मुंबई : प्रतिनिधी देशात आणि महाराष्ट्रात शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही म्हणून काही शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने पत्र लिहीत आत्महत्या केल्याच्या घटना काही दिवसांपूर्वी उघडकीस आल्या. मात्र शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आश्वासनानंतर आत्मदहनाच्या विचारापासून शेतकरी पारावृत्त झाल्याची चांगली घटना नुकतीच उघडकीस आली. मागील ८ ते …
Read More »खासगी बस, ट्रॅव्हल्सवाल्यांनी जास्त पैसे घेतल्यास प्रवाशांनो तक्रार करा परिवहन विभागाचे प्रवाशांना आवाहन
मुंबई : प्रतिनिधी राज्य शासनाने दि. २७ एप्रिल रोजीच्या शासन निर्णयाद्वारे कंत्राटी वाहनांचे (खासगी बस, ट्रॅव्हल्स इ.) महत्तम भाडेदर निश्चित केले आहेत. हा शासन निर्णय त्वरीत प्रभावाने अमलात आला आहे. कंत्राटी बस परवाने धारकांकडून जर विहीत दरापेक्षा अधिक दराने आकारणी करण्यात येत असेल तर त्या विषयी मोटार वाहन विभागाच्या 022 …
Read More »सुवर्णपदक विजेता पै. राहूलला मुंडे प्रतिष्ठानची एक लाख एक्कावन्न हजाराची मदत पालकमंत्री ना पंकजाताई मुंडेंनी पालकत्व स्विकारत केले खास अभिनंदन
मुंबई : प्रतिनिधी राष्ट्रकुल स्पर्धेत सुर्णपदक पटकावणारा बीडचा भूमीपुत्र राहूल आवारे याला पुढील प्रशिक्षणासाठी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने एक लाख एक्कावन्न हजाराची मदत आज देण्यात आली. राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी राहूलचे पालकत्व स्विकारत त्याचे खास अभिनंदन केले व आगामी ऑलिम्पिक स्पर्धेसाठी त्याला शुभेच्छा दिल्या. …
Read More »जिल्हा परिषदेच्या १ लाख शिक्षकांच्या बदल्या त्यांच्या घराजवळ होणार अॉनलाईन बदली प्रक्रियेत २० पर्याय देण्याची मंत्री पंकजा मुंडे यांची घोषणा
मुंबई : प्रतिनिधी राज्य शासनाच्या २७ फेब्रुवारी २०१७ च्या शासन निर्णयानुसार जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदली धोरणाला उच्च न्यायालयाने दुजोरा दिला असून आता शिक्षकांच्या बदल्यांचा जिल्हातंर्गत आणि आंतरजिल्हा पध्दतीने करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे घरापासून लांब राहून ज्ञानदानाचे काम करणाऱ्या शिक्षकांना आता घरात किंवा घराजवळ राहून शिक्षकाची नोकरी करणे शक्य होणार …
Read More »उद्दीष्ट एकच, २०१९ ला भाजप आणि मित्र पक्षाला सत्तेवरून घालविणे साहित्यिक, विचारवंत, सामाजिक कार्यकर्त्यांच्या मित्र लोकशाहीचे फोरमची घोषणा
मुंबई : प्रतिनिधी मित्र लोकशाहीचे (Friends of Democracy) हा फोरम कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही. तरीही त्याचे प्रमुख उद्दिष्ट मात्र राजकीय आहे. म्हणजेच आज केंद्रात सत्तेत असणाऱ्या मनुवादी व लोकशाही विरोधी भाजपा व त्याच्या मित्र पक्षास २०१९ मधील निवडणुकीमध्ये सत्तेतून पायउतार करणे, हेच ह्या फोरमचे प्रमुख उद्दिष्ट असणार आहे. त्यासाठी …
Read More »निर्वासितांना दिलेल्या जमिनी त्यांच्या मालकीच्या होणार राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
मुंबई : प्रतिनिधी देशाच्या फाळणीनंतर पाकिस्तानातून भारतात आलेल्या निर्वासित नागरिकांना राज्यात देण्यात आलेल्या जमिनी व मालमत्ता हस्तांतरण व वापर यावरील निर्बंधातून मुक्त करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने आज घेतला. अशा निर्वासित नागरिकांना देण्यात आलेल्या भूखंडांच्या नोंदणीवर अ-१ सत्ता प्रकार अथवा भोगवटादार वर्ग-१ अशी नोंद करण्यात येणार आहे. त्यामुळे या जमिनींचे मालक हे …
Read More »विदर्भ, मराठवाडा, उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळांना आवश्यक मनुष्यबळ द्या विकास मंडळांच्या आढावा बैठकीत राज्यपालांच्या मुख्यमंत्र्यांना सूचना
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील विकास मंडळांनी अधिक सक्षमपणे काम करण्याची गरज असून या मंडळांना आवश्यक ते मनुष्यबळ उपलब्ध करुन द्यावे अशा सूचना राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देत यासाठी नियोजन विभागाने कालबद्ध कार्यक्रम हाती घेण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. राज्यातील विदर्भ विकास मंडळ, मराठवाडा विकास मंडळ, उर्वरित …
Read More »समस्त सोलापूरकरांच्या सहभागाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर जंयती उत्सवाची सांगता मिरवणूकीत ७ ते ८ लाख आंबेडकरी अनुयांची उपस्थिती
सोलापूर : प्रतिनिधी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त गेले आठवडाभर सुरु असलेल्या जंयती उत्सवाची सांगता काल रविवारी झाली. जंयतीनिमित्त रविवारी काढण्यात आलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर जंयती मध्यवर्ती समितीच्या मिरवणूकीत तब्बल १०० हून अधिक मंडळांनी सहभाग घेतला. सकाळी मोठ्या जल्लोषात सुरु झालेली मिरवणूक रात्री १२ वाजता संपली. या मिरवणूकीत तब्बल ७ …
Read More »बोधचिन्ह, घोषवाक्य निर्मितीसाठी स्पर्धा विजेत्यास २५ हजाराचे बक्षीस मिळणार
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील जनतेला पारदर्शक, कालबद्ध आणि गतिमान सार्वजनिक सेवा देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या लोकसेवा हक्क अधिनियमाच्या (RTS) बोधचिन्ह रेखाटन आणि घोषवाक्य निर्मिती स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन शासनाने केले आहे. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम-२०१५ या क्रांतिकारी कायद्यामध्ये आजवर ३९ विभागांच्या ४६२ सेवा अंतर्भूत करण्यात आलेल्या आहेत. सामान्यांना आपले सरकार संकेतस्थळ, मोबाईल अॅप्लिकेशन, ई-महासेवा …
Read More »वीज बचतीच्या ‘स्पर्शा’ने सरकारची ९३ लाख रूपयांची बचत राज्यातील १२६९ इमारतीत ऊर्जा उपकरणे बदलली
मुंबई : प्रतिनिधी राज्य शासनाच्या ‘स्पर्श’ (सोलर पॉवर अँड रिनोव्हेटिव्ह सस्टेनेबल हब) प्रकल्पांतर्गत राज्यातील १२६९ शासकीय इमारती ऊर्जा कार्यक्षम करण्यात आल्या आहेत. त्यामुळे १ एप्रिल पर्यंत सुमारे दहा लाख युनिट विजेचा वापर कमी झाला तर विज बिलापोटीचे ९२.६८ लाख रुपयांची बचत झाली आहे. पहिल्या टप्प्यात शासकीय इमारतींमधील दोन लाख ट्यूबलाईट, ७५ हजार पंखे व १६०० वातानुकुलित यंत्रे बदलण्यात …
Read More »
Marathi e-Batmya