विशेष बातमी

पंतप्रधान मोदी यांचा पाकिस्तानला थेट नाव घेत इशारा, टेरर आणि टॉक एकाचवेळी नाही पाकिस्तानने त्यांच्या देशातील अतिरेक्यांची स्थळे उद्वस्त करावीत

पहलगाम येथील बैसरण व्हॅलीतील दहशतवादी हल्ल्याला प्रत्यु्तर म्हणून ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातील दहशवाद्यांचे अड्डे भारताने उद्धवस्त केले. त्यानंतर पाकिस्ताने या हल्ल्याला प्रत्युत्तर देत भारतावरही हल्ले करण्यास सुरुवात झाली. अखेर या युद्धग्रस्त तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या मध्यस्थीने अखेर भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी करण्यात आली. त्यानंतर आज पहिल्यांदाच देशातील जनतेला पंतप्रधान नरेंद्र मोदी …

Read More »

क्रिकेटपटू विराट कोहली याची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहिर रोहित शर्मानंतर विराट कोहलीची निवृत्ती

रोहित शर्माने इंस्टाग्राम स्टोरीमध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर अवघ्या पाच दिवसांतच, विराट कोहलीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट करत त्याच्या कसोटी कारकिर्दीचा शेवट करत असल्याचे जाहिर केले. २० जूनपासून इंग्लंडमध्ये सुरू होणाऱ्या भारताच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी या प्रदीर्घ स्वरूपातून निवृत्त होण्याची त्याची इच्छा निवडकर्त्यांना सांगितल्यानंतर ३६ वर्षीय खेळाडूची …

Read More »

डिजीएमओची स्पष्टोक्ती, हल्ला दहशतवाद्यांच्या विरोधात, पण पाकिस्तानची त्यांना मदत भारताची संरक्षण सामग्री अभेद्य

भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी झाल्यानंतर पुढील चर्चेसाठी आज संध्याकाळी दोन्ही देशांच्या डिजीएमओच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये बैठक होत आहे. तत्पूर्वी आज दुपारी भारतीय डिजीएमओच्या अधिकाऱ्यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना भारताने केलेला हल्ला फक्त दहशतवाद्यांच्या विरोधात होता. तो हल्ला कोणत्याही पाकिस्तानी सैन्याशी किंवा पाकिस्तान देशाच्या विरोधात नव्हता. पण पाकिस्तानी लष्कराने दुर्दैवाने दहशतवाद्यांच्या …

Read More »

व्हाइस अॅडमिरल ए एन प्रमोद म्हणाले, ऑपरेशन सिंदूर सुरु केल्यावर नौदल सज्ज होते कराचीवर समुद्री मार्गे हल्ले करण्यासाठी तयार होते

भारताने पाकिस्तानविरुद्ध ऑपरेशन सिंदूर सुरू केले तेव्हा भारतीय नौदल पूर्णपणे सज्ज होते आणि कराचीसह समुद्रात आणि जमिनीवर निवडक लक्ष्यांवर हल्ला करण्यास पूर्णपणे सक्षम होते, असे व्हाइस अॅडमिरल एएन प्रमोद यांनी रविवारी सांगितले. “आमच्या सैन्याने अरबी समुद्रात निर्णायक स्थितीत तैनात राहून आमच्या निवडीच्या वेळी कराचीसह समुद्रात आणि जमिनीवर निवडक लक्ष्यांवर हल्ला …

Read More »

युक्रेन अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की युद्धबंदीसाठी आग्रही रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर ह युद्धबंदीसाठी उत्सुक

रविवारी (११ मे २०२५) रोजी युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी रशियाच्या थेट शांतता चर्चेच्या ऑफरचे स्वागत केले, परंतु वाटाघाटी सुरू होण्यापूर्वी पूर्ण, तात्पुरती युद्धबंदी असणे आवश्यक आहे असा आग्रह धरला. वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी एक्स वर लिहिताना, युद्धबंदीशिवाय चर्चा सुरू करण्याच्या रशियन अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या प्रति-ऑफरला “सकारात्मक कृत्य” म्हटले आणि …

Read More »

डीजीएओची माहिती, भारतीय हवाई हल्ल्यात १०० हून अधिक दहशतवादी ठार आमचा हल्ला पाकिस्तान, तेथील नागरिक किंवा देशाशी नव्हता तर दहशतवाद्यांच्या विरोधात होता

ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानच्या लष्करी हल्ल्याला उधळून लावत भारताने अनेक उच्च तंत्रज्ञानाची पाकिस्तानी विमाने पाडली आहेत, असे हवाई ऑपरेशन्स महासंचालक (डीजीएओ) यांनी रविवारी सांगितले. अमेरिकेच्या मध्यस्थीने भारत-पाकिस्तान दरम्यान शस्त्रसंधीची घोषणा काल करण्यात आली. त्यानंतर ७ मे ला भारतीय हवाई दलाने मध्यरात्रीनंतर दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर हल्ले केले. त्यानंतर पाकिस्तानने केलेल्या हल्ल्याची आणि …

Read More »

शस्त्रसंधी, अमेरिकाः काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, राहुल गांधी यांची मागणी अधिवेशन बोलवा काश्मीर प्रश्नाचे आंतरराष्ट्रीयीकरण करण्याच्या प्रयत्नांना काँग्रेसचा तीव्र आक्षेप

काश्मीर प्रश्नाचे आंतरराष्ट्रीयीकरण करण्याच्या केंद्र सरकारच्या प्रयत्नांना काँग्रेसने आज तीव्र आक्षेप घेतला. तसेच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवित सर्व पक्षियांची बैठक बोलवावी आणि त्यास स्वतः उपस्थित रहावे व संसदेचे विशेष अधिवेशन बोलवावी अशी मागणी केली. पहलगाम दहशतवादी हल्ला आणि …

Read More »

शस्त्रसंधी उल्लंघन प्रत्युत्तरासाठी लष्कर प्रमुखांचे कमांडरला पूर्ण अधिकार डिजीएमओच्या बैठकीत भारतीय लष्कर प्रमुखांचे आदेश

भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीच्या एका दिवसापेक्षा कमी कालावधीत, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी रविवारी पश्चिम सीमेवरील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतला आणि पाकिस्तानकडून होणाऱ्या कोणत्याही उल्लंघनाला तोंड देण्यासाठी तेथे तैनात असलेल्या लष्करी कमांडर्सना “पूर्ण अधिकार” दिले. युद्धबंदीची घोषणा झाल्यानंतर शनिवारी जम्मू आणि काश्मीरच्या काही भागात स्फोट झाल्याचे वृत्त आले. “१० मे …

Read More »

जयराम रमेश यांची मागणी, युद्धबंदीची माहिती पंतप्रधानांनी सर्वपक्षिय बैठकीत सामायिक करावी काँग्रेस, डाव्या पक्षांची मागणी केंद्र सरकारकडे मागणी

शनिवारी (११ मे २०२५) रोजी, भारत आणि पाकिस्तान यांच्यात जाहीर झालेल्या युद्धबंदीची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने देशातील सर्वपक्षियांबरोबर सामायिक करावी असे आवाहन करत पुढील वाटचालींच्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणीही यावेळी विरोधकांनी केली. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले की, वॉशिंग्टन डी.सी. कडून झालेल्या “अभूतपूर्व घोषणा” लक्षात …

Read More »

इंडियन एअरफोर्सची स्पष्टोक्ती, थांबा ऑपरेशन सिंदूर अद्याप सुरु आहे… वेळ आल्यावर सविस्तर माहिती देऊ

नवी दिल्ली आणि इस्लामाबादने युद्धबंदी जाहीर केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी, पहलगाममध्ये पाकिस्तान समर्थित दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याविरुद्ध प्रत्युत्तर म्हणून सुरू केलेले ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरू असल्याचे भारतीय हवाई दलाने अर्थात इंडियन एअरफोर्सने (IAF) रविवारी सांगितले. इंडियन एअरफोर्सने एक्सवर एक पोस्ट करत म्हणाले की, ऑपरेशन्स अजूनही सुरू असल्याने, योग्य वेळी सविस्तर माहिती …

Read More »