विशेष बातमी

पर्यावरणमंत्री रामदास कदमांना राग का येतो ? प्लास्टीक बंदीप्रश्नी काही दिवसातली ही तिसरी घटना

मुंबई : प्रतिनिधी आपल्या फटकळ आणि बिनधास्त बोलण्याने नेहमी चर्चेत असलेले राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या या शैलीचा फटका आता मंत्रालयातील कर्मचारी, पत्रकार यांच्याबरोबरच शिवसेनेचेच सहकारी मंत्री दिवाकर रावते यांनाही बसला आहे. विशेष म्हणजे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतही कदम यांना आवरणे अवघड असल्याची जाणीव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह शिवसेनेच्या दुसऱ्या …

Read More »

विद्यार्थ्यांकडून निम्मे शुल्क घेऊनच प्रवेश द्या राज्य शासनाच्या महाविद्यालयांना सूचना

मुंबई : प्रतिनिधी कृषी, वैद्यकीय व इतर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी सन २०१८-१९ या वर्षासाठी प्रवेश घेणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु. आठ लाख पेक्षा कमी आहे, अशा विद्यार्थ्यांची शिक्षण शुल्काची ५० टक्के रक्कम राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत राज्य शासनाकडून देण्यात येते. त्यामुळे प्रवेशाच्या वेळी अशा विद्यार्थ्यांकडून …

Read More »

ई-मेल, मोबाईलच्या जमान्यात फोन आणि टपालासाठी आमदारांना मिळतात २० हजार आमदारांच्या खिशात अधिकची रक्कम पडावी म्हणून सरकारकडून सोय

मुंबई : प्रतिनिधी राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डिजीटल महाराष्ट्रची घोषणा केली. या घोषणेप्रमाणे महाराष्ट्र विधिमंडळाकडून या घोषणेची अंमलबजावणी करण्यासाठी सुरुवातीला विधान परिषदेच्या सर्व सदस्यांना तर दुसऱ्या टप्प्यात विधानसभेच्या सदस्यांना टँबचे वाटप करण्यात आले. तरीही विधिमंडळ आणि राज्य सरकारकडून या दोन्ही सभागृहाच्या सदस्यांना फोन आणि टपालासाठी दर महिन्याला २० हजार …

Read More »

खाजगी शालेय संस्थांची ९ टक्क्याची विद्युत शुल्क माफी आता बंद ऊर्जा विभागाचा निर्णय

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील खाजगी शाळांना सामाजिकदृष्टीकोनातून विद्युत पुरवठ्यावर आकारण्यात येणारे ९ टक्के विद्युत शुल्क माफ करण्यात आले होते. मात्र या शाळांकडून नफेखोरी करण्यात येत असल्याने या शाळांना देण्यात येणारी विद्युत शुल्क माफी रद्द करण्याचा निर्णय राज्याच्या ऊर्जा विभागाने घेतला आहे. महाराष्ट्र वीज शुल्क अधिनियम १९५८ मधील कलम २(२)(क)(३)(३-क) च्या …

Read More »

प्लास्टिक बंदीनंतर रासायनिक खतांवर बंदी आणण्याचा विचार स्थानिक स्वराज्य संस्थांना पारितोषिके देण्याची पर्यावरण मंत्री कदम यांची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी प्लास्टिक बंदीनंतर शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या रासायनिक खतांवर बंदी आणण्याबाबत गांभिर्याने विचार सुरु असल्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आज सांगितले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आयोजित जागतिक पर्यावरण दिन सोहळ्यातील पर्यावरण विषयक पारितोषिक वितरण कार्यक्रमात श्री. कदम बोलत होते. यावेळी राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील, अपर मुख्य सचिव सतीश गवई, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण …

Read More »

मंत्रालयासमोर न्याय मागण्यांसाठी निदर्शने करणाऱ्या अंधानाही पोलिसी खाक्या सरकार दाद देईना आणि पोलिस आंदोलन करू देईना अशी अंधाची अवस्था

मुंबई : प्रतिनिधी राज्य सरकारच्या गलथान आणि ढिसाळ कारभारामुळे मंत्रालयात येवून किंवा मंत्रालयाच्या समोर निदर्शने  आपल्या न्याय मागण्यांच्या प्रश्नी दाद मागणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात आता अंध व्यक्तींनीही न्याय मागण्याच्या प्रश्नी दाद मागण्यासाठी मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी हे आंदोलन उधळून लावण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर …

Read More »

शिपाईच्या सेवानिवृत्तीला राज्याच्या माजी मुख्य सचिवांसह आजी-माजी सनदी अधिकारी हजर गृहनिर्माण विभागातील आजी-माजी उपसचिव, कक्ष अधिकाऱ्यांचीही उपस्थिती

मुंबई : प्रतिनिधी राज्याचा कारभार चालणाऱ्या मंत्रालयात एखादा सनदी अधिकारी, मुख्य सचिव अथवा अप्पर मुख्य सचिव सेवानिवृत्त होत असेल तर त्या अधिकाऱ्याला निरोप देण्यासाठी सर्वच कर्मचारी आणि अधिकारी एकत्र येतात. मात्र ज्या व्यक्तीने ३४ वर्षे एकाच विभागात शिपाई पदी काम करणाऱ्या व्यक्तीला त्याच्या प्रामाणिक सेवेची पोचपावती म्हणून निवृत्तीच्या दिवशी राज्याच्या …

Read More »

मंत्र्यांच्या पार्थिवाला अग्नीही मिळत नाही तोच कार्यालय रिकामे करून देण्याचा आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पाठोपाठ त्यांच्या अखत्यारीत असलेल्या सामान्य प्रशासन विभागाचा प्रताप

मुंबई : प्रतिनिधी राज्याचे कृषी मंत्री पांडूरंग फुंडकर यांच्या निधन होवून त्यांच्या पार्थिवाला अग्नीही मिळत नाही. तोच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अखत्यारीत असलेल्या सामान्य प्रशासन विभागाने कालच अर्थात गुरूवारी दुपारनंतर त्यांचे कार्यालय तातडीने रिक्त करून विभागाकडे सुपुर्त करावे असे आदेश कृषी मंत्र्यांच्या कार्यालयीन कर्मचाऱ्यांना बजाविल्याची धक्कादायक माहिती नुकतीच उघडकीस …

Read More »

अपात्र झोपडीचा पुरावा द्या आणि घर मिळवा राज्य सरकारकडून शासन निर्णय जारी

मुंबई : प्रतिनिधी मुंबईसह राज्यात मोठ्या प्रमाणावर अनेक सर्वसामान्य नागरीकांना हक्काचे घर नसल्याने रस्त्याच्या कडेला, शासकीय जमिनीवर अथवा खाजगी व्यक्तीच्या जमिनीवर झोपड्या घालून रहात असल्याचे दिसून येते. यातील अनेक झोपडीधारक अपात्र ठरत असल्याने त्यांच्या घराचा प्रश्न निर्माण होत आहे. अशा अपात्र ठरणाऱ्या झोपडीधारकांना हक्काचे मिळणार असून फक्त अपात्र झोपडीचा पुरावा …

Read More »

राष्ट्रवादी काँग्रेसला लवकरच मोठे खिंडार माजी मंत्री छगन भुजबळ, गणेश नाईक आणि भास्कर जाधव यांचा लवकरच शिवसेनेत प्रवेश

मुंबई : प्रतिनिधी देशातील लोकसभा निवडणूकांना एक वर्ष तर विधानसभेच्या निवडणूकांना दिड वर्षे अद्याप राहीलेली असतानाच सर्वच राजकिय पक्षांकडून मोठ्या प्रमाणावर उमेदवारांची आणि नेत्यांची पळवा पळवी सुरु केली आहे. या पळवा पळवीत आता शिवसेनेने पुढाकार घेतला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, नवी मुंबईतील वजनदार नेते गणेश …

Read More »