राजनाथ सिंह म्हणाले, भारतीय हल्ल्याचा आवाज रावळपिंडीतील लष्करी मुख्यालयातही… लखनऊतील ब्रम्होस सुपरसॉनिक उत्पादन युनिटच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी सांगितले की, लष्कराने ऑपरेशन सिंदूर सुरू करून अनेक महिलांच्या कपाळावरील सिंदूर पुसणाऱ्या भारतविरोधी आणि दहशतवादी संघटनांचा बदला घेतला.

लखनऊमधील उत्तर प्रदेश संरक्षण औद्योगिक कॉरिडॉर येथे ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र उत्पादन युनिटच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना राजनाथ सिंग पुढे म्हणाले की, लष्कराच्या कृती केवळ सीमावर्ती भागांपुरत्या मर्यादित न राहता रावळपिंडीतील पाकिस्तानी लष्कराच्या मुख्यालयातही मोठ्याने प्रतिध्वनीत झाल्या.

पुढे बोलताना राजनाथ सिंग म्हणाले की, आम्ही केवळ लष्करी तळ आणि सीमावर्ती चौक्यांना लक्ष्य केले नाही तर पाकिस्तानी लष्कराचे मुख्यालय असलेल्या रावळपिंडीमध्येही भारतीय सशस्त्र दलांचा आवाज ऐकू आला, असे सांगितले.

ऑपरेशन सिंदूरला प्रत्युत्तर म्हणून भारतातील नागरिक आणि प्रार्थनास्थळांना लक्ष्य केल्याबद्दल राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानवर टीका केली. दहशतवादी तळांविरुद्ध भारताच्या प्रतिहल्लाबद्दल बोलताना राजनाथ सिंह म्हणाले की, उलट सैन्याने सावधगिरी आणि संयम बाळगला, पाकिस्तानमधील केवळ दहशतवादी पायाभूत सुविधांना लक्ष्य करून अचूक हल्ले केल्याचे सांगितले.

पुढे बोलताना राजनाथ सिंह म्हणाले की, आम्ही कधीही त्यांच्या नागरिकांना लक्ष्य केले नाही. तथापि, पाकिस्तानने केवळ भारतीय नागरी क्षेत्रांवर हल्ला केला नाही, तर मंदिरे, गुरुद्वारा आणि चर्चवरही हल्ले करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला.

राजनाथ सिंह पुढे म्हणाले की, ऑपरेशन सिंदूरद्वारे भारताने जगाला दाखवून दिले आहे की ते आता दहशतवादाशी लढण्यासाठी शत्रूच्या हद्दीत अंत्यत आतपर्यंत हल्ला करू शकतो असेही यावेळी सांगितले.

पुढे बोलताना राजनाथ सिंह म्हणाले की, दहशतवादाबाबत भारताचे झीरो टॉलरन्सचे धोरण पाळत, आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे स्पष्ट केले आहे: हा एक नवीन भारत आहे, जो सीमेच्या या बाजूला आणि त्यापलीकडे दहशतवादाविरुद्ध प्रभावी कारवाई करेल, असेही यावेळी सांगितले.

राजनाथ सिंह यांनी शेवटी बोलताना सांगितले की, आम्ही दाखवून दिले की जेव्हा जेव्हा भारत दहशतवादाविरुद्ध कारवाई करेल तेव्हा सीमेपलीकडील जमीन देखील दहशतवाद्यांसाठी आणि त्यांच्या मालकांसाठी सुरक्षित राहणार नाही, असा गर्भित इशारा पाकिस्तानला देत ऑपरेशन सिंदूर हे केवळ लष्करी ऑपरेशन नव्हते हे ऑपरेशन भारताच्या राजकीय, सामाजिक आणि धोरणात्मक इच्छाशक्तीची सामूहिक शक्ती होती असेही यावेळी सांगितले.

About Editor

Check Also

पंतप्रधान मोदी यांची माहिती, अर्थसंकल्प हा तयारी आणि प्रेरणेतून तयार केलेला एका लेखी मुलाखती दरम्यान व्यक्त केली भावना

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ हा “आता किंवा कधीच नाही” हा जबरदस्तीतून निर्माण झालेला क्षण नव्हता तर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *