Breaking News

Tag Archives: एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री शिंदे यांचं मागणं, राज्यातील जनतेला सुख, समृद्धी मिळू दे ‘वर्षा’ निवासस्थानी श्री गणरायाची प्रतिष्ठापना

गणेशोत्सवानिमित्त आज ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक श्री गणरायाची विधिवत पूजा करुन प्रतिष्ठापना केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला सुख समृद्धी मिळू दे अशी प्रार्थना केली. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी गणरायाचे आगमन झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांच्या पत्नी सौ. लता शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, स्नुषा …

Read More »

‘मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रमासाठी अर्ज करण्याचे आवाहन इच्छुक उमेदवारांनी संकेतस्थळावर अर्ज सादर करा

शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक …

Read More »

आता मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे अर्ज अंगणवाडी सेविकांकडून स्विकारणार राज्य सरकारच्या महिला व बाल कल्याण विभागाकडून शासन निर्णय जारी

आगामी विधानसभा निवडणूका डोळ्यांसमोर ठेवून राज्यातील महिला वर्गाला (मतदारांना) आकर्षित कऱण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना जाहिर केली. तसेच योजनेच्या माध्यमातून दर महिन्याला १५०० रूपये देण्याचा निर्णयही जाहिर केला. या योजनेच्या लाभार्थ्यांना दोन-तीन महिन्याचे हप्तेही देण्यात आले. मात्र यापूर्वी राज्याच्या महिला व बाल कल्याण विभागाकडून या योजनेसाठी अर्ज घेण्यात येत होते. …

Read More »

पैठण, गंगापूर येथे जिल्हा अतिरिक्त न्यायालय हिंगोली स्वतंत्र न्यायिक जिल्हा परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांचे न्यायिक काम परभणीतून

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण व गंगापूर येथे जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालय तसेच हिंगोली स्वतंत्र न्यायिक जिल्हा करण्यास व काटोल, आर्वी, येथे वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश न्यायालय स्थापन करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. मीरा-भाईंदर येथे दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग हे न्यायालय स्थापन करण्यात येईल. बैठकीच्या …

Read More »

पुणे-छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्ग ९ हजार कोटी रूपये खर्चून सुधारणा करणार ६ पदरी उन्नत आणि बाह्यवळण रस्ता मार्ग सुधारण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

सध्याच्या पुणे-शिरुर-अहमदनगर-छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गाची सुधारणा करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. पुणे ते शिरुर हा ५३ कि.मी. चा मार्ग सहा पदरी उन्नत करण्यात येणार असून एमएसआयडीसीमार्फत हे काम केले जाईल. यासाठी ७ हजार ५१५ कोटी खर्च अपेक्षित आहे. शिरुर अहमदनगर बाह्यवळण …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचे आदेश, पावसामुळे झालेल्या नुकसानीचे ताबडतोब पंचनामे करा आपदग्रस्तांना तातडीने मदत उपलब्ध करून देण्यात यावी

मागील दोन दिवस विशेषतः मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. यासह मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या विदर्भासह इतर भागातील जिल्हे किंवा तालुक्यांमध्ये नुकसानीचे पंचनामे आणि मदतीची कार्यवाही त्वरित करण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, पिकांचे झालेले नुकसान, घरांची पडझड, पशुधनाची हानी …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, हॉस्पिटलची ५०० कोटींची जमीन ७० कोटीत… मविआ सरकार असताना एस. टी. संप चिघळवणारे भाजपाचे तीन हस्तक आता गप्प का ?: विजय वडेट्टीवार

राज्यातील कायदा व सुव्यवस्था अत्यंत खालावलेली असून हत्या, खून, दरोडो, बलात्कार यांचे प्रमाण वाढले आहे. पुण्यात नुकतेच दिवसाढवळ्या दोन खून झाले. राज्यात शांतता राखण्यात भाजपा युती सरकार अपयशी ठरली आहे. कायदा सुव्यवस्थेकडे अक्षम्य दुर्लक्ष केले जात असून सरकारचे सर्व लक्ष मात्र घोटाळे करून पैसा वसुल करण्याकडे आहे, असा घणाघाती हल्लाबोल …

Read More »

नाना पटोले यांची मागणी, गृहमंत्री फडणवीसांचा राजीनामा, डीजीपी रश्मी शुल्कांना निलंबित करा बदलापूर प्रकणातील आपटे व महाराजांच्या पुतळ्याचा शिल्पकार आपटे अजून मोकाट कसे?

महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. कायदा व सुव्यवस्था हाताळण्यात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस फेल झाले आहेत तर पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला बदलापूर घटनेतील आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. बदलापूर घटनेतील आरोपी आपटे व शिवरायांच्या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटेला अजून अटक का झाली नाही? ते पाकिस्तानात पळून गेले काय? असा …

Read More »

महाविकास आघाडीच्या विरोधात महायुती लागली कामाला नेत्यांना टार्गेट करून वातावरण बदलण्याचा प्रयत्न

बदलापूर येथील दोन चिमुरडींवरील अत्याचाराचे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सत्ताधारी भाजपा-शिवसेना शिंदे गटाकडून करण्याचे प्रकरण ताजे असतानाच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेल्या मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळून पडण्याची घडली. या दोन्ही घटनांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस हे योग्यरितीने हाताळू शकले नाहीत. त्यामुळे विरोधकांच्या …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांची माहिती, महाराजांचा नवा पुतळा उभारणार, समितीची स्थापना वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीत निर्णय

मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याच्या दुर्दैवी घटनेसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी बैठक पार पडली. बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) इक्बाल सिंग चहल, अतिरिक्त मुख्य सचिव सार्वजनिक बांधकाम मनिषा …

Read More »