लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगाकडून लोकशाहीच्या हत्याऱ्यांना वाचविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत एक टीम असून त्याच टीमकडून महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि हरयाणात मतदार यादीतील काँग्रेस आणि विरोधी पक्षांना मतदान करणाऱ्या मतदारांची नावे मतदार यादीतून जाणीपूर्वक डिलीट करण्यात आले आहेत काही ठिकाणी मतदारांची नावे चुकीच्या पद्धतीने समाविष्ट करण्यात आल्याचा आरोप केला. तसेच केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार हे अशा लोकशाहीच्या हत्याऱ्यांना वाचविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही राहुल गांधी यावेळी केला.
यावेळी राहुल गांधी यांनी कर्नाटकातील आनंद मतदार संघातील मतदारांची नावे कशा पद्धतीने डिलीट झाली याची माहिती देताना सांगितले की, ज्या मतदारांची नावे मतदार यादीतून डिलीट झाली. त्या व्यक्तींनाच माहित नाही की त्यांनी ती मतदार यादीतील नावे डिलीट केली. तसेच मतदार यादीतील नावे हटविण्यासंदर्भात जे अर्ज भरण्यात आले ते अर्ज ही काही सेकंदात भरून निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर भरून सब्मिट करण्यात आले. तसेच त्यानुसार आयोगाने लगेच कारवाई करत ती मतदार यादीतील नावेही हटविली. त्यासाठी एका वृद्ध महिलेची चित्रफितही यावेळी दाखविण्यात आली. त्यावर सदर महिलेलाच माहित नाही की तीने काही जणांची नावे डिलीट केली आहेत.
राहुल गांधी पुढे बोलताना म्हणाले की, ज्या पथकाने हे काम केले आहे, त्या पथकाने स्थानिक भागातील फोन नंबरचा वापर न करता ज्या राज्यातील मतदार यादीतील नावे कमी करायची होती त्याऐवजी शेजारील राज्यांतील मोबाईल फोन नंबरचा वापर केला जात असे. मात्र त्यासाठी ते कोणत्या लोकेशनवरून या गोष्टी केल्या जात होत्या त्याबाबतही निवडणूक आयोग बोलायला तयार नाही.
LIVE: Special Press Conference – Vote Chori Factory https://t.co/ne8cdFCnMs
— Rahul Gandhi (@RahulGandhi) September 18, 2025
पुढे बोलताना राहुल गांधी यांनी सांगितले की, यासंदर्भात कर्नाटकात आनंद मतदार संघात अशा पद्धतीच्या मतदार डिलीटसंदर्भात तक्रार करण्यात आली. तसेच या प्रकरणाचा तपास सीआयडी कडून करण्यात येत आहे. आतापर्यंत कर्नाटकच्या सीआयडीने केंद्रीय निवडणूक आयोगाला १८ वेळा नोटीस पाठवित मतदार यादीतील नावे डिलीट करण्यासाठी आणि बोगस नावे समाविष्ट करण्याठी वापरण्यात आलेला मोबाईल नंबर, त्याचे लोकेशन, त्यासाठी वापरण्यात आलेली यंत्रणा आदी गोष्टी संदर्भात माहिती मागितली होती. परुंतु ती अद्याप कर्नाटकच्या सीआयडी कार्यालकडे हस्तांतरीत करण्यात आली नाही.
राहुल गांधी पुढे बोलताना म्हणाले की, कर्नाटकातील आनंद प्रमाणो महाराष्ट्रातील राजुरा मतदारसंघातही अशा पद्धतीने नवी मतदारांची नावे समाविष्टपणे करण्यात आल्याचे स्पष्ट केले. परंतु त्या संदर्भातही कोणताच तपास करण्यात आला नसल्याचे सांगत यासंदर्भातील काही पुरावेही पत्रकार परिषदेत दाखवून दिले.
शेवटी बोलताना राहुल गांधी यांनी केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सात दिवसांची मुदत देत सात दिवसात या प्रकरणी माहिती द्यावी असे आवाहनही यावेळी केले.
तसेच राहुल गांधी म्हणाले की, हायड्रोजन बॉम्ब अद्याप फोडण्यात आला नाही. पण त्याची तयारी सुरु असल्याचे स्पष्ट केले.
Marathi e-Batmya