची गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती

मुंबई: विशेष प्रतिनिधी महिलांवरील अत्याचारांच्या घटनांना प्रतिबंध करण्यासाठी आंध्रप्रदेश सरकारच्या ‘दिशा’ कायद्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात नवीन कायदा तयार करण्यात येणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन कालावधीत हा कायदा बनविण्यासाठी विधेयक विधिमंडळात मांडण्यात येणार असून या कायद्याअंतर्गत बलात्कार, सामुहिक बलात्कार, अल्पवयीन बालकांवरील अत्याचारासाठी फाशीच्या शिक्षेची तरतूद करण्यात येणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सांगितले. विधान …

Read More »

महसूल विभागाच्या मनमानीला गृहनिर्माणने लावले वेसण अप्पर मुख्य सचिवांच्या समितीच्या मंजूरीनेच होणार प्रतिनियुक्ती

मुंबईः विशेष प्रतिनिधी शहरातील झोपडपट्टीवासियांची पात्रता निश्चित करण्यासाठी प्रतिनियुक्तीवर नेमण्यात येत असलेल्या महसूली अधिकाऱ्यांच्या नियुक्तीला गृहनिर्माण विभागाने चांगलीच वेसण लावली आहे. त्यामुळे आता गृहनिर्माण विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीने मंजूरी आणि संबधिताची माहिती घेतल्याशिवाय प्रतिनियुक्ती न करण्याचा निर्णय गृहनिर्माण विभागाने घेतला आहे. शासकिय जमिनीवरील झोपडपट्ट्या आणि त्यात राहणारे रहिवाशी …

Read More »

मोफत वीज द्यायचीय, पण ४० हजार कोटी कसे जमा करायचे? ऊर्जा विभागासमोर मोठा प्रश्न

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील १०० युनिटपर्यंतची वीज वापरणाऱ्या ग्राहकांना वीज मोफत देण्याची घोषणा ऊर्जा मंत्री नितीन राऊत केली. मात्र या मोफत वीजेपोटी वीज महावितरण पर्यायी राज्य सरकारच्या तिजोरीवर पडणाऱ्या ४० हजार कोटी रूपयांच्या आर्थिक बोज्याचे वसुली कशी करायची असा प्रश्न ऊर्जा विभागाला पडल्याची माहिती वीज महावितरणमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. …

Read More »

मुख्यमंत्र्यांच्या हातातील माहिती जनसंपर्क व सामान्य प्रशासनाकडूनच लपवाछपवी सेवानिवृत्त अधिकाऱ्याच्या एकवर्षाच्या कंत्राट मुदतवाढीसाठी जुन्या तारखेचा आधार

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील जनतेच्या हिताचे घेतलेले निर्णय समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या माहिती व जनसंपर्क विभागाने खास मर्जीतील सेवानिवृत्त अधिकाऱ्यासाठी चक्क लपवाछपवीचा कार्यक्रम सुरु आहे. विशेष म्हणजे या अधिकाऱ्याची मुदत संपल्यानंतर खास त्यास मागील तारखेचा अध्यादेश काढत मुदत दिल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागातील एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याने दिली. राज्य सरकारने …

Read More »